कोनेरू हम्पी आणि दिव्या देशमुख(फोटो-सोशल मीडिया)
FIDE Women’s World Cup : फिडे महिला विश्वचषकाच्या अंतिम फेरीत भारताच्या दोन स्टार खेळाडू कोनेरू हम्पी आणि दिव्या देशमुख आमनेसामने येणार आहेत. अंतिम फेरीत दोन भारतीय खेळाडूंचा सामना रंगण्याची भारतीय बुद्धिबळ आणि या स्पर्धेच्या इतिहासातील पहिलीच वेळ ठरली आहे. त्यामुळे, अंतिम फेरीत कोणीही जिंकले, तरी विजेतेपद निश्चितच भारतात येणार आहे. कोनेरू हम्पी ही अनुभवी ग्रँडमास्टर असून तिने उपांत्य फेरीत चीनच्या टिंगजी लेई हिचा टायब्रेकरमध्ये पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश मिळवला. दुसरीकडे, केवळ १९ वर्षीय दिव्या देशमुखने चीनच्या माजी विश्वविजेत्या झोंगी टॅनवर मात करत अंतिम फेरीत प्रवेश केला. दिव्याची ही स्पर्धा अतिशय उल्लेखनीय ठरली आहे.
हेही वाचा : विश्वचषकापूर्वी भारतीय महिला संघाला मोठा झटका! वेदा कृष्णमूर्तीने केला क्रिकेटला अलविदा..
तिने तीन टॉप १० खेळाडूंना पराभूत केले आहे. विशेष म्हणजे, चीनच्या दुसऱ्या मानांकित झू जिनर हिच्यावर विजय मिळवत तिने स्वतःची ताकद सिद्ध केली. या स्पर्धेद्वारे दोन्ही खेळाडूंनी पुढील वर्षी होणाऱ्या महिला उमेदवार स्पर्धेसाठी आपली पात्रता निश्चित केली आहे. ही उमेदवार स्पर्धा आगामी महिला जागतिक अजिंक्यपदासाठी चीनच्या विद्यमान विश्वविजेत्या वेनजुन जू हिला आव्हान देणारी स्पर्धक ठरवेल.
बुद्धिबळ प्रेमीसाठी हा सर्वात आनंदाचा क्षण आहे कारण आता विजेतेपद निश्चितच भारताकडे जाईल. पण अर्थातच एक खेळाडू म्हणून, अंतिम सामना देखील खूप कठीण असेल. दिव्याने या संपूर्ण स्पर्धेत खूप चांगली कामगिरी केली आहे.
मला फक्त थोडी झोप आणि जेवणाची गरज आहे. आजकाल काळजीत आहे. मला वाटते की मी आणखी चांगली खेळू शकली असती. मी काही चुका केल्या अन्यथा मी आणखी सहजपणे जिंकू शकली असती. भविष्यात त्या चुका टाळण्याचे प्रयत्न करेल.
हेही वाचा : IND vs ENG Test : अचानक संघात स्थान मिळाल्यानंतर खेळाडूला विश्वास बसेना…निवड झाल्याबद्दल जगदीशनने सोडले मौन!
शनिवारी होणाऱ्या अंतिम फेरीत दोन क्लासिकल सामने खेळले जातील. जर या दोन सामन्यांत विजेता निश्चित झाला नाही, तर टायब्रेकरद्वारे अंतिम निर्णय घेतला जाईल. विजेत्याला ५०,००० अमेरिकन डॉलर्स, तर उपविजेत्याला ३५,००० अमेरिकन डॉलर्स इतकी रोख पारितोषिकं मिळणार आहेत.