अॅशेस मालिकेत सर्वाधिक विकेट घेणारे गोलंदाज(फोटो-सोशल मीडिया)
Most wickets in Ashes history : ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील बहुप्रतीक्षित अॅशेस मालिका २०२५ ला २१ नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळवण्यात येणार आहे. या कसोटी मालिकेत दोन्ही संघ विजयाचे लक्ष्य ठेवणार आहेत. दोन्ही संघांना त्यांच्या खेळाडूंकडून मोठ्या अपेक्षा असणार आहेत. या मालिकेचा पहिला सामना पर्थमध्ये खेळला जाणार आहे. तर दूसरा सामना ४ डिसेंबर रोजी ब्रिस्बेनमध्ये खेळला जाणार आहे. मालिकेचा तिसरा सामना १७ डिसेंबर रोजी अॅडलेडमध्ये सुरू होईल, तर चौथा सामना २६ डिसेंबर रोजी मेलबर्नमध्ये खेळवण्यात येणार आहे. तसेच मालिकेतील शेवटचा आणि पाचवा सामना ४ जानेवारी रोजी सिडनीमध्ये खेळला जाणार आहे. या मालिकेच्या इतिहासात सर्वाधिक बळी टिपणाऱ्या गोलंदाजांबाबत आपण जाणून घेऊया.
हेही वाचा : IPL 2026 ! एडन मार्करमने मानले LSG चे आभार! नव्या IPL हंगामाची करणार जोरदार सुरुवात
ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडमध्ये आतापर्यंत ३४५ अॅशेस सामने खेळवण्यात आले आहेत. ज्यामध्ये फलंदाज आणि गोलंदाज दोघांनी देखील उत्कृष्ट कामगिरी केली आहे. अॅशेसमध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या पाच खेळाडूंवर आपण एक नजर टाकूया.
शेन वॉर्न
ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फिरकी गोलंदाज शेन वॉर्न १९९३ ते २००७ दरम्यान ३६ अॅशेस सामने खेळला आहे, त्याने ७२ डावांमध्ये २३.२५ च्या सरासरीने १९५ बळी घेतले आहेत. या काळात वॉर्नने ११ वेळा एका डावात पाच किंवा त्याहून अधिक बळी घेण्याची किमया साधली आहे.
ग्लेन मॅकग्रा
यामध्ये दूसरा क्रमांक लागतो तो म्हणजे ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज ग्लेन मॅकग्राचा, त्याने ३० अॅशेस सामने खेळत सामन्यांमध्ये २०.९२ च्या सरासरीने १५७ बळी मिळवले अहते. या काळात मॅकग्राने एकूण ७,२८० चेंडू टाकले, यामध्ये त्याने ३,२८६ धावा दिल्या आहेत. त्याने १० वेळा एका डावात पाच बळी घेण्याची कामगिरी केली आहे.
स्टुअर्ट ब्रॉड
इंग्लंडचा वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडचा या यादीत तिसरा नंबर लागतो. हा वेगवान गोलंदाज २००९ ते २०२३ दरम्यान ४० कसोटी सामन्यांमध्ये २८.९६ च्या सरासरीने १५३ बळी घेत इंग्लंडसाठी अॅशेस मालिकेत आघाडीचा बळी घेणारा गोलंदाज राहिला आहे. या काळात ब्रॉडने आठ वेळा एका डावात ५ किंवा त्याहून अधिक बळी घेण्याची कामगिरी केली आहे.
हेही वाचा : भारताच्या फुटबॉलपटूंसाठी योग्य प्रशिक्षक गरजेचा! लोथर मॅथॉस यांचे खळबळजनक विधान
ह्यू ट्रंबल
ऑस्ट्रेलियन गोलंदाज ह्यू ट्रंबलने १८९० ते १९०४ दरम्यान इंग्लंडविरुद्ध ३१ कसोटी सामने खेळले आहेत, त्याने ५५ डावांमध्ये २०.८८ च्या सरासरीने १४१ बळी घेतले आहेत. ट्रंबलने नऊ डावांमध्ये किमान ५ बळी घेण्याची किमया साधली आहे.
डेनिस लिली
ऑस्ट्रेलियन या महान डेनिस लिली गोलंदाजाने १९७१ ते १९८२ दरम्यान इंग्लंडविरुद्ध २४ कसोटी सामने खेळलेले आहेत, यामध्ये त्याने २२.३२ च्या सरासरीने १२८ बळी टिपले आहेत. लिलीने या काळात ६,९९८ चेंडू टाकले आणि २,८५८ धावा मोजल्या आहेत.






