फोटो सौजन्य - BCCI सोशल मीडिया
भारत विरुद्ध बांग्लादेश : कालपासून म्हणजेच १९ सप्टेंबर भारत विरुद्ध बांग्लादेश यांच्यामध्ये कसोटी सामन्याला सुरुवात झाली आहे. यामध्ये भारताचा संघ सामन्याच्या सुरुवातीला डगमगला होता. भारताचे सर्व अनुभवी खेळाडू दुहेरी अंक गाठू शकले नव्हते त्यामुळे संघ चिंतेत होता. भारताचा युवा सलामीवीर फलंदाज यशस्वी जयस्वालने दमदार कामगिरी करत भारताच्या संघाचा खेळ सांभाळला होता. परंतु त्यांचे अर्धशतक झाल्यानंतर त्याने त्याची विकेट गमावली आणि भारत पुन्हा अडचणीत सापडला. त्यांनतर ऋषभ सुद्धा संघासाठी मोठी कामगिरी करू शकला नाही आणि केएल राहूलने सुद्धा लवकर त्याची विकेट गमावली.
१४४ धावांवर भारताच्या संघाने ६ विकेट्स गमावले होते. यावेळी भारताचा संघ सामन्यामध्ये पुनरागमन केले असे वाटले नव्हते. परंतु भारताचे दोन दमदार अष्टपैलू रविचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजाने मैदानावर धुमाकूळ घातला आणि पहिल्या दिवसाचा खेळ भारताच्या नावावर केला. भारताचे १९ सप्टेंबरच्या स्टार फलंदाज रविचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजाने कमालीची फलंदाजी करत भारताचा खेळ उंचावला आणि भारताच्या संघाने ३०० चा आकडा पार केला. भारताचा फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विनने भारतासाठी १३३ चेंडूंमध्ये ११३ धावा केल्या, तर रवींद्र जडेजाने भारतासाठी १२४ चेंडूंमध्ये ८६ धावा केल्या. भारताच्या संघाने या दोघांच्या जोरावर ३७६ धावांची धावसंख्या पहिल्या इनिंगमध्ये उभी केली आहे.
Innings Break! A mammoth 199 run partnership between @ashwinravi99 (113) & @imjadeja (86) steers #TeamIndia to a first innings total of 376. Scorecard – https://t.co/jV4wK7BgV2… #INDvBAN@IDFCFIRSTBank pic.twitter.com/UWFcpoxN9U — BCCI (@BCCI) September 20, 2024
भारताच्या संघामध्ये दमदार गोलंदाजांचा समावेश आहे. मोहम्मद सिराज आणि जसप्रीत बुमराह यांच्यावर भारतीय क्रिकेट प्रेमींच्या नजरा असणार आहेत. त्यामुळे भारताचे गोलंदाज कोणती कमाल करून दाखवतात हे पाहणं महत्वाचं ठरेल. लेख लिहिता लिहिला भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह बांग्लादेशच्या एका फलंदाजाला पॅव्हेलियनमध्ये पाठवले आहे. शादमान इस्लाम हा जसप्रीत बुमराहच्या वेगवान चेंडूंसमोर टिकू शकला नाही.






