पीएसएल 2025(फोटो-सोशल मीडिया)
PSL 2025 : भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढताना दिसत आहे. या दोन देशातील वातावरण दिवसेंदिवस अधिकच बिघडत चालले आहे. ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारताकडून पाकिस्तानमध्ये असलेल्या 9 दहशतवादी तळांवर हल्ला करण्यात आला. त्यानंतर पाकिस्तानमध्ये एकच खळबळ माजली. पाकिस्तानकडून उत्तरादाखल ड्रोन आणि मिलिशियाने भारतावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु भारतीय सैन्याने सारे वार परतवून लावले. अशा वेळी बीसीसीआयने आयपीएल 2025 आठवडाभर पुढे ढकलले आहे. त्याच पाठोपाठ आता पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडून देखील शुक्रवारी पाकिस्तान सुपर लीग अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्याची घोषणा करण्यात आली आहे. यापूर्वी ही स्पर्धा यूएईमध्ये आयोजित करण्याच्या विचारात पीसीबी होती, परंतु यूएईने ही स्पर्धा आयोजित करण्यास स्पष्ट नकार दिला आहे.
भारतासोबत सुरू असलेल्या लष्करी संघर्षामुळे टी-२० स्पर्धा संयुक्त अरब अमिराती (यूएई) येथे हलवण्यात आल्याची घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर काही तासांतच हा निर्णय घेण्यात आला आहे. पण युएईकडून ही स्पर्धा आयोजित करण्यास सहमती दर्शवली नाही. त्यानंतर पाकिस्तान सुपर लीग अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आल्याचा निर्णय घेण्यात आला. सीमेवरील तणाव लक्षात घेता बीसीसीआयने इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) चे उर्वरित सामने देखील एका आठवड्यासाठी पुढे ढकलले आहेत.
पीसीबीने प्रसिद्ध केलेल्या एका अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, पंतप्रधान मियां मुहम्मद शाहबाज शरीफ यांच्याकडून मिळालेल्या सल्ल्यानुसार हा निर्णय घेण्यात आलाआहे. यावेळी राष्ट्रीय भावना ही पाकिस्तानच्या सार्वभौमत्वाचे रक्षण करण्यासाठी आपल्या सशस्त्र दलांच्या शौर्यावर केंद्रित आहे. निवेदनात पुढे म्हटले आहे की, पीसीबी आणि त्यांचे खेळाडू शहीदांच्या कुटुंबियांसह आणि देशाचे रक्षण करणाऱ्या आमच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांसोबत एकतेने उभे आहेत.
भारत आणि पाकिस्तान या दोन देशात तणाव वाढला आहे. जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याला भारताकडून जोरदार उत्तर दिले जात आहे. ऑपरेशन सिंदूर अंतर्गत, भारतीय सैन्याकडून प्रथम ७ मे रोजी ९ दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले. त्यानंतर ८ मे च्या रात्री पाकिस्तानचे रावळपिंडी स्टेडियम उध्वस्त करण्यात आले आहे. या दरम्यान त्यानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने २०२५ ची पाकिस्तान सुपर लीग यूएईमध्ये हलवण्यात आले आहे. या पाठोपाठ आता बीसीसीआयने मोठा निर्णय घेतला आहे. भारतात सुरू असलेली आयपीएल २०२५ बीसीसीआयकडून स्थगित करण्यात आली आहे.