Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs IRE: आयर्लंडकडून पराभवानंतर टीम इंडियाला ICC रँकिंगमध्ये धक्का; अव्वल स्थान धोक्यात

India Lost Points in ICC Ranking After Defeat by Ireland by 2-0: आयर्लंडविरुद्धच्या पराभवानंतर, भारतीय संघाच्या आयसीसी क्रमवारीतही घसरण झाली आहे. संघ पहिल्या क्रमांकावर कायम असला तरी, भारत आणि इंग्लंड यांच्यातील रेटिंगचे अंतर कमी झाले आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Jun 29, 2026 | 03:36 PM
photo- social media

photo- social media

Follow Us
Follow Us:
  • टीम इंडियाला ICC रँकिंगमध्ये धक्का
  • भारत आणि इंग्लंड यांच्यात केवळ दहा रेटिंग गुणांचा फरक
  • अव्वल स्थान धोक्यात
आयर्लंडविरुद्धच्या दोन सामन्यांच्या टी-२० मालिकेत भारतीय संघाला दारुण पराभव पत्करावा लागला. या लाजिरवाण्या पराभवानंतर, संघाच्या आयसीसी ( ICC Rankings) क्रमवारीवर स्पष्टपणे परिणाम झाला आहे. सध्या टीम इंडिया आयसीसी टी-२० क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर असली तरी, तिच्या पॉईंट्समध्ये घसरण झाली आहे. टीम इंडियाला फक्त पराभवाचा नव्हे तर ICC रँकिंगमध्ये धक्का बसला आहे. यामुळे अव्वल स्थान धोक्यात येण्याची शक्यता आहे.

आयर्लंडने केला भारताचा सूपडा साफ, टीम इंडियाचा विजयी रथ थांबला! श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात 16 मालिका जिंकण्याचा विक्रम अखेर खंडित

आयर्लंडकडून पराभवानंतर टीम इंडियाचे रेटिंग घसरले

टीम इंडियाने आयर्लंडविरुद्धच्या टी-२० मालिका खेळण्याआधी आयसीसीसी क्रमवारीत २७५ रेटिंगसह अव्वस स्थानी होती. आता, आयर्लंडसारख्या लहान देशाकडून न सलग दोन सामने गमावूनही, संघ अजूनही पहिल्या क्रमांकावर कायम आहे, पण त्याचे रेटिंग घसरले आहे. आज, २९ जून रोजी, संघाचे रेटिंग २७२ पर्यंत घसरले आहे. याचा अर्थ, दोन सामने गमावल्यानंतर संघाने तीन रेटिंग गुण गमावले आहेत. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावरील संघांमधील अंतरही कमी झाले आहे.

भारत आणि इंग्लंड यांच्यात केवळ दहा रेटिंग गुणांचा फरक

आयसीसी टी२० क्रमवारीत इंग्लंड सध्या दुसऱ्या क्रमांकावर असून, त्यांचे रेटिंग २६२ आहे. याचा अर्थ त्यांच्यातील रेटिंगचा फरक केवळ दहा गुणांचा आहे. भारतीय संघ आता आपली पुढील मालिका इंग्लंडविरुद्ध खेळणार आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांची टी२० मालिका १ जुलैपासून सुरू होत आहे. याचा अर्थ आयसीसी टी२० क्रमवारीत पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावर असलेले संघ एकमेकांशी भिडतील.

भारतीय संघाचे अव्वल स्थानही धोक्यात

जर टीम इंडिया भारत विरुद्ध इंग्लंड टी-२० मालिका हरली तर, इंग्लंडला फायदा होईल. याचा अर्थ, दोन्ही संघांमधील केवळ दहा रेटिंग गुणांचे अंतर आणखी कमी होत जाईल आणि सध्या पहिल्या क्रमांकावर असलेला भारतीय संघ आपले अव्वल स्थान गमावू शकतो. त्यामुळे, आगामी मालिका अत्यंत महत्त्वाची असेल. ऑस्ट्रेलिया सध्या आयसीसी क्रमवारीत २६० रेटिंगसह तिसऱ्या स्थानावर आहे. म्हणजेच, जर इंग्लंड हरला, तर त्यांना तिसऱ्या स्थानावर जाण्याचा धोका आहे.

Women’s T20 World Cup 2026: भारत बाहेर, सेमीफायनलचे चित्र स्पष्ट! ४ संघ भिडणार; कधी आणि कुठे रंगणार लढती?

Web Title: Icc t20 rankings team india rating drop india vs ireland england series

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 29, 2026 | 03:36 PM

Topics:  

  • ICC Ranking
  • ind vs ire
  • indian cricket team
  • Ireland Cricket Team

संबंधित बातम्या

AFG vs IRE: अटल-जादरानने गाजवलं मैदान! अफगाणिस्तानचा आयर्लंडवर दणदणीत विजय; मालिकाही घातली खिशात
1

AFG vs IRE: अटल-जादरानने गाजवलं मैदान! अफगाणिस्तानचा आयर्लंडवर दणदणीत विजय; मालिकाही घातली खिशात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.