Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ENG W Vs SA W: साऊथ आफ्रिका की इंग्लंड? फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध कोण शड्डू ठोकणार? आज फैसला

पहिल्या सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने वेस्ट इंडिजचा पराभव केला आहे. आजच्या सामन्यात जो संघ जिंकेल, तो ५ जुलै रोजी लॉर्ड्सवर ऑस्ट्रेलियाविरुद्ध विजेतेपदासाठी मैदानात उतरेल.

  • By तेजस भागवत
Updated On: Jul 02, 2026 | 02:48 PM
ENG W Vs SA W: साऊथ आफ्रिका की इंग्लंड? फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध कोण शड्डू ठोकणार? आज फैसला
Follow Us
Follow Us:
  • आज इंग्लंड विरुद्ध साऊथ आफ्रिका दुसरी सेमीफायनल
  • सेमीफायनल जिंकणारा संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळणार
  • दक्षिण आफ्रिकेने 5 पैकी जिंकले 4 सामने 
South Africa womens Vs England Womens Semi final 2026: आयसीसी महिला टी 20 वर्ल्डकप 2026 चा थरार अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. आज या स्पर्धेची दुसरी सेमीफायनल खेळवली जाणार आहे. ऑस्ट्रेलियाचा संघ आधीच फायनलमध्ये दाखल झाला आहे. आज दुसरी सेमीफायनलमध्ये इंग्लंड विरुद्ध साऊथ आफ्रिकेचा संघ खेळणार आहे. लंडनच्या ऐतिहासिक ‘द किया ओव्हल’ मैदानावर टूर्नामेंटचा दुसरा सेमीफायनल सामना खेळवला जाणार आहे.

पहिल्या सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने वेस्ट इंडिजचा पराभव केला आहे. आजच्या सामन्यात जो संघ जिंकेल, तो ५ जुलै रोजी लॉर्ड्सवर ऑस्ट्रेलियाविरुद्ध विजेतेपदासाठी मैदानात उतरेल. त्यामुळे दोन्ही संघांसाठी हा सामना ‘करो या मरो’ असा असणार आहे. आज रात्री हा सामना भारतीय वेळेनुसार 11 वाजता सुरू होणार आहे. इंग्लंड महिला संघाने ग्रुप स्टेजमध्ये अप्रतिम कामगिरी केली आहे. एकही सामना न गमावता सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे.

सामन्याचे तपशील

सामना – इंग्लंड महिला विरुद्ध दक्षिण आफ्रिका महिला

तारीख – गुरुवार, २ जुलै २०२६

AUS W vs WI W: ऑस्ट्रेलियाची फायनलमध्ये दणदणीत एन्ट्री; वेस्ट इंडिजचा 8 विकेट्सनी धुव्वा, सातव्या किताबापासून फक्त एक पाऊल दूर

इंग्लंडने सर्व साखळी सामने जिंकले आहेत. त्यांनी ग्रुप स्टेजमधील सर्व ५ सामने जिंकून सेमीफायनलमध्ये धडक मारली आहे. इंग्लंडची कर्णधार नॅट सायव्हर-ब्रंट दुखापतग्रस्त झाली होती. मात्र आजच्या सेमीफायनलमध्ये खेळण्यासाठी ती पूर्णपणे तंदुरुस्त झाली आहे. दुसरीकडे, दक्षिण आफ्रिकेच्या संघाने स्पर्धेच्या सुरुवातीला ऑस्ट्रेलियाकडून पराभव पत्करल्यानंतर जबरदस्त पुनरागमन केले आहे. त्यांनी मागील ५ पैकी ४ सामने जिंकून  सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे.

ऑस्ट्रेलियाची फायनलमध्ये दणदणीत एन्ट्री

महिला टी२० विश्वचषक २०२६ (Womens t 20 world Cup 2026) आता निर्णायक टप्प्यावर पोहोचला आहे. ऑस्ट्रेलियाने स्पर्धेच्या पहिल्या सेमिफायनल सामन्यात वेस्ट इंडिजचा ८ विकेट्सने धुव्वा उडवला. या विजयासह त्यांनी फायनलमध्ये धडक मारली आहे. प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिजने ऑस्ट्रेलियासमोर १२६ धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात, ऑस्ट्रेलियाने केवळ १३ षटकांत दोन विकेट्स गमावून लक्ष्य गाठले.

IND vs IRE: टीम इंडियाला रडवणारा गोलंदाज नोकरीच्या शोधात; जय मुंद्राचे LinkedIn प्रोफाइल चर्चेत

सलामीवीर बेथ मूनीने ३६ चेंडूंमध्ये नाबाद ६१ धावा करून शानदार फलंदाजी केली आणि संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. वेस्ट इंडिजकडून हेली मॅथ्यूज आणि शिनेल हेन्री यांनी प्रत्येकी एक विकेट घेतला. ऑस्ट्रेलिया आता, ५ जुलै रोजी होणाऱ्या फायनलमध्ये दुसऱ्या सेमिफायनल सामन्याच्या विजेत्या संघाशी भिडेल. ऑस्ट्रेलियाकडे ७ व्यांदा विजेतेपद जिंकण्याची संधी आहे.

Web Title: Icc womens t20 world cup south africa vs england semi final 2026 final against austrelia

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 02, 2026 | 02:45 PM

Topics:  

  • cricket news
  • England vs South Africa
  • Womens T20 World Cup

संबंधित बातम्या

Cricket: ८० रन्सची तुफानी खेळी अन् सलग दुसरा विजय! ‘रायझिंग स्टार ब्ल्यू’ चा दणदणीत पराक्रम
1

Cricket: ८० रन्सची तुफानी खेळी अन् सलग दुसरा विजय! ‘रायझिंग स्टार ब्ल्यू’ चा दणदणीत पराक्रम

IND vs WI T20: अरे देवा! लखनऊ स्टेडियमजवळ भरलं पाणी, सामन्यावर काय होणार परिणाम? 200+ चा आकडा करणार का पार
2

IND vs WI T20: अरे देवा! लखनऊ स्टेडियमजवळ भरलं पाणी, सामन्यावर काय होणार परिणाम? 200+ चा आकडा करणार का पार

IND vs NZ: पुढच्या आठवड्यात होणार न्यूझीलंड दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा, प्रज्ञान ओझाच्या हाती खेळाडूंच्या नशिबाची दोर
3

IND vs NZ: पुढच्या आठवड्यात होणार न्यूझीलंड दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा, प्रज्ञान ओझाच्या हाती खेळाडूंच्या नशिबाची दोर

Irani Cup 2026: स्मरणचा शतकी धडाका अन् मुकेशचा बॉलिंग हल्लाबोल! रेस्ट ऑफ इंडियाचा दणदणीत विजय; जम्मू-काश्मीरला १६७ धावांनी लोळवलं
4

Irani Cup 2026: स्मरणचा शतकी धडाका अन् मुकेशचा बॉलिंग हल्लाबोल! रेस्ट ऑफ इंडियाचा दणदणीत विजय; जम्मू-काश्मीरला १६७ धावांनी लोळवलं

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.