
अक्षर पटेलची इंग्लंडविरूद्ध सामन्यात कमाल कामगिरी (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
खरं तर, पहिल्या विकेटनंतर इंग्लंडने अवघ्या १९ धावांत पाच विकेट गमावल्या. इंग्लंडची धावसंख्या झटपट पाच गडी बाद ८० झाली, जो भारतीय संघासाठी एक मोठा टर्निंग पॉइंट ठरला. जो रूट आणि लियाम डॉसन यांनी काही काळ भारताला रोखून धरले असले तरी, अक्षर पटेलने डॉसनला बाद करताच इंग्लंडचा डाव कोसळला. त्यानंतर अक्षरने चार बळी घेऊन इंग्लंडच्या खालच्या फळीला खिंडार पाडले.
IND Vs ENG Live: अक्षर ठरला ब्रिटिशांचा कर्दनकाळ! इंग्लंडची पडझड; भारताला विजयासाठी 258 रन्सची गरज
गोलंदाजीनंतर अक्षरने फलंदाजीतही आपली ताकद दाखवली
इंग्लंडचा डाव २५८ धावांवर संपुष्टात आल्यानंतर, फलंदाजीसाठी मैदानात उतरलेल्या भारतीय संघाची सुरुवात खराब झाली. रोहित शर्मा आणि विराट कोहली स्वस्तात बाद झाले. त्यानंतर कर्णधार शुभमन गिल आणि श्रेयस अय्यर यांच्यावर जबाबदारी आली, पण अय्यरने ३५ धावा केल्या आणि तो बाद झाला. दरम्यान, गिलदेखील ८० धावा करून दुखापतग्रस्त होऊन निवृत्त झाला.
गिलच्या बाद होण्याने परिस्थिती आणखी बिकट झाली, कारण केएल राहुल केवळ १ धाव काढून बाद झाला. येथे इंग्लंडला सामन्यात पुनरागमन करण्याची मोठी संधी होती, पण पुन्हा एकदा अक्षर पटेल इंग्लिश संघाच्या पराभवाचे कारण ठरला. गोलंदाजीने कहर केल्यानंतर, अक्षर पटेलने ५२ चेंडूंमध्ये नाबाद ५७ धावा केल्या. यादरम्यान, त्याने आणि वॉशिंग्टन सुंदरने नाबाद १०२ धावांची भागीदारी करून भारतीय संघाला ४५.२ षटकांत २६२ धावा करून सामना जिंकण्यास मदत केली.
IND vs ENG ODI: बॉलर्सचा तुफान मारा, Shubman Gill चा धमाका; UK च्या दौऱ्यावर भारताची ‘शुभ’ सुरूवात
अक्षरचा मोठा कारनामा
एकदिवसीय सामन्यात ५० पेक्षा जास्त धावा आणि चार किंवा अधिक बळी घेणारा अक्षर पटेल सहावा भारतीय खेळाडू ठरला आहे. अक्षर पटेलने गेल्या काही वर्षांत आपल्या फलंदाजीत लक्षणीय सुधारणा केली आहे आणि त्याचे परिणाम आता मैदानावर दिसून येत आहेत. इंग्लंडविरुद्धच्या एडजबॅस्टन एकदिवसीय सामन्यात, जेव्हा टीम इंडियाने १६० धावांवर आपली चौथी विकेट गमावली, तेव्हा अक्षर पटेलला फलंदाजीसाठी पाठवण्यात आले.
कोणत्याही दबावाशिवाय आक्रमक फलंदाजी करताना अक्षरने ५२ चेंडूंमध्ये पाच चौकार आणि एका षटकारासह नाबाद ५७ धावा केल्या. त्यानंतर त्याने सुंदरसोबत सहाव्या विकेटसाठी १०२ धावांची भागीदारी करून संघाला विजय मिळवून दिला. यासह, अक्षर पटेल आता एकदिवसीय सामन्यात ५० किंवा अधिक धावा आणि चार किंवा अधिक बळी घेणारा केवळ सहावा भारतीय खेळाडू ठरला आहे. यापूर्वी सौरव गांगुली आणि युवराज सिंग यांनी दोनदा, तर सचिन तेंडुलकर, के. श्रीकांत आणि हार्दिक पांड्या यांनी प्रत्येकी एकदा ही कामगिरी केली आहे.
इंग्लंडविरुद्ध तिन्ही फॉरमॅटमध्ये ‘प्लेअर ऑफ द मॅच’ पुरस्कार जिंकणारा तो चौथा भारतीय खेळाडू ठरला
इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यातील उत्कृष्ट अष्टपैलू कामगिरीबद्दल अक्षर पटेललाही ‘प्लेअर ऑफ द मॅच’ पुरस्कार मिळाला. यासह, तो इंग्लंडविरुद्ध तिन्ही फॉरमॅटमध्ये हा पुरस्कार जिंकणारा चौथा भारतीय खेळाडू ठरला. अक्षर पटेलच्या आधी रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह आणि कुलदीप यादव यांनी ही कामगिरी केली आहे.