मोहम्मद शमी(फोटो-सोशल मीडिया)
हेही वाचा : ‘या’ माजी क्रिकेटपटूच्या नव्या इनिंगला सुरुवात! माजी कर्णधार घेणार तेलंगण राज्याच्या मंत्रीपदाची शपथ
गुजरातविरुद्धच्या दुसऱ्या डावात, शमीने ३८ धावा देत ५ बळी घेतले आणि संघाला १४१ धावांनी शानदार विजय मिळवून दिला. ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी संघात समावेश न करण्याबद्दल मुख्य निवडक अजित आगरकर यांच्या विधानाबद्दल त्याला काय वाटते? असा प्रश्न विचारण्यात आला तेव्हा शमी हसला आणि म्हणाला की, “मला माहित होते की हा प्रश्न येणारच आहे. मी नेहमीच कोणत्या ना कोणत्या वादात अडकत असतो. तुम्ही लोकांनी मला आधीच खलनायक बनवून टाकले आहे. आजकाल सोशल मीडियावर सर्वकाही विकृत करण्यात येत आहे. माझे काम फक्त चांगली कामगिरी करणे आणि नेहमीच भारतीय संघासाठी तयार राहणे आहे. जिथे मला संधी मिळेल तिथे मी माझे सर्वोत्तम देईन. बाकी निवडकर्त्यांचा पूढील निर्णय आहे.”
शमी पुढे म्हणाला की, “कठीण काळातून बाहेर पडून चांगली कामगिरी करणे खूप समाधानकारक असते. विश्वचषक नंतरचा काळ माझ्यासाठी खूप कठीण राहिला होता, परंतु मी हार मानली नाही. रणजी ट्रॉफी, व्हाईट-बॉल क्रिकेट, आयपीएल आणि दुलीप ट्रॉफी खेळून मी माझी लय परत मिळवली असून आता मला वाटते की माझ्यात अजून देखील खूप क्रिकेट शिल्लक आहे.”
मोहम्मद शमीचे बालपणीचे प्रशिक्षक मोहम्मद बद्रुद्दीन यांनी देखील त्याच्या कामगिरीचे कौतुक केले आहे. त्यांनी इंडियन एक्सप्रेसला सांगितले की, “शमीची लय परतली असून तो पूर्णपणे तंदुरुस्त आहे. जेव्हा तो त्याच्या लयीत असतो तेव्हा तो एक वेगळा गोलंदाज बनत असतो. आज मी जे पाहिले ते पूर्वीसारखेच शमी होते. त्याच्यात कोणत्याही कमतरता दिसल्या नाहीत.”
२०२३ च्या एकदिवसीय विश्वचषक फायनलनंतर मोहम्मद शमीने भारतासाठी एकही सामना खेळलेला नाही. तो शेवटचा ९ मार्च २०२५ रोजी दुबईमध्ये न्यूझीलंडविरुद्ध चॅम्पियन्स ट्रॉफी फायनलमध्ये खेळला होता. आता, रणजी ट्रॉफीमधील त्याच्या शानदार कामगिरीमुळे तो पुन्हा एकदा टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये परतण्याची शक्यता निर्माण झाली आहे.






