
IND vs NZ, T20 series: A windfall for Shreyas Iyer before the T20 World Cup! He has secured a place in the Indian T20 squad, and this player has been given a chance instead of Sundar.
Shreyas Iyer returns to the T20 squad : भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. भारतीय अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदर दुखापतीमुळे पुढील आठवड्यात नागपूरमध्ये सुरू होणाऱ्या न्यूझीलंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतून बाहेर पडला आहे. शुक्रवारी संध्याकाळी जारी करण्यात आलेल्या अधिकृत निवेदनात बीसीसीआयकडून याला दुजोरा देण्यात आला आहे. ज्यामध्ये सुंदर सध्या साईड स्ट्रेनमुळे क्रिकेट मैदनापासून दूर राहणार आहे आणि त्याला काही दिवस विश्रांती घेण्याचा सल्ला देखील देण्यात आला आहे.
हेही वाचा : MIW vs UPW WPL 2026 : नॅट सायव्हर-ब्रंटचा WPL मध्ये धुराळा! ‘ही’ किमया साधत संयुक्तपणे आली अव्वलस्थानी
बीसीसीआयकडून जारी करण्यात आलेल्या प्रेस रिलीजमध्ये असे म्हटले आहे की ११ जानेवारी रोजी वडोदरा येथील बीसीए स्टेडियमवर न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यादरम्यान गोलंदाजी करताना सुंदरला त्याच्या खालच्या बरगड्यांमध्ये वेदना जाणवल्या होत्या. त्यानंतरच्या स्कॅन आणि तज्ञांच्या सल्लामसलतींमध्ये साईड स्ट्रेनची पुष्टी झाली होती. बोर्डाकडून सांगण्यात आले आहे की, सुंदर आता पुढील उपचार आणि पुनर्वसनासाठी बीसीसीआय सेंटर ऑफ एक्सलन्स (सीओई) कडे रिपोर्ट करणार आहे.
🚨 News 🚨 Shreyas Iyer & Ravi Bishnoi added to #TeamIndia T20I squad; Washington Sundar ruled out. Details ▶️ https://t.co/cNWHX9TOVk#INDvNZ | @IDFCFIRSTBank — BCCI (@BCCI) January 16, 2026
दरम्यान, पुरुष निवड समितीने वॉशिंग्टन सुंदरच्या जागी रवी बिश्नोईला टी-२० संघात संधी दिली आहे. तर जखमी तिलक वर्माच्या जागी श्रेयस अय्यरचा देखील पहिल्या तीन टी-२० सामन्यांसाठी संघात समावेश केला गेला आहे.
सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर (पहिले तीन टी-२० सामने), हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल (उपकर्णधार), जसप्रीत बुमराह, हर्षित राणा, रिंकू सिंग, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव, इशान किशन (यष्टीरक्षक), रवी बिश्नोई.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका सुरू असून या मालिकेतील तिसरा सामना १८ जानेवारी रोजी इंदूरमध्ये खेळवण्यात येणार आहे. या सामन्यापूर्वी, भारतीय संघाचे प्रशिक्षक गौतम गंभीर आणि स्टार फलंदाज केएल राहुल यांनी शुक्रवारी उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिराला भेट दिली आहे.