गौतम गंभीर(फोटो-सोशल मीडिया)
IND vs ENG 4th Test : भारत आणि इंग्लंड यांच्यात चौथा कसोटी सामना मँचेस्टर येथे खेळला जात आहे. प्रथम फलंदाजी करत भारताने सर्वबाद ३५८ धावा केल्या आहेत. प्रतिउत्तरात इंग्लंडने शानदार फलंदाजी करत जो रूटचे दीड शतक आणि कर्णधार बेन स्टोक्सच्या जोरावर ३५८ धावा पार करून ६४३ धावा केल्या आहेत. यासोबत इंग्लंडने २८५ धावांची आघाडी घेतली आहे. यामुळे भारत आता पराभवाच्या छायेत असल्याचे दिसत आहे. असे असले तरी भारताचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर खुश असल्याचे दिसत आहे. गौतम गंभीरसाठी आजचा दिवस विशेष आहे. 26 जुलै हा गौतम गंभीरसाठी खाजगी आयुष्यातील मोठा दिवस आहे. कारण आज त्याची पत्नी नताशा जैनचा वाढदिवस आहे. यासाठी गौतम गंभीर सोशल मीडियावर एक पोस्ट देखील शेअर केली आहे. यामध्ये त्याने आपल्या पत्नी नताशाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत.
हेही वाचा : FIDE Women’s World Cup : जेतेपद भारतालाच मिळणार! दिव्या-कोनेरू आमनेसामने; आज रंगणार सामना
भारताचा मुख्य कोच गौतम गंभीरने पत्नी नताशा जैनसोबतचा एक फोटो ढेकर केला आहे. तसेच त्याने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, “वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा नताशा.. तू माझ्या आयुष्याला अर्थ देतेस.” गौतम गंभीर आणि नताशा यांनी 28 ऑक्टोबर 2011 रोजी विवाह केला आहे. नताशा एका मोठ्या उद्योगपतीची मुलगी असून लग्नापूर्वी गंभीर आणीन नताशा हे दोघेही चांगले मित्र होते. त्यानंतर या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं आणि अखेर दोघांनी लग्नगाठ बांधली. नताशा जैन सोशल मीडियावर खूप सक्रीय असल्याचे दिसते. तसेच ती नेहमी आपला पती गौतम गंभीरसोबत फोटो शेअर करत असते. या दोघांना दोन मुली आहेत. एकाचं नाव अजीन आणि एकाचं नावा अनाइजा असे आहे.
हेही वाचा : विश्वचषकापूर्वी भारतीय महिला संघाला मोठा झटका! वेदा कृष्णमूर्तीने केला क्रिकेटला अलविदा..
इंग्लंडने चौथ्या दिवशी देखील खेळ अद्याप आपला डाव घोषित केलेला नाही. इंग्लंड ६४३ धावांवर खेळत आहे. कर्णधार बेन स्टोक्स १३१ धावांवर खेळत आहे तर कार्स ३५ वर नाबाद आहे. पहिल्या डावात इंग्लडने २८५ धावांची आघाडी घेतली आहे.
भारत आणि इंग्लंड यांच्यात मँचेस्टर येथे चौथा कसोटी सामना खेळला जात आहे. या सामन्यात जसप्रीत बुमराहने मोठी कामगिरी केली आहे. त्याने इंग्लंडचा यष्टिरक्षक फलंदाज जेमी स्मिथला बाद करून एक विक्रम रचला आहे. जसप्रीत बुमराह इंग्लंडविरुद्ध इंग्लंडमध्ये ५० बळी घेणारा पहिला भारतीय गोलंदाज ठरला आहे. जगातील नंबर १ कसोटी गोलंदाज असणाऱ्या जसप्रीत बुमराहने या सामन्यात १९ चेंडूत नऊ धावा देऊन जेमी स्मिथला बाद करून आपला पहिला बळी टिपला. या विकेटसह त्याने आपले ५० बळी देखील पूर्ण केले.