रोहित शर्मा(फोटो-सोशल मीडिया)
IND vs ENG : भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका सुरु आहे. या मालिकेतील पाचवा सामना ओव्हल येथे खेळला जात आहे. पहिल्या डावात भारताने २२४ धावा केल्या होत्या, तर प्रतिउत्तरात इंग्लंडने २४७ धावा करून २३ धावांची आघाडी घेतली होती. तर भारताने दुसऱ्या डावात आतपर्यंत ६ विकेट्स गमावून २७८ धावा केल्या आहेत. जडेजा आणि सुंदर मैदानावर उभे आहेत. दरम्यान पाचव्या सामन्याच्या तिसऱ्या दिवशी रोहित शर्मा केनिंग्टन ओव्हल स्टेडियमवर दिसून आला आहे. या कसोटी मालिकेपूर्वी रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. निवृत्ती घेतल्यानंतर, रोहित शर्मा आता भारतीय संघाचे मनोबल वाढवताना दिसून येत आहे.
अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफीमध्ये भारतीय संघ २-१ ने पिछाडीवर असून ओव्हल कसोटी सामना भारताला जिंकावाच लागणार आहे. अन्यथा भारताला ही मालिका गमवावी लागेल. हा सामना जर भारताने जिंकला तर मालिका बरोबरीत सुटेल. ज्यासाठी शुभमन गिल आणि कंपनीला स्कोअरबोर्डवर ३०० पेक्षा जास्त धावा कराव्या लागणार आहे.
हेही वाचा : ‘कधीकधी अंतर तुम्हाला..’, फुलराणीचा चाहत्यांना सुखद धक्का; सायना नेहवाल आणि पती पारुपल्ली कश्यप पुन्हा एकत्र
रोहित शर्मा पाचव्या कसोटी सामन्यादरम्यान ओव्हल स्टेडियमवर पोहोचला आहे. तथापि, जेव्हा कॅमेरा त्याच्याकडे वळला आणि त्याचे रेकॉर्डिंग सुरू झाले तेव्हा रोहित शर्मा थोडा अस्वस्थ झाल्याचे दिसून आला होता. एक उल्लेखनीय गोष्ट म्हणजे इतर प्रेक्षकांप्रमाणे, त्यानेही प्रवेशद्वारावर सामान्यपणे त्याचे तिकीट दाखवून आतमध्ये प्रवेश केला आहे.
ओव्हलच्या मैदानावर रोहित शर्माने त्याच्या कारकिर्दीतील एक संस्मरणीय खेळी खेळली आहे. २०२१ मध्ये या मैदानावर खेळल्या गेलेल्या चौथ्या कसोटीच्या दुसऱ्या डावामध्ये रोहित शर्माने शानदार शतक झळकावले होते. डावाची सुरुवात करताना त्याने २५६ चेंडूचा सामना करत १२७ धावा केल्या होत्या. यामध्ये त्याने १४ चौकार आणि एका षटकार लगावला होता. त्याच्या खेळीने भारताला १५७ धावांचा शानदार विजय मिळवून देण्यात मोठी मदत केली होती.
#WATCH | United Kingdom | Indian Cricketer Rohit Sharma arrives at The Oval in London for #INDvsEND Fifth Test Day 3 match. pic.twitter.com/rM6MXMsazd
— ANI (@ANI) August 2, 2025
भारताचा माजी कसोटी कर्णधार रोहित शर्माने त्याच्या कारकिर्दीमध्ये एकूण ६७ कसोटी सामने खेळले आहेत. या दरम्यान त्याने ४०.५७ च्या सरासरीने ४३०१ धावा केल्या आहेत. ज्यामध्ये त्याने १२ शतके आणि १८ अर्धशतकं झळकावली आहेत. गेल्या वर्षी अमेरिकेत झालेला विश्वचषक जिंकल्यानंतर रोहितने टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमधून निवृत्ती जाही केली होती. आता ३८ वर्षीय रोहित शर्मा फक्त एकदिवसीय स्वरूपात खेळताना दिसणार आहे.
हेही वाचा : ENG vs IND : भारतासाठी नाईट वॉचमॅन ठरला तारणहार! Akash Deep चे तगडे अर्धशतक..