Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 22 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs SA : रोहित – विराट दक्षिण आफ्रिकेला ‘Grovel’ चा अर्थ समजावण्यासाठी सज्ज! रायपूरमध्ये कशी आहे दोघांची कामगिरी

तुम्हाला रायपूरच्या या मैदानावरील टीम इंडियाच्या कामगिरीची आकडेवारी माहिती आहे का? आणि विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी या मैदानावर कशी कामगिरी केली आहे? तर, या मैदानाच्या आकडेवारीवर एक नजर टाकूया.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Dec 02, 2025 | 11:08 AM
फोटो सौजन्य - बीसीसीआय सोशल मिडिया

फोटो सौजन्य - बीसीसीआय सोशल मिडिया

Follow Us
Follow Us:

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये दुसरा सामना 3 डिसेंबर रोजी खेळवला जात आहे. या मालिकेचा पहिल्या सामन्यामध्ये भारताच्या संघाची कमालीची कामगिरी राहिली. विराट कोहली, रोहित शर्मा आणि केएल राहुल यांनी पहिल्या सामन्यामध्ये कौतुकास्पद कामगिरी केली होती. दुसऱ्या सामन्यामध्ये देखील या खेळाडूंकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा भारतीय क्रिकेट चाहत्यांना आहे. तीन सामन्यांच्या मालिकेतील हा दुसरा एकदिवसीय सामना जिंकून मालिका जिंकण्याचे भारताचे लक्ष्य असेल. भारताच्या संघासाठी ही मालिका फार महत्वाची आहे. 

पण तुम्हाला रायपूरच्या या मैदानावरील टीम इंडियाच्या कामगिरीची आकडेवारी माहिती आहे का? आणि विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी या मैदानावर कशी कामगिरी केली आहे? तर, या मैदानाच्या आकडेवारीवर एक नजर टाकूया. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना रायपूरमधील शहीद वीर नारायण सिंग आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळला जाईल . या मैदानावर आतापर्यंत फक्त एकच एकदिवसीय सामना झाला आहे.

IND vs SA : ऋतुराज गायकवाडच्या खराब कामगिरीनंतर आकाश चोप्राने केले समर्थन! म्हणाला – गुणांसाठी दोष देऊ नका…

या मैदानावर फक्त एकच एकदिवसीय सामना खेळला गेला आहे. दोन वर्षांपूर्वी न्यूझीलंड संघाने भारत दौरा केला होता. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील सामना २१ जानेवारी २०२३ रोजी खेळला गेला. या सामन्यात न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी केली आणि संपूर्ण किवी संघ फक्त १०८ धावांवर गारद झाला. या सामन्यात मोहम्मद शमीने तीन विकेट घेतल्या, तर वॉशिंग्टन सुंदरने दोन आणि हार्दिकनेही दोन विकेट घेतल्या.

रोहित-कोहलीची कामगिरी 

न्यूझीलंडच्या १०९ धावांच्या प्रत्युत्तरात, टीम इंडियाकडून रोहित शर्माने ५१ धावा केल्या. त्याने ७ चौकार आणि २ षटकार मारले. मात्र, विराट कोहली फक्त ११ धावा करून बाद झाला. मात्र, भारताने २१ व्या षटकात ८ विकेट्सने सामना जिंकला.

रांची येथील पहिल्या एकदिवसीय सामन्यात विराट कोहलीने १३५ धावा केल्या, तर रोहित शर्माने ५७ धावा केल्या. यामुळे भारताला दक्षिण आफ्रिकेचा १७ धावांनी पराभव करता आला. आता, रायपूरमध्ये पुन्हा एकदा सर्वांच्या नजरा रोहित आणि कोहलीवर असतील. भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये तिसरा सामना हा 6 डिसेंबर रोजी खेळवला जाणार आहे. हा मालिकेचा शेवटचा सामना असणार आहे त्यानंतर टी 20 मालिकेला सुरुवात होणार आहे. 

Web Title: Ind vs sa rohit virat ready to defeat south africa in the second match how are both performing in raipur

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 02, 2025 | 11:08 AM

Topics:  

  • cricket
  • Ind Vs Sa
  • India vs South Africa
  • Rohit Sharma
  • Sports
  • Virat Kohli

संबंधित बातम्या

‘…त्यांना सहजपणे बाहेर करता येणार नाही’; Virat Kohli- Rohit Sharma वर आर. अश्विनचे मोठे भाष्य
1

‘…त्यांना सहजपणे बाहेर करता येणार नाही’; Virat Kohli- Rohit Sharma वर आर. अश्विनचे मोठे भाष्य

Rohit Sharma – मी अजून संपलेलो नाही’अजून लढायचंय !
2

Rohit Sharma – मी अजून संपलेलो नाही’अजून लढायचंय !

इंग्लंडकडून पराभवाचा फटका! ICC रँकिंगमध्ये टीम इंडियाला मोठा धक्का, अव्वल स्थान धोक्यात
3

इंग्लंडकडून पराभवाचा फटका! ICC रँकिंगमध्ये टीम इंडियाला मोठा धक्का, अव्वल स्थान धोक्यात

मोठे मोठे पराभव पत्करले गंमतमध्ये! Team India त गंभीरचे ‘गेम प्लॅनिंग’ फ्लॉप; इंग्लंडने पाजले पाणी
4

मोठे मोठे पराभव पत्करले गंमतमध्ये! Team India त गंभीरचे ‘गेम प्लॅनिंग’ फ्लॉप; इंग्लंडने पाजले पाणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.