यशस्वी जयस्वाल(फोटो-सोशल मिडिया)
IND Vs ENG : भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळवण्यात येत आहे. या मालिकेतील लीड्स येथील पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंडने भारतचा ५ विकेट्सने पराभव केला आहे. या सामन्यात भारताचे क्षेत्ररक्षण खूपच खराब राहिले होते. त्याचा फटका भारताला बसला. त्यामुळे दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी क्षेत्ररक्षणाबाबत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. खरंतर, टीम इंडियाचा सलामीवीर यशस्वी जयस्वालला स्लिप पोझिशनवरून काढून टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
एजबॅस्टनमधून आलेल्या वृत्तांनुसार, यशस्वी जयस्वाल दुसऱ्या कसोटी सामन्यात स्लिप क्षेत्रात क्षेत्ररक्षण करताना दिसणार नाही. यात एक विशेष गोष्ट म्हणजे त्याच्या जागी साई सुदर्शनला स्लिप क्षेत्रात संधी देण्यात येण्याचे निश्चित मानले जात आहे. पहिल्या कसोटी सामन्यात यशस्वी जयस्वालकडून एकूण ४ झेल सोडण्यात आहेत. त्यापैकी त्याने यष्टीमागे तीन झेल सोडले आहेत. क्षेत्ररक्षणाची स्थिती बदलणे ही मोठी गोष्ट नसली तरी, वेळ आणि ज्या पद्धतीने हा निर्णय घेतला गेला आहे, त्यामुळे हा निर्णय एकप्रकारे जयस्वालविरुद्धची कारवाई असल्याचे बोलले जात आहे.
रेव्हस्पोर्ट्सने दिलेल्या वृत्तानुसार, यशस्वी जयस्वाल आता स्लिपमध्ये क्षेत्ररक्षण करताना दिसणार नसून त्याच्या जागी साई सुदर्शन, करुण नायर स्लिपमध्ये उभे दिसणार आहेत. पहिल्या कसोटीत करुण नायर देखील स्लिपमध्ये होता, पण दुसऱ्या कसोटीत साई सुदर्शनकडे ही जबाबदारी देण्यात आल्याचे बोलले जात आहे. सोमवारी या खेळाडूंनी स्लिप कॅचिंगचा सराव केला. त्यांच्याशिवाय नितीश कुमार रेड्डी आणि शुभमन गिल देखील स्लिप कॅचचा सराव करताना दिसून आले आहेत. तसेच सलामीवीर केएल राहुल देखील स्लिप फिल्डिंगचा सराव करताना दिसला.
दुसरीकडे, यशस्वी जयस्वालचा सहाय्यक प्रशिक्षक रायन टेन दोसकाथे आणि गौतम गंभीर यांनी फिल्डिंगचा सराव करून घेतला आहे. जयस्वालला फ्लॅट कॅच सेशन देण्यात असून ज्यावरून असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे की, तो शॉर्ट लेग किंवा सिनी पॉइंटवर फिल्डिंग करताना दिसण्याची शक्यता आहे.
लीड्स येथे खेळवण्यात पहिल्या कसोटी सामन्यात, जयस्वालने पहिल्या डावात ऑली पोपचा कॅच सोडला, ज्याने नंतर शतक ठोकले होते. त्याने पहिल्या डावात अर्धशतक आणि दुसऱ्या डावात शतक करणाऱ्या बेन डकेटचा देखील महत्वाचा कॅच सोडला होता. पहिल्या डावात, त्याने हॅरी ब्रूकचा कॅच सोडला, ज्याने पहिल्या डावात 99 धावा करून भारताला अडचणीत आणले. जयस्वालच्या या खराब क्षेत्ररक्षणामुळे टीम इंडियाचे मोठे नुकसान झाले आहे. परिणामी भारताला लीड्स कसोटीत पराभवाला सामोरे जावे लागले.
हेही वाचा : Virat Kohli : विराटनंतर ‘ज्युनियर कोहली’ मैदानात! ‘या’ लीगमध्ये दाखवणार आपली जादू..