
IND vs NZ test series
33व्या वर्षी Quinton de Kock चा शतकी धमाका; गेल-कोहलीच्या एलिट क्लबमध्ये दिमाखात एन्ट्री
न्यूझीलंड क्रिकेटने (NZC) मंगळवार, १ सप्टेंबर रोजी आपल्या देशांतर्गत रेड बॉल क्रिकेटचे वेळापत्रक जाहीर केले. यामध्ये भारत ‘अ’ आणि न्यूझीलंड ‘अ’ यांच्यातील तीन चार दिवसीय सामन्यांचा समावेश आहे. या मालिकेतील सर्व सामने २४ ऑक्टोबरपासून क्राइस्टचर्च येथे खेळले जातील.
न्यूझीलंड क्रिकेटने एका अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, ‘रेड बॉलच्या देशांतर्गत हंगामात आंतरराष्ट्रीय स्तरावरील रोमांचही पाहायला मिळेल, ज्यामध्ये न्यूझीलंड ‘अ’ संघ २४ ऑक्टोबरपासून क्राइस्टचर्च येथे भारत ‘अ’ संघाविरुद्ध तीन चार दिवसीय सामने खेळणार आहे.’ हे सामने भारतीय खेळाडूंना न्यूझीलंडच्या वेगवान आणि बाउन्सी खेळपट्ट्यांसाठी तयारी करण्यास मदत करतील. या मालिकेत अनेक वरिष्ठ भारतीय खेळाडूही खेळण्याची शक्यता आहे.
भारतीय संघाचा न्यूझीलंड दौरा ऑक्टोबर ते नोव्हेंबर दरम्यान होणार आहे. या दौऱ्यात दोन्ही संघ पाच टी-२०, पाच एकदिवसीय आणि दोन कसोटी सामने खेळतील. सर्वात आधी टी-२० मालिका, त्यानंतर एकदिवसीय मालिका आणि मग कसोटी मालिका खेळवली जाईल. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिला कसोटी सामना १९ ते २३ नोव्हेंबर दरम्यान वेलिंग्टन येथे खेळला जाईल. त्यानंतर दुसरा आणि अंतिम कसोटी सामना २७ नोव्हेंबर ते १ डिसेंबर दरम्यान क्राइस्टचर्च येथे खेळला जाईल.
जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या (WTC 2025-27) अंतिम सामन्याच्या दृष्टीनेही ही मालिका दोन्ही संघांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. डब्ल्यूटीसी गुणतालिकेत भारत सध्या पाचव्या क्रमांकावर आहे, तर न्यूझीलंड तिसऱ्या क्रमांकावर आहे. भारतीय संघाला अंतिम सामन्यात खेळायचे असेल, तर त्यांना उर्वरित सर्व सामने जिंकावेच लागतील. यापूर्वी जेव्हा या दोन्ही संघात खेळल्या गेलेल्या कसोटी मालिकेत, न्यूझीलंडने भारतीय संघाचा ३-० असा धुव्वा उडवला होता.