Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 15 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs ENG: एड्जबॅस्टनमध्ये भारताचा ऐतिहासिक विजय; इंग्लंडचा ११ वर्षांचा गड अखेर ढासळला

India Beat England in first odi edgbaston birmingham after 11 years: पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाने इंग्लंडचा ६ विकेट्सने पराभव केला. या विजयासह भारताने तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत १-० अशी आघाडी घेतली.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Jul 15, 2026 | 01:34 PM
photo- social media

photo- social media

Follow Us
Follow Us:
  • एड्जबॅस्टनमध्ये भारताचा ऐतिहासिक विजय
  • इंग्लंडचा ११ वर्षांचा गड अखेर ढासळला
  • इंग्लंडमध्ये टीम इंडियाचा अखेर विजय
भारत आणि इंग्लंड यांच्यात ३ सामन्यांच्या एकदिवसीय मालकेतील पहिला सामना मंगळवारी (दि. १४) खेळला गेला. या सामन्यात भारताने इंग्लंडचा ६ विकेट्सने पराभव केला. इंग्लंडने प्रथम फलंदाजी करत ४७.५ षटकांत २५८ धावा केल्या. प्रत्युत्तरात भारताने ४५.२ षटकांत चार विकेट्स गमावून लक्ष्य गाठले. कर्णधार शुभमन गिलच्या शानदार खेळीमुळे आणि अक्षर पटेलच्या दमदार अष्टपैलू कामगिरीमुळे टीम इंडियाने विजय मिळवला. या विजयासह भारताने तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. तब्बल ११ वर्षानंतर एड्जबॅस्टनवर इंग्लंडचा पराभव करत टीम इंडियाने इतिहास रचला.

FIFA World Cup 2030 ठरणार ऐतिहासिक! 64 संघांना संधी मिळणार? फिफा अध्यक्ष इन्फँटिनो यांचे संकेत

एड्जबॅस्टनवर ११ वर्षांचा विक्रम मोडला

भारताच्या विजयामुळे एडजबॅस्टन येथील इंग्लंडच्या प्रभावी विक्रमालाही पूर्णविराम मिळाला. २०१५ नंतर या मैदानावर इंग्लंडला पहिल्यांदाच एकदिवसीय सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले. यापूर्वी, २०१४ मध्ये एडजबॅस्टन येथे एकदिवसीय सामन्यात इंग्लंडला पराभूत करणारा भारत हा शेवटचा संघ होता. आता, २०२६ मध्ये देखील भारतीय संघाने पुन्हा एकदा इंग्लंडला धूळ चारली.

भारताचा सलग सहावा विजय

या विजयासह, भारतीय संघाने इंग्लंडविरुद्ध आपला सलग सहावा एकदिवसीय विजय नोंदवला आहे. कोणत्याही फॉरमॅटमध्ये इंग्लंडविरुद्ध भारताची ही सर्वात मोठी विजय मालिका आहे. यापूर्वी, टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध सलग ५ एकदिवसीय सामन्यात विजय मिळवला होता. दोन्ही संघांमधील तीन सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना १६ जुलै रोजी कार्डिफमध्ये खेळला जाईल, जिथे भारत मालिका जिंकण्याचा प्रयत्न करेल, तर इंग्लंड देखील पुनरागमन करण्याचा प्रयत्न करेल.

Job completely done in style ✅#TeamIndia cruise to a 6️⃣-wicket victory to take a 1-0 lead in the ODI series 💙 Scorecard ▶️ https://t.co/2sg194tpxH #TeamIndia | #ENGvIND pic.twitter.com/PnUDkcVLyr — BCCI (@BCCI) July 14, 2026

इंग्लंडमध्ये टीम इंडियाचा अखेर विजय

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या इंग्लंडची सुरुवात आक्रमक होती. परंतु, काही षटकांनंतर बारतीय गोलंदाजांनी देखील उत्कृष्ट कामगिरी केली. सलामीसाठी आलेले बेन डकेट आक्रमकपणे फलंदाजी करत होता, पण दुसऱ्या टोकाला जेकब बेथेल १४ धावांवर बाद झाला. गुरनूर ब्रारने त्याला बाद केले. त्यानंतर ब्रारने बेन डकेटलाही ४३ धावंवर बाद केले. इंग्लंडची मधली फळी पूर्णपणे कोसळली. कर्णधार ब्रुकने १, बटलरने ५ धावा केल्या आणि करनला आपले खाते उघडता आले नाही. परंतु, जो रूटच्या नाबाद ७६ आणि लियाम डॉसनच्या ६८ धावांनी इंग्लंडला सामन्यात परत आणले. या दोघांनी शतकी भागीदारी करत इंग्लंडला २५० धावांच्या पुढे नेले.  इंग्लंडने भारतासमोर ४७.५ षटकांत २५८ धावांचे लक्ष्य ठेवले.

प्रत्युत्तरात भारताची सुरुवातही खराब झाली. रोहित शर्मा ११ धावांवर आणि विराट कोहली अवघ्या ५ धावांवर बाद झाला. मात्र, कर्णधार शुभमन गिलने श्रेयस अय्यरसोबत अर्धशतकी भागीदारी रचली. गिलने ७५ चेंडूंमध्ये ८० धावा केल्या, पण तो दुखापतीमुळे रिटायर्ड हर्ट झाला. गिल बाहेर गेल्यानंतर अय्यर ३५ धावांवर धावबाद झाला. राहुललाही केवळ १ धाव करता आली. पण यानंतर, वॉशिंग्टन सुंदर आणि अक्षर पटेल यांनी शानदार फलंदाजी करून इंग्लंडला पराभूत केले. अक्षर पटेलने अवघ्या ३८ चेंडूंमध्ये अर्धशतक झळकावले. वॉशिंग्टन सुंदरनेही ६३ चेंडूंमध्ये नाबाद ५२ धावा करून भारताला विजय मिळवून दिला.

भारताची सुवर्णकन्या! नीरू धांडाने ISSF विश्वचषकात रचला इतिहास, महिलांच्या ट्रॅपमध्ये जिंकले पहिले Gold Medal

Web Title: Ind vs eng india beat england edgbaston shubman gill axar patel odi series 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 15, 2026 | 01:34 PM

Topics:  

  • England cricket
  • IND Vs ENG
  • indian cricket team
  • Shubman Gill

संबंधित बातम्या

Axar Patel: 19 रन्स 5 विकेट्स! ‘बापू’ जोमात, केली दमदार फलंदाजी, इंग्रजांना अखेर लोळवले
1

Axar Patel: 19 रन्स 5 विकेट्स! ‘बापू’ जोमात, केली दमदार फलंदाजी, इंग्रजांना अखेर लोळवले

IND vs ENG ODI: बॉलर्सचा तुफान मारा, Shubman Gill चा धमाका; UK च्या दौऱ्यावर भारताची ‘शुभ’ सुरूवात
2

IND vs ENG ODI: बॉलर्सचा तुफान मारा, Shubman Gill चा धमाका; UK च्या दौऱ्यावर भारताची ‘शुभ’ सुरूवात

ग्रहण लागले! बांग्लादेश क्रिकेट बोर्डाने घेतला ‘हा’ निर्णय; IND Vs BAN दौरा सापडला अडचणीत
3

ग्रहण लागले! बांग्लादेश क्रिकेट बोर्डाने घेतला ‘हा’ निर्णय; IND Vs BAN दौरा सापडला अडचणीत

IND Vs ENG Live: अक्षर ठरला ब्रिटिशांचा कर्दनकाळ! इंग्लंडची पडझड; भारताला विजयासाठी 258 रन्सची गरज
4

IND Vs ENG Live: अक्षर ठरला ब्रिटिशांचा कर्दनकाळ! इंग्लंडची पडझड; भारताला विजयासाठी 258 रन्सची गरज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.