Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND W vs AUS W Semi Final Live : ऑस्ट्रेलियाचा TOSS जिंकून फलंदाजीचा निर्णय; भारतीय गोलंदाजांची अग्निपरीक्षा

आज २०२५ च्या महिला एकदिवसीय विश्वचषकात भारतीय महिला संघ आणि ऑस्ट्रेलिया महिला संघ आमनेसामने आले आहे. सामन्याआधी ऑस्ट्रेलिया संघाने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Oct 30, 2025 | 03:05 PM
IND W vs AUS W Semi Final Live: Australia wins the TOSS and decides to bat; Indian bowlers' test

IND W vs AUS W Semi Final Live: Australia wins the TOSS and decides to bat; Indian bowlers' test

Follow Us
Close
Follow Us:
  • सेमीफायनलमध्ये भारत वि ऑस्ट्रेलिया अमानेसामने 
  • ऑस्ट्रेलियाचा TOSS जिंकून फलंदाजीचा निर्णय
  • डॉ. डी.वाय. पाटील स्पोर्ट्स अकादमी स्टेडियमवर सामना 
IND W vs AUS W Semi Final Live  : आज महिला एकदिवसीय विश्वचषकात भारतीय महिला संघ आणि ऑस्ट्रेलिया महिला संघ आमनेसामने असणार आहे. हा सामना नवी मुंबई  येथील डॉ. डी.वाय. पाटील स्पोर्ट्स अकादमी स्टेडियमवर खेळला जाणार आहे. सामान्यायाधी ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारत  प्रथम गोलंदाजी करताना दिसणार आहे. दोन्ही संघासाठी हा सामना जिंकणे अपरिहार्य आहे. पहिल्या सेमीफायनल सामन्यात दक्षिण आफ्रिका संघाने इंग्लंडला पराभूत करत अंतिम फेरीत धडक मारली आहे. त्यामुळे कर्णधार हरमनप्रीत कौर आपल्या संघाला फायनलचे तिकीट मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असेल तर दुसरीकडे जबरदस्त फॉर्म मध्ये असणारा बलाढ्य असुन ऑस्ट्रेलिया संघ विजयी रथ कायम ठेवत अंतिम फेरीत प्रवेश करण्यासाठी उत्सुक असणार आहे.

हेही वाचा : ‘मला आधीच खलनायक बनवल…’ मोहम्मद शमीची BCCI सोबत टक्कर;पुनरागमनाबद्दलच्या विधानाने खळबळ

ऑस्ट्रेलिया आणि भारत हेड टू  हेड रेकॉर्ड

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आतापर्यंत ६० एकदिवसीय सामने खेळले गेले आहेत.  ज्यामध्ये भारतीय संघाने ११ जिंकले आहेत आणि ४९ गमावले आहेत. भारतीय भूमीवर खेळल्या गेलेल्या एकदिवसीय सामन्यांच्या बाबतीत, ऑस्ट्रेलियाने आतापर्यंत खेळलेल्या २८ एकदिवसीय सामन्यांपैकी २३ सामने आपल्या नावे केले आहेत.

दक्षिण आफ्रिका २०२५ च्या महिला एकदिवसीय विश्वचषकासाठी पहिला अंतिम संघ बनला आहे. दुसरा अंतिम संघ आता नवी मुंबईत खेळल्या जाणाऱ्या भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामन्याद्वारे निश्चित होणार आहे.  त्यामुळे या सामन्यात जो जिंकेल त्याला अंतिम सामन्याचे तिकीट मिळणार आहे.

हेही वाचा : ENG W vs SA W Semifinal Match : दक्षिण आफ्रिकेची अंतिम फेरीत दिमाखात एंट्री! इंग्लंडचा 125 धावांनी केला पराभव

 हवामान अंदाज काय?

आज सकाळी मुंबईत पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली  होती. तथापि, भारत-ऑस्ट्रेलिया सामना सुरू होईपर्यंत पावसाची शक्यता फक्त २०% असणार आहे. संध्याकाळी ही शक्यता आणखी कमी होईल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

पिच रिपोर्ट

भारत-ऑस्ट्रेलिया सेमीफायनल सामना डीवाय पाटील स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. या मैदानावरील खेळपट्टी फलंदाजांसाठी चांगली मानण्यात येते.  फलंदाजांना येथे मदत मिळत आली आहे. या खेळपट्टीचा फायदा फिरकीपटूंना देखील होतो. आज आपल्याला उच्च-स्कोअरिंग सामना पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

ऑस्ट्रेलियाचा संभाव्य प्लेइंग ११

ऑस्ट्रेलिया : फोबी लिचफिल्ड, एलिसा हीली (यष्टीरक्षक/कर्णधार), एलिस पेरी, बेथ मूनी, अ‍ॅनाबेल सदरलँड, अ‍ॅशले गार्डनर, ताहलिया मॅकग्रा, सोफी मोलिनेक्स, अलाना किंग, किम गार्थ, मेगन शट.

भारताचा संभाव्य प्लेइंग ११

भारत :शफाली वर्मा, स्मृती मानधना, अमनजोत कौर, जेमिमाह रॉड्रिग्स, हरमनप्रीत कौर (कर्णधार), दीप्ती शर्मा, रिचा घोष (यष्टीरक्षक), राधा यादव, क्रांती गौर, श्री चरणी, रेणुका सिंग ठाकूर.

Web Title: Ind w vs aus w semi final australia wins the toss and decides to bat marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 30, 2025 | 02:35 PM

Topics:  

  • Alyssa Healy
  • Harmanpreet Kaur
  • ICC Women Cricket World Cup 2025
  • IND VS AUS

संबंधित बातम्या

लग्न मोडल्यानंतर पहिल्यांदाच दिसली Smriti Mandhana, म्हणाली – जर मला काही आवडत असेल तर…
1

लग्न मोडल्यानंतर पहिल्यांदाच दिसली Smriti Mandhana, म्हणाली – जर मला काही आवडत असेल तर…

IND W vs SL W:  श्रीलंकेविरुद्धच्या भारतीय संघाची घोषणा! विश्वचषकातनंतर महिला खेळाडू पहिल्यांदाच उतरणार मैदानात 
2

IND W vs SL W:  श्रीलंकेविरुद्धच्या भारतीय संघाची घोषणा! विश्वचषकातनंतर महिला खेळाडू पहिल्यांदाच उतरणार मैदानात 

IND vs SA 3rd ODI : विशाखापट्टणममध्ये यशस्वी जयस्वालचे शानदार शतक! ODI क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच शतकी खेळी 
3

IND vs SA 3rd ODI : विशाखापट्टणममध्ये यशस्वी जयस्वालचे शानदार शतक! ODI क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच शतकी खेळी 

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.