वेदा कृष्णमूर्ती(फोटो-सोशल मीडिया)
Veda Krishnamurthy announces retirement from cricket : भारतीय महिला क्रिकेट संघाची अनुभवी फलंदाज वेदा कृष्णमूर्तीने शुक्रवारी सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. एकदिवसीय विश्वचषकाच्या दोन महिने आधीच वेदाने क्रिकेटला अलविदा म्हटले आहे. वेदा कृष्णमूर्तीने सोशल मीडियाद्वारे निवृत्तीची घोषणा जाहीर केली आहे.
वेदा कृष्णमूर्ती बऱ्याच काळापासून भारतीय संघाचा एक महत्वाचा भाग आहे. सोशल मीडियावर निवृत्तीची जाहीर करताना लिहिले की, “लहान शहरातील मुलगी असल्याने, माझा प्रवास कदूरच्या रस्त्यांपासून सुरू झाला आहे. जेव्हा मी पहिल्यांदा बॅट उचलली तेव्हा मला हा खेळ खूपच आवडला. मला माहित नव्हते की हा प्रवास मला कुठे घेऊन जाणार आहे. पण आज जेव्हा मी मागे वळून पाहतो तेव्हा मला अभिमान वाटतो की मी देशासाठी खेळली आहे.”
वेदाने पुढे म्हटले आहे की, “क्रिकेट माझ्यासाठी फक्त एक खेळ नव्हता, तर तो माझी ओळख बनला आहे. त्याने मला जीवनातील आव्हानांशी लढायला शिकवले, पराभव स्वीकारायला आणि पुन्हा उभे राहण्यास शिकवले. आता या सुंदर अध्यायाला निरोप देण्याची वेळ येऊन ठेपली आहे.” यावेळी तिने बीसीसीआय, कर्नाटक राज्य क्रिकेट संघटना (केएससीए), रेल्वे, कर्नाटक क्रिकेट संस्था (केआयओसी), तिचे प्रशिक्षक, पालक आणि कुटुंब यांचे आभार मानलेन आहेत. ज्यांनी तिला प्रत्येक पावलावर साथ आणि पाठिंबा दिलाया आहे.
From a small-town girl with big dreams to wearing the India jersey with pride.
Grateful for everything cricket gave me the lessons, the people, the memories.
It’s time to say goodbye to playing, but not to the game.
Always for India. Always for the team. 🇮🇳 pic.twitter.com/okRdjYuW2R— Veda Krishnamurthy (@vedakmurthy08) July 25, 2025
वेदाने तिच्या सहकाऱ्यांबद्दल लिहिले की, “आम्ही एकत्र अनेक संस्मरणीय क्षण सोबत घालवले आहेत. विजयाचा आनंद, पराभवाचा धडा आणि खूप मजा देखील केली आहे. तुम्ही फक्त सहकारी खेळाडू नव्हतात, तर माझ्या कुटुंबासारखेच होता” वेदा कृष्णमूर्तीने स्थानिक पातळीवर खेळताना कर्नाटक आणि रेल्वेचे नेतृत्व केले आहे. यासोबत तिने दोन्ही संघांसाठी उत्कृष्ट कामगिरी देखील केली आहे. तिने लिहिले की या संघांचे नेतृत्व करणे माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट राहिली आहे. या अनुभवाने मला एक चांगला खेळाडू आणि माणूस बनवले असल्याचे वेदाने म्हटले आहे.
हेही वाचा : IND vs ENG Test : अचानक संघात स्थान मिळाल्यानंतर खेळाडूला विश्वास बसेना…निवड झाल्याबद्दल जगदीशनने सोडले मौन!
आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत, वेदाने भारतासाठी ४८ एकदिवसीय सामने खेळले आहेत. ज्यामध्ये तिने ८२९ धावा फटकावल्या आहेत. यामध्ये तिने ८ अर्धशतके झळकावली आहेत. तिची ७१ ही सर्वोच्च धावसंख्या राहिली आहे. याशिवाय, तिने ७६ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये ८७५ धावा काढल्या आहेत. ज्यामध्ये तिने २ अर्धशतके लगावली आहेत. ती २०१७ च्या महिला एकदिवसीय विश्वचषक आणि २०२० च्या महिला टी-२० विश्वचषकाच्या उपविजेत्या भारतीय संघाचा भाग राहिली आहे.