फोटो सौजन्य - बीसीसीआय वूमन
India vs Australia Toss Update : भारतीय महिला संघाचा चौथा सामना हा ऑस्ट्रेलियाविरुद्ध होत आहे, टीम इंडियाने कमालीची कामगिरी मागील दोन सामन्यामध्ये केली आहे. पण दक्षिण आफ्रकेविरुद्ध झालेल्या सामन्यामध्ये भारताच्या संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. आज भारतासमोर त्याहून मोठे आव्हान असणार आहे. ऑस्ट्रेलियाच्या संघाने आतापर्यत एकही सामना गमावलेला नाही. त्याचा श्रीलंकेविरुद्ध सामना पावसामुळे सामना रद्द झाला होता. आजचा सामन्यामध्ये भारतीय संघाला कमबॅक करण्याची संधी आहे.
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया या सामन्यात ऑस्ट्रेलियाची कर्णधार एलिसा हिलीने नाणेफेक जिंकूल पहिले फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. भारताच्या संघाला ऑस्ट्रेलियाविरुद्ध कमबॅक करण्याची संधी आहे. आज विशेषत: स्मृती मानधना आणि हरमनप्रीत कौर यांच्या कामगिरीवर नजर असणार आहे, मागील तीन सामन्यामध्ये या दोघीनीही फार चांगली कामगिरी केली नाही. भारतीय संघाने प्लेइंग 11 मध्ये कोणताही बदल केला नाही.
World Cup 2025. Australia won the toss and elected to Bowl. https://t.co/VP5FlL3pWw #INDvAUS #CWC25 #TeamIndia — BCCI Women (@BCCIWomen) October 12, 2025
स्मृती मानधना हिच्याकडून भारतीय क्रिकेट चाहत्यांना मोठ्या अपेक्षा होत्या त्यामुळे स्मृती आज कशी कामगिरी करेल याकडे सर्वाचे लक्ष असणार आहे. मागील सामन्यामध्ये ऋचा घोष हिने 94 धावांची खेळी खेळली होती पण इतर खेळाडूंची तीला साथ मिळाली नाही. भारताच्या संघाला सेमीफायनलमध्ये जाण्यासाठी या स्पर्धेमध्ये कमबॅक करणे गरजेचे आहे. आजच्या सामन्यामध्ये भारताच्या संघाला पहिले फलंदाजी करत मोठी धावसंख्या उभारावी लागणार आहे.
IND vs WI : कुलदीपच्या नावावर पंजा तर जडेजा घेतले तीन विकेट! 248 धावांवर वेस्ट इंडिजला गुंडाळलं
महिला एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आतापर्यंत ५९ सामने खेळले गेले आहेत, त्यापैकी ऑस्ट्रेलियाने ४८ सामने जिंकले आहेत, तर टीम इंडियाला फक्त ११ सामने जिंकता आले आहेत. परिणामी, ऑस्ट्रेलियाचा संघ टीम इंडियावर वरचढ असल्याचे दिसून येते. टीम इंडिया सध्या पॉइंट्स टेबलमध्ये तिसऱ्या स्थानावर आहे, तर ऑस्ट्रेलिया दुसऱ्या स्थानावर घसरला आहे.
स्मृती मानधना, प्रतिका रावल, हरलीन देओल, हरमनप्रीत कौर (कर्णधार), जेमिमा रोड्रीक्स, दिप्ती शर्मा, ऋचा घोष (विकेटकिपर), स्नेह राणा, अमनजोत कौर, क्रांती गौड, श्री चरणी
एलिसा हीली (कर्णधार)(विकेटकीपर), फोबी लिचफिल्ड, एलिस पेरी, बेथ मूनी, अॅनाबेल सदरलँड, अॅशले गार्डनर, ताहलिया मॅकग्रा, किम गार्थ, अलाना किंग, मेगन शट, सोफी मोलिनेक्स