Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs UAE: भारताने फोडला विजयाचा नारळ! युएईचा ९ विकेट राखुन केला पराभव; अवघ्या ४.३ षटकांत सामना गुंडाळला

दुबईतील आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवण्यात आलेल्या या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीसाठी आलेला यूएईचा संपूर्ण संघ ५७ धावांवर गारद झाला.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Sep 10, 2025 | 10:12 PM
IND vs UAE: भारताने फोडला विजयाचा नारळ! युएईचा ९ विकेट राखुन केला पराभव; अवघ्या ४.३ षटकांत सामना गुंडाळला
Follow Us
Follow Us:

IND vs UAE, Asia Cup 2025 : आशिया कप २०२५ स्पर्धेला सुरवात झाली आहे. मंगळवारी अफगाणिस्तान आणि हाँगकाँग यांच्यात झालेल्या सामन्याने या स्पर्धेची सुरुवात झाली आहे. स्पर्धेतील दुसरा सामना भारत आणि यूएई यांच्यात खेळवला गेला. या सामन्यात भारतीय संघाने यूएईचा ९ विकेट राखुन पराभव केला. दुबईतील आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवण्यात आलेल्या या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीसाठी आलेला यूएईचा संपूर्ण संघ ५७ धावांवर गारद झाला. त्यानंतर लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाने ९ विकेट राखुन विजयाचा नारळ फोडला.

संपूर्ण सामन्याचा स्कोरकार्ड

नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या यूएईच्या संघाची सुरुवात निराशाजनक झाली. अवघ्या ५० धावांवरच त्यांचे अर्धे फलंदाज माघारी परतले. अखेर १३.१ षटकांत संपूर्ण संघ अवघ्या ५७ धावांवर गारद झाला. यूएईकडून सलामीवीर अलिशन शराफूने सर्वाधिक २२ धावांची खेळी केली.

A dominating show with the bat! 💪 A 9⃣-wicket win for #TeamIndia after chasing down the target in 4.3 overs. 👏👏 Scorecard ▶️ https://t.co/Bmq1j2LGnG#AsiaCup2025 | #INDvUAE pic.twitter.com/ruZJ4mvOIV — BCCI (@BCCI) September 10, 2025

कुलदीप यादव आणि शिवम दुबे यांची शानदार गोलंदाजी

भारतीय गोलंदाजांनी यूएईच्या फलंदाजांवर सुरुवातीपासूनच वर्चस्व राखले. टीम इंडियासाठी जसप्रीत बुमराहने पहिला मोठा बळी मिळवला. भारताकडून कुलदीप यादवने सर्वाधिक ४ गडी बाद केले, तर शिवम दुबेने ३ विकेट्स घेतल्या. यूएईला ५७ धावांवर रोखल्यानंतर भारताला हा सामना जिंकण्यासाठी २० षटकांत केवळ ५८ धावा करायच्या होत्या.

हे देखील वाचा: Asia cup 2025 : ‘लाज वाटू दे देशद्रोही माणसा…’, पाकविरुद्धच्या सामन्यापूर्वी सूर्याकडून मोठी चूक? चाहत्यांचा उडाला भडका

भारताने ४.३ षटकांतच सामना जिंकला

छोट्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या टीम इंडियाने धमाकेदार सुरुवात केली. दोन्ही सलामीवीरांनी अवघ्या २३ चेंडूत ४८ धावांची भागीदारी केली. टीम इंडियाने केवळ ४.३ षटकांत एक गडी गमावून ५८ धावांचे लक्ष्य पार केले. भारताकडून सलामीवीर अभिषेक शर्माने ३० धावांची धुवांधार खेळी केली, ज्यात त्याने २ चौकार आणि ३ षटकार लगावले. तर शुभमन गिल २० धावांवर नाबाद राहिला. यूएईकडून जुनैद सिद्दीकीने एकमेव विकेट घेतली. आशिया कपमधील आपला दुसरा सामना भारतीय संघ आता १४ सप्टेंबर, रविवारी पाकिस्तानविरुद्ध खेळणार आहे. हा रोमांचक सामना रात्री ८ वाजता दुबई इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाईल.

 

Web Title: Ind vs uae india crushes uae by 9 wickets

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 10, 2025 | 09:58 PM

Topics:  

  • Asia cup 2025
  • cricket
  • IND vs UAE
  • Kuldeep Yadav
  • Sports News
  • Team India

संबंधित बातम्या

Video Viral: मॅचनंतर स्टेडियमची स्वच्छता, FIFA World Cup मध्ये जपानच्या चाहत्यांनी जिंकलं मन, जगभरात कौतुक
1

Video Viral: मॅचनंतर स्टेडियमची स्वच्छता, FIFA World Cup मध्ये जपानच्या चाहत्यांनी जिंकलं मन, जगभरात कौतुक

Archery World Cup: धीरज बोम्मादेवराने मिळवले आर्चरी विश्व कपमध्ये Double Gold, फायनलमध्ये साऊथ कोरियाच्या खेळाडूला मात
2

Archery World Cup: धीरज बोम्मादेवराने मिळवले आर्चरी विश्व कपमध्ये Double Gold, फायनलमध्ये साऊथ कोरियाच्या खेळाडूला मात

IND W vs PAK W: स्मृती-हरमनप्रीत जोडीचा ऐतिहासिक कीर्तिमान! पाकिस्ताविरुद्ध केली आजवरची सर्वात मोठी पार्टनरशिप
3

IND W vs PAK W: स्मृती-हरमनप्रीत जोडीचा ऐतिहासिक कीर्तिमान! पाकिस्ताविरुद्ध केली आजवरची सर्वात मोठी पार्टनरशिप

IND W vs PAK W Live Score: स्मृती-ऋचाच्या बॅटिंगने पाकिस्तानात थरकाप! टीम इंडियाच्या १७० धावा; पाकड्यांना विजयासाठी कठीण आव्हान
4

IND W vs PAK W Live Score: स्मृती-ऋचाच्या बॅटिंगने पाकिस्तानात थरकाप! टीम इंडियाच्या १७० धावा; पाकड्यांना विजयासाठी कठीण आव्हान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.