भारतीय महिला संघ(फोटो-सोशल मिडिया)
IND W vs SA W : श्रीलंकेत त्रिकोणी मालिका खेळली जात आहे. भारतीय महिला संघाने दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून अंतिम फेरीत धडक मारली आहे. भारतीय महिला संघाने दक्षिण आफ्रिकेला २३ धावांनी पराभूत केले आहे. ११ मे रोजी भारतीय महिला संघ आणि श्रीलंकेच्या महिला संघासोबत अंतिम सामन्यात भिडणार आहे.
दक्षिण आफ्रिकेच्या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने ५० षटकांत ९ गडी गमावून ३३७ धावांचा डोंगर उभा केला होता. तथापि, भारतीय महिला संघाची सुरुवात खराब झाली. भारताने फक्त ५० धावांवर तीन विकेट गमावल्या होत्या. तिथून, स्मृती मानधना आणि जेमिमा रॉड्रिग्ज यांनी मिळून डाव सावरला आणि तो पुढे नेला.
प्रतिका रावल जास्त वेळ टिकू शकली नाही नाही. ती १ धाव काढत बाद झाली. त्यानंतर हरलीन देओल ४ धावा करून माघारी परतली. दरम्यान, हरमनप्रीत देखील फार काही करू शकली नाही. ती २८ धावांची खेळी खेळून पॅव्हेलियनमध्ये परतली. येथून स्मृती मानधना आणि जेमिमा रॉड्रिग्ज यांनी मिळून ९९ चेंडूत ८८ धावांची भागीदारी रचली. मंधाना ५१ धावांवर असताना बाद झाली. त्यानंतर जेमिमाने दीप्ती शर्मासोबत पाचव्या विकेटसाठी शतकी भागीदारी करत भारताला सावरले. त्यांनी ११५ चेंडूत १२२ धावांची शानदार भागीदारी रचली.
यादरम्यान जेमिमाने आपले शतक पूर्ण केले. जेमिमाने ८९ चेंडूचा सामना करत शतक पूर्ण केले. तिने १०१ चेंडूंत १२३ धावांची खेळी केली. यामध्ये तिने १५ चौकार आणि १ षटकार मारला. दीप्ती शर्माने देखील शानदार खेळ करत १० चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ९३ धावांची खेळी केली. त्याशिवाय रिचा घोषने २० धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेकडून मसाबाटा क्लासने २, नादिन डी क्लार्कने २ आणि नोनकुलुलेको म्लाबाने २ विकेट मिळवल्या.
प्रत्युत्तरात, दक्षिण आफ्रिकेने या लक्ष्याचा पाठलाग करताना ७ गडी गमावून फक्त ३१४ धावाछ करता आल्या. दक्षिण आफ्रिकेची सुरुवात चांगली झाली नाही. लारा गुडॉल ४ धावांवर असताना बाद झाली आहे. त्यानंतर तेजमिन ब्रिट्सने २६ आणि मियान स्मितने ३९ धावा केल्या. अँरी डिर्कसेनने ८१, नोंडुमिसो शांगसेने ३६, सिनालो जाफ्ता यांनी २१, क्लीया ट्रायॉनने ६७ तसेच नादिन डी क्लार्कने २२ धावा केल्या. भारतीय संघाकडून अमनजोत कौरने सर्वाधिक ३, दीप्ती शर्माने २ आणि श्री चरणीने १ विकेट घेतली.