भारताचे दक्षिण आफ्रिकेसमोर 299 धावांचे लक्ष्य(फोटो-सोशल मीडिया)
नवी मुंबईमध्ये पावसामुळे सामना एक तास उशिराने सुरू झाला. सामन्याआधी दक्षिण आफ्रिकेची कर्णधार लॉरा वोल्वार्डने जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेऊन भारताल प्रथम फलंदाजी करण्यास पाचारण केले. भारतीय डावाची सुरवात शफाली वर्मा आणि स्मृती मानधना या सलामीवीर जोडीने केली. दोन्ही खेळाडू चांगल्या फॉर्ममध्ये दिसून आल्या. वर्मा आणि स्मृती यांनी १७.४ ओव्हरमध्ये पहिल्या विकेट्ससाठी १०४ धावांची भागीदारी रचून संघाचा पाया रचला. यानंतर स्मृती ४५ धावा काढून बाद झाली. तीला क्लो ट्रायॉनने बाद केले. यानंतर मैदानात आली सेमीफायनल सामन्यातील शतकवीर जेमिमाह रॉड्रिग्स. मैदानावर शानदार खेळत असल्याचे ती दिसून आली मात्र सेट झाल्यावर ती बाद झाली. ती २४ धावांवर बाद झाली. तीला अयाबोंगा खाकाने बाद केले.
Innings Break! A flourish from Deepti Sharma and Richa Ghosh propels #TeamIndia to 2⃣9⃣8⃣/7 after 50 overs 🤜🤛 Over to our bowlers now! 👍 Scorecard ▶ https://t.co/TIbbeE4ViO#WomenInBlue | #CWC25 | #INDvSA | #Final pic.twitter.com/eFNztfR0xQ — BCCI Women (@BCCIWomen) November 2, 2025
जेमिमा नंतर मैदानात आलेल्या कर्णधार हरमनप्रीत कौर मात्र संघर्ष करताना दिसून आली आणि ती २० धावांवर मलबाची शिकार ठरली. या दरम्यान सलामीवीर शेफाली वर्माने आपले शतक पूर्ण केले. नंतर तीला शतकाने हुलकावणी दिली आणि ती ७८ चेंडूत ८७ धावा काढून बाद झाली. तिने आपल्या खेळीत ७ चौकार आणि २ षटकार लगावले. त्यानंतर दीप्ती शर्माने एक बाजू धरून लावली आणि शानदार फटकेबाजी करत संघाला सावरले. ती शेवटच्या ओव्हरमध्ये धावबाद झाली. तिने ५८ चेंडूत ५८ धावा केल्या. यामध्ये तिने ३ चौकार आणि १ षटकार लगावला. ऋचा घोष ३४ धावांची महत्वपूर्ण खेळी करून बाद झाली. तसेच अमनजोत कौर १२ धावा करून बाद झाली तर राधा यादव ३ धावा करून नाबाद राहिली. दक्षिण आफ्रिकेकडून अयाबोंगा खाकाने ९ ओव्हरमध्ये ५८ धावा देऊन सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. तर नॉनकुलुलेको म्लाबा क्लो ट्रायॉन आणि नादिन डी क्लर्क यांनी प्रत्येकी एक विकेट्स घेतली.
शफाली वर्मा, स्मृती मानधना, जेमिमाह रॉड्रिग्स, हरमनप्रीत कौर (कर्णधार), दीप्ती शर्मा, ऋचा घोष (यष्टीरक्षक), अमनजोत कौर, राधा यादव, क्रांती गौड, श्री चरणी, रेणुका सिंग ठाकूर.
हेही वाचा : IND vs AUS 3rd T20 : टिम डेव्हिडचा भारताविरुद्ध चमत्कार! टी-२० सामन्यात लगावला सर्वात लांब षटकार; पहा Video
लॉरा वोल्वार्ड (कर्णधार), ताजमिन ब्रिट्स, अनेके बॉश, सुने लुस, मारिझान कॅप, सिनालो जाफ्ता (यष्टीरक्षक), अनेरी डेर्कसेन, क्लो ट्रायॉन, नादिन डी क्लर्क, अयाबोंगा खाका, नॉनकुलुलेको म्लाबा.






