Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 11 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ICC Womens T20 World Cup: टीम इंडियाला मोठा धक्का! हवेत कॅच पकडणारी ‘ती’ स्टार खेळाडू जखमी, स्पर्धेतून बाहेर होणार?

Shreyanka Patil Got Injured During Ind W vs Ned W Match: महिला टी- २० विश्वचषकातील नेदरलँड्सविरुद्धच्या सामन्यात क्षेत्ररक्षण करताना स्टार अष्टपैलू खेळाडू जखमी जाली आहे. तिला स्ट्रेचरवरुन मैदानाबाहेर नेण्यात आले.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Jun 18, 2026 | 04:38 PM
ICC Womens T20 World Cup: टीम इंडियाला मोठा धक्का! हवेत कॅच पकडणारी ‘ती’ स्टार खेळाडू जखमी, स्पर्धेतून बाहेर होणार?
Follow Us
Follow Us:
  • टीम इंडियाला मोठा धक्का
  • श्रेयंका पाटील जखमी
  • स्ट्रेचरवरून मैदानाबाहेर
आयसीसी महिला टी-२० विश्वचषक २०२६ मध्ये भारतीय संघाने दमदार कामगिरी केली आहे. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील संघाने नेदरलँड्सला ९५ धावांनी पराभूत करून या स्पर्धेत आपला सलग दुसरा विजय नोंदवला. मात्र, स्पर्धेदरम्यान भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. स्टार अष्टपैलू खेळाडू श्रेयंका पाटील जखमी झाली आहे. बुधवारी (दि. १७ जून) नेदरलँड्सविरुद्धच्या सामन्यात क्षेत्ररक्षण करताना तिच्या पायाला दुखापत झाली. विश्वचषक स्पर्धेत आतापर्यंत श्रेयंकाला फलंदाजी किंवा गोलंदाजी करण्याची फारशी संधी मिळालेली नाही.

TG20 लीगवर मोठा वाद; विजय देवरकोंडा, सिराज आणि तिलक वर्माला कायदेशीर नोटीस

बुधवारी (दि. १७) महिला टी-२० विश्वचषक स्पर्धेत भारत आणि नेदरलँड्स यांच्यात सामना झाला. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने २०९ धावा केल्या. सलामीवीर स्मृती मंधाना आणि शफाली वर्मा या दोघींनी अर्धशतके झळकावली. २१० धावांच्या लक्ष्याला पाठलाग करताना, नेदरलँड्सचा संघ पूर्ण १० षटके फलंदाजी करू शकला नाही आणि ११४ धावांवर सर्वबाद झाला.

श्रेयंका पाटील जखमी

ही घटना नेदरलँड्सच्या डावाच्या सहाव्या षटकात घडली, जेव्हा श्रेयंका तिचे पहिले षटक टाकण्यासाठी आली होती. फलंदाज फोबी मोल्केनबोअरने एक हलका चेंडू लेग साईडला खेळला. श्रेयंका पटकन चेंडूच्या दिशेने गेली आणि तो उचलून फेकण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नात तिचा तोल गेला आणि तिच्या उजव्या घोट्याला गंभीर दुखापत झाली. वेदना इतक्या तीव्र होत्या की ती स्वतःच्या पायावर उभीही राहू शकली नाही. फिजिओ मैदानावर पोहोचले, पण दुखापतीची तीव्रता पाहता श्रेयंकाला स्ट्रेचरवरून मैदानाबाहेर नेण्यात आले. तिच्या जागी शफाली वर्माने त्या षटकातील उरलेले पाच चेंडू टाकले. या दुखापतीमुळे श्रेयंका संपूर्ण स्पर्धेतून बाहेर पडण्याची शक्यता आहे.

सामनावीर शफाली वर्माने श्रेयंका पाटीलच्या दुखापतीबद्दल माहिती दिली. ती म्हणाली, “तिला स्कॅनसाठी नेण्यात आले आहे. बीसीसीआयचे डॉक्टर तिच्यावर उपचार करत आहेत.” तिच्या दुखापतीच्या तीव्रतेबद्दल अद्याप कोणतीही अधिकृत माहिती जाहीर करण्यात आलेली नसली तरी, ज्या पद्धतीने ती मैदानाबाहेर गेली, त्यामुळे भारतीय संघासाठी निश्चितच चिंता वाढली आहे.

बीसीसीआयने जारी केले निवेदन

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) या प्रकरणी एक निवेदन जारी करत म्हटले आहे की, ‘नेदरलँड्सविरुद्धच्या सामन्यादरम्यान, क्षेत्ररक्षण करताना श्रेयंका पाटील जखमी झाली. यानंतर, तिला स्ट्रेचरवरून मैदानाबाहेर बाहेर नेण्यात आले. श्रेयंका लवकरात लवकर बरा व्हावा अशी आमची प्रार्थना आहे.’

🚨 𝗨𝗣𝗗𝗔𝗧𝗘 Shreyanka Patil picked up an injury while attempting to field the ball and was stretchered off the field. We wish her a speedy recovery as we wait for further updates. pic.twitter.com/k7upvdRDJh — BCCI Women (@BCCIWomen) June 17, 2026

भारतीय संघाने आतापर्यंत आपले दोन्ही सामने जिंकले असून सध्या तो ‘अ’ गटात अव्वल स्थानावर आहे. टीम इंडियाने पहिल्या सामन्यात पाकिस्तानला ६४ धावांनी आणि दुसऱ्या सामन्यात नेदरलँड्सला ९५ धावांनी पराभूत केले. दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियासारख्या बलाढ्य संघांविरुद्धच्या आगामी सामन्यांपूर्वी भारतीय संघासाठी श्रेयंकाची तंदुरुस्ती अत्यंत महत्त्वाची आहे.

Vaibhav Sooryavanshi: वैभव सूर्यवंशी अन् श्रीलंकन खेळाडूचा ‘तो’ राडा; BCCI ने दिली प्रतिक्रिया, कारवाई होणार?

Web Title: Icc women t20 world cup 2026 shreyanka patil injury india vs netherlands match update

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 18, 2026 | 04:37 PM

Topics:  

  • Harmanpreet Kaur
  • ICC T20 World Cup 2026
  • ICC Women's T20 World Cup
  • Indian women team
  • Women T-20 World Cup

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.