Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 20 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs SL: क्रिकेटविश्वात Team India चा नवा विक्रम! Shubman Gill च्या नेतृत्वाखाली भारत करणार ऐतिहासिक कामगिरी

Team India will play 600 Test Match Against Sri lanka: भारतीय संघ दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी श्रीलंकेत दाखल झाला आहे. १५ ऑगस्ट रोजी जेव्हा दोन्ही संघ पहिल्या कसोटीत आमनेसामने येतील, तेव्हा तो एक ऐतिहासिक सामना असेल.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Aug 05, 2026 | 01:23 PM
IND vs SL: क्रिकेटविश्वात Team India चा नवा विक्रम! Shubman Gill च्या नेतृत्वाखाली भारत करणार ऐतिहासिक कामगिरी
Follow Us
Follow Us:
  • क्रिकेटविश्वात Team India चा नवा विक्रम
  • Shubman Gill च्या नेतृत्वाखाली संघ गाठणार ऐतिहासिक टप्पा
  • टीम इंडियाने १९३२ पासून खेळले ५९९ कसोटी सामने
श्रीलंकेविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी टीम इंडिया सज्ज आहे. १५ ऑगस्टपासून या मालिकेला सुरुवात होणार आहे. शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील भारतीय क्रिकेट पहिल्या कसोटीसाठी मैदानात उतरेल, तेव्हा तो एक ऐतिहासिक सामना असेल. कारण, टीम इंडिया श्रीलंकेविरुद्ध आपला ६०० वा कसोटी सामना खेळणार आहे. आतापर्यंत जगात केवळ दोनच संघांनी ६०० कसोटी सामने खेळले आहेत आणि आता भारतही त्या यादीत सामील होईल. या मालिकेसाठी, भारताचे धुरंदर श्रीलंकेत दाखल झाले आहेत.

Duleep Trophy 2026: नॉर्थ झोन संघ जाहीर; Arshdeep Singh- Anshul Kamboj ला संघात स्थान, जम्मू-काश्मीरच्या खेळाडूकडे कर्णधारपद

टीम इंडियाने १९३२ पासून खेळले ५९९ कसोटी सामने

भारतीय संघाने आतापर्यंत ५९९ कसोटी सामने खेळले असून, गॉल येथे श्रीलंकेविरुद्धचा सामना हा त्यांचा ६०० वा सामना असेल. भारताने स्वातंत्र्यापूर्वीच आपला पहिला कसोटी सामना खेळला होता. पहिला सामना १९३२ मध्ये खेळला गेला होता. त्यावेळी सी. के. नायडू हे भारताचे कर्णधार होते. तेव्हापासूनचा प्रवास स्वतःच ऐतिहासिक राहिला आहे. १९३२ पासून अनेक कसोटी कर्णधारांनी संघाला विजय मिळवून देण्यात महत्वाची भूमिका बजावली. परंतु, आता शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली एका नवीन विक्रमाची नोंद होणार आहे.

Capturing smiles and creating travel memories on the way to Colombo 😁🎞️#TeamIndia have arrived in Sri Lanka 🛬#SLvIND pic.twitter.com/TuRFOW4gIw — BCCI (@BCCI) August 5, 2026

इंग्लंडने खेळले सर्वाधिक कसोटी सामने ऑस्ट्रेलिया दुसऱ्या क्रमांकावर

कसोटी क्रिकेटमध्ये आतापर्यंत फक्त दोन संघांनी ६०० कसोटी सामन्यांचा टप्पा ओलांडला आहे. इंग्लंडने आतापर्यंत सर्वाधिक १,०९७ कसोटी सामने खेळले आहेत. हा विक्रम गाठणे इतर कोणासाठीही जवळपास अशक्य आहे. इंग्लंडने आपला पहिला कसोटी सामना १८७७ साली खेळला होता. तर,ऑस्ट्रेलिया दुसऱ्या क्रमांकावर आहे. ऑस्ट्रेलियानेही आपला पहिला कसोटी सामना १८७७ मध्येच खेळला होता. तेव्हापासून या संघाने ८८२ कसोटी सामने खेळले आहेत.

भारताची कसोटी आकडेवारी

भारताने आपला पहिला कसोटी सामना १९३२ मध्ये खेळला. संघाने एकूण ५९९ कसोटी सामने खेळले आहेत. या काळात भारताने १८६ कसोटी सामने जिंकले असून १८८ गमावले आहेत. २२४ सामने अनिर्णित राहिले असून, केवळ एक सामना ड्ऱॉ राहिला आहे.

जागतिक कसोटी चॅम्पियनशिपसाठी ही मालिका महत्वाची

१५ ऑगस्ट रोजी, भारताच्या स्वातंत्र्यदिनी टीम इंडिया आणि श्रीलंकन ​​संघ आमनेसामने येतील, तेव्हा उत्साह शिगेला पोहोचेल. ही मालिका जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा भाग म्हणून खेळवली जाणार असल्याने ही मालिका दोन्ही संघासाठी महत्वाची ठरणार आहे. या पाच दिवसीय सामन्यात दोन्ही संघ कशी कामगिरी करतात हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

दिल्ली न्यायालयाचा मोठा निर्णय; लैंगिक छळ प्रकरणात बृजभूषण सिंग निर्दोष, विनेश फोगट संतप्त, म्हणाली…

Web Title: Ind vs sl test india will play 600 test match in galle under shubman gill captaincy

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 05, 2026 | 01:23 PM

Topics:  

  • IND vs SL
  • Shubhman Gill
  • Sri Lanka
  • Test Match

संबंधित बातम्या

SL W vs MAS W: चमारी अटापट्टूचा धमाका! मलेशियाला ८६ धावांनी लोळवलं; श्रीलंकेचे सेमीफायनलचे ‘तिकीट’ पक्के
1

SL W vs MAS W: चमारी अटापट्टूचा धमाका! मलेशियाला ८६ धावांनी लोळवलं; श्रीलंकेचे सेमीफायनलचे ‘तिकीट’ पक्के

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.