Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs WI 2nd Test! रवींद्र जडेजाच्या जाळ्यात वेस्ट इंडिज! भारत मजबूत स्थितीत, घेतली 387 धावांची आघाडी 

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यातील दूसरा दिवसाचा खेळ संपला आहे. दिल्ली कसोटीच्या दुसऱ्या दिवसाअखेर भारताने ३८७ धावांची मोठी आघाडी घेऊन सामन्यावर पकड जमवली आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Oct 11, 2025 | 06:11 PM
IND vs WI 2nd Test! Ravindra Jadeja nets West Indies! India in strong position, takes 387-run lead

IND vs WI 2nd Test! Ravindra Jadeja nets West Indies! India in strong position, takes 387-run lead

Follow Us
Close
Follow Us:

IND vs WI 2nd Test : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात दुसरा कसोटी सामना दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळला जात आहे. दिल्ली कसोटीच्या दुसऱ्या दिवसाअखेर भारताने ३८७ धावांची मोठी आघाडी घेऊन सामन्यावर चांगलीच पकड जमवली आहे. रवींद्र जडेजाने घेतलेल्या ३ विकेट्समुळे वेस्ट इंडिज संघ चांगलाच अडचणीत आला. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा वेस्ट इंडिजने ४३ षटकांत ४ गडी गमावून १४० धावा केल्या होत्या. वेस्ट इंडिज अजूनही ३७८ धावांनी पिछाडीवर आहे. वेस्ट इंडिजकडून टेविन इमलाच १४ धावा  आणि शाई होप ३१ धावांवर नाबाद आहेत. भारताकडून रवींद्र जडेजाने १४ षटकांत ३७ धावा देत सर्वाधिक ३ बळी घेतले आहेत, तर कुलदीपने एक बळी टिपला आहे.

हेही वाचा : IND vs WI : शुभमन गिलचा धमाका सुरूच! वेस्ट इंडिजविरुद्ध शतक झळकवून डॉन ब्रॅडमन यांचा विक्रम केला उद्ध्वस्त

भारताचा दबदबा

रवींद्र जडेजाने तीन विकेट्स घेऊन वेस्ट इंडिजवर जोरदार हल्ला चढवला. या धक्क्यातून वेस्ट इंडिजला सावरता  आले नाही. संघ दबावात आला. वेस्ट इंडिजच्या संघाने चार गडी गमावले आहेत. रोस्टन चेसची चौथी विकेट गमावली, जो धावा काढण्यात अपयशी ठरला. त्याला भोपळाही न फोडता जाडेजाने माघारी पाठवले. त्याआधी, वेस्ट इंडिजने जॉन कॅम्पबेल (१०), तेजनारायण चंद्रपॉल (३४) आणि अॅलेक अथानासे (४१) यांच्या महत्वाच्या विकेट गमावल्या. त्याआधी, नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी केल्यानंतर भारताने पहिल्या डावात ५१८ धावांवर आपला डाव घोषित केला.

भारताचा डाव

भारताने दुसऱ्या दिवशी ३१८ धावांवर आपला डाव सुरू केला. भारतीय फलदाजांनी दीड सत्रात २०० धावा जोडल्यानंतर डाव घोषित केला केला. पहिल्या दिवशी १७३ धावांवर नाबाद राहिलेला यशस्वी जयस्वालचे द्विशतक थोड्याने हुकले आणि  तो १७५ धावांवर धावबाद झाला. तथापि, कर्णधार शुभमन गिलने आपली लय कायम राखत एक शानदार शतक झळकावले.  नितीश कुमार रेड्डीने ४३ आणि ध्रुव जुरेल यांनी ४४ धावा केल्या. जुरेलची विकेट पडताच गिलने ५१८ धावांवर डाव घोषित केला. शुभमन गिल १२९ धावांवर नाबाद राहिला.

हेही वाचा : IND vs WI : ऐकावे ते नवलच! 175 धावा करूनही, यशस्वी जयस्वालच्या झोळीत नकोसा विक्रम

१७५ धावांवर यशस्वी जयस्वाल धावबाद

भारतीय संघाचा सलामीवीर यशस्वी जयस्वाल पहिल्या दिवशी १७३ धावांवर नाबाद राहिला होता.  त्याने मैदानाच्या प्रत्येक कोपऱ्यात शॉट्स मारले आणि वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांना चांगलाच घाम फोडला. त्याने १७३ पासून पुढे खेळताना फक्त २ धावांची भर टाकली.  त्याने २५८ चेंडूंचा सामना करत  १७५ धावा केल्या. त्याने २२ चौकार मारले. पण तो द्विशतकाकडे वाटचाल करत असतानाच एका चुकीच्या कॉलमुळे तो धावबाद झाला आणि त्याचा डाव १७५ धावांवर आटोपला.

Web Title: Ind vs wi india in strong position against west indies on second day take 387 run lead

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 11, 2025 | 06:11 PM

Topics:  

  • Ind vs WI
  • Shubhman Gill
  • Test Match

संबंधित बातम्या

AUS vs ENG : कसोटी क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाने घडवला इतिहास! सर्वात कमी चेंडूत गाजवला ‘हा’ पराक्रम 
1

AUS vs ENG : कसोटी क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाने घडवला इतिहास! सर्वात कमी चेंडूत गाजवला ‘हा’ पराक्रम 

Ind vs SA Test : गौतम गंभीरच्या प्रयोगांचे भारतीय संघाला अपचन! दीड वर्षात नंबर ३ वर खेळवले गेले ‘सात’ फलंदाज
2

Ind vs SA Test : गौतम गंभीरच्या प्रयोगांचे भारतीय संघाला अपचन! दीड वर्षात नंबर ३ वर खेळवले गेले ‘सात’ फलंदाज

Ind vs SA 2nd Test: पहिल्या दिवसाचा खेळ समाप्त! दक्षिण आफ्रिकेचा स्कोअर 247/6, कुलदीपची शानदार गोलंदाजी
3

Ind vs SA 2nd Test: पहिल्या दिवसाचा खेळ समाप्त! दक्षिण आफ्रिकेचा स्कोअर 247/6, कुलदीपची शानदार गोलंदाजी

Ind vs SA 2nd Test : दुसऱ्या कसोटीतून गिल बाहेर! प्रिन्सच्या जागा घ्यायला ‘या’ दोन खेळाडूंचे नाव चर्चेत 
4

Ind vs SA 2nd Test : दुसऱ्या कसोटीतून गिल बाहेर! प्रिन्सच्या जागा घ्यायला ‘या’ दोन खेळाडूंचे नाव चर्चेत 

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.