आर आश्विन(फोटो-सोशल मीडिया)
IND vs ENG : भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील तिसरा सामना लॉर्ड्सवर खेळवण्यात येत आहे. इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. या सामन्यात भारताची अवस्था बिकट असल्याचे दिसत आहे. भारतीय गोलंदाजांनी शानदार गोलंदाजी करून इंग्लंडला दुसऱ्या डावात १९२ धावांवर रोखले. हा सामना अनेक कारणांनी गाजत असल्याचे दिसत आहे. यजमान इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्यात, फील्ड पंच पॉल रीफेलच्या अनेक वादग्रस्त निर्णय देताना दिसत आहेत.अशातच माजी भारतीय दिग्गज गोलंदाज आर अश्विनने देखील ऑस्ट्रेलियन पंच पॉल रीफेलच्या निर्णयांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. ज्याचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.
हेही वाचा : IND Vs ENG :चालू सामन्यात गंभीरचे नकोसे हावभाव! मुख्य प्रशिक्षकाच्या कृतीवर प्रश्नचिन्ह; पहा Video
लॉर्ड्सवर खेळवण्यात येत असलेल्या भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या चार दिवसांमध्ये मैदानावर अनेक वादग्रस्त निर्णय बघायला मिळाले. डीआरएस घेतल्यानंतर पॉल रीफेलचे अनेक निर्णय बदलण्यात आले. सामन्याच्या चौथ्या दिवशी त्याने भारतीय कर्णधार शुभमन गिलला बाद घोषित केले. तथापि, या काळात गिलने डीआरएस घेतला आणि पंचांना त्यांचा निर्णय बदलावा लागला होता. या वादग्रस्त निर्णयांबाबत, माजी भारतीय फिरकी गोलंदाज आर अश्विन संताप व्यक्त करताना दिसला तसेच त्याने आयसीसीला पंचांच्या निर्णयांकडे लक्ष देण्याबाबत विनंती देखील करण्यात आली.
आर अश्विन त्याच्या यूट्यूब चॅनेलवर आपले मत व्यक्त केले. अश्विनने ऑस्ट्रेलियन पंच पॉल रीफेल यांच्या निर्णयांवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आणि म्हटले आहे की, हे ऑस्ट्रेलियन पंच नेहमीच भारताविरुद्ध निर्णय देत असतात. अॅशचा पार्टनर विमल कुमारसोबत बोलताना अश्विन म्हणाला कि, “माझे वडील माझ्यासोबत सामना पाहत असताना ते म्हणाले कि, ‘पॉल रीफेल असेपर्यंत आपण जिंकणार नाही.”
अश्विन पुढे म्हणाला कि, “लॉर्ड्स कसोटीदरम्यानचे त्याचे अनेक निर्णय तपासले पाहिजेत आणि आयसीसीने त्याची चौकशी देखील करावी.”
Ashwin on Umpire. 👍🫡 pic.twitter.com/OFHcd9wbex
— muffatball vikrant (@Vikrant_1589) July 14, 2025
इंग्लंडने विजयासाठी दिलेल्या १९३ धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाने पाचव्या दिवशी आतपर्यंत ८ विकेट्स गमवून १११ धावा केल्या आहेत. भारताला सामना जिंकण्यासाठी अजून ८२ धावांची गरज आहे. त्याच वेळी, इंग्लिश संघाला केवळ २ विकेट्सची आवश्यकता आहे. रवींद्र जडेजा १७ धावांवर खेळत आहेत.