Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs NZ 2nd T20l Match : सूर्या आर्मी मालिकेत आघाडीसाठी सज्ज! रायपुरमध्ये भारताचा TOSS जिंकून गोलंदाजीचा निर्णय 

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील दूसरा सामना आज रायपूर येथे खेळला जात आहे. या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Jan 23, 2026 | 06:37 PM
IND vs NZ 2nd T20I Match: Surya's army is ready to take the lead in the series! India wins the toss and opts to bowl in Raipur.

IND vs NZ 2nd T20I Match: Surya's army is ready to take the lead in the series! India wins the toss and opts to bowl in Raipur.

Follow Us
Close
Follow Us:

IND VS NZ 2nd T20l Match : भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पाच सामन्यांची टी-२० मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील दुसरा सामना आज रायपूर येथील शहीद वीर नारायण सिंह आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यापूर्वी भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. तर न्यूझीलंड संघ प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरणार आहे. या मालिकेतील पहिला सामना नागपूर येथील जामठा स्टेडियमवर खेळला गेला होता. भारताने या सामन्यात न्यूझीलंडचा ४८ धावांनी पराभव करून मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. भारताने बुमराहला विश्रांती दिली आहे, तर हर्षित आणि कुलदीप संघात स्थान देण्यात आले आहे.

हेही वाचा : PAK vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी पाकिस्तान संघ घोषित! बाबर आझमसह ‘या’ स्टार खेळाडूचे पुनरागमन

दुसऱ्या टी-२० सामन्यात देखील सूर्याआर्मी आपली विजयी लय कायम राखत मालिकेत आघाडी वाढवण्यासाठी प्रयत्नशील असणार आहे. तर नुकतेच एकदिवसीय मालिकेत भारताचा पराभव करून २-१ अशी मालिका जिंकून न्यूझीलंडने इतिहास रचला आहे. त्यामुळे पहिल्या सामन्यात जरी पराभव पत्करावा लागला असला तरी न्यूझीलंडचा संघ रायपूर येथील सामन्यात दमदार पुनरागमन करून मालिकेत १-१ अशी बरोबरी साधण्याचा प्रयत्न करेल.

भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादवने टॉस जिंकल्यानंतर प्रतिक्रिया देत म्हटले की, “आम्ही प्रथम गोलंदाजी करणार आहोत. तिथे आधीच थोडं दव आहे, आम्ही अलीकडच्या काळात लक्ष्याचा पाठलाग केलेला नाही, त्यामुळे आम्हाला पाठलाग करायचा आहे. खेळपट्टी चांगली दिसत आहे. आम्ही प्रत्येक सामना खेळतो, आम्ही प्रत्येक बाबतीत सुधारणा करण्याचा प्रयत्न करतो, आम्ही प्रत्येक विभागात त्याच गोष्टी करण्याचा प्रयत्न करू. आमच्या संघात दोन बदल आहेत – अक्षरला काल रात्री दुखापत झाली, बुमराहला विश्रांती दिली आहे, हर्षित आणि कुलदीप संघात आले आहेत.”

किवी संघाचा कर्णधार मिचेल सँटनरने टॉस गमावल्यावर म्हटले की,  “आम्हीही प्रथम गोलंदाजीच केली असती. जेव्हा तुम्ही त्यांच्या परिस्थितीत एका दर्जेदार संघाविरुद्ध खेळता, तेव्हा तुम्ही काहीतरी शिकता. आमच्या संघात तीन बदल आहेत – रॉबिन्सनच्या जागी सीफर्ट, क्लार्कच्या जागी फाउल्क्स आणि मॅट हेन्रीचाही संघात समावेश आहे.”

🚨 Toss 🚨#TeamIndia have won the toss and elected to bowl first in the 2⃣nd T20I. Updates ▶️ https://t.co/8G8p1tq1RC#INDvNZ | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/AcBcPlcKFZ — BCCI (@BCCI) January 23, 2026

 

हेही वाचा : विराट कोहलीच्या मनाविरुद्ध कसोटी निवृत्तीचा निर्णय? ‘या’ दिग्गज खेळाडूच्या विधानाने क्रिकेट जगतात वादळ

दोन्ही संघ खालीलप्रमाणे

भारताचा संघ :भारत (प्लेइंग इलेव्हन): संजू सॅमसन (w), अभिषेक शर्मा, इशान किशन, सूर्यकुमार यादव (क), हार्दिक पांड्या, शिवम दुबे, रिंकू सिंग, हर्षित राणा, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती

 न्यूझीलंडचा संघ: डेव्हॉन कॉनवे, टिम सेफर्ट (यष्टीरक्षक), रचिन रवींद्र, ग्लेन फिलिप्स, मार्क चॅपमन, डॅरिल मिचेल, मिचेल सँटनर (कर्णधार), झॅक्री फाउल्क्स, मॅट हेन्री, ईश सोढी, जेकब डफी

 

Web Title: Ind vs nz 2nd t20i match india won the toss in raipur and elected to bowl

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 23, 2026 | 06:32 PM

Topics:  

  • IND vs NZ
  • Mitchell Santner
  • Suryakumar Yadav
  • T20 cricket

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.