महेंद्रसिंग धोनी आणि अजिंक्य रहाणे(फोटो-सोशल मीडिया)
CSK vs KKR : इंडियन प्रीमियर लीग २०२५ मध्ये आतापर्यंत ५७ सामने खेळवण्यात आले आहेत. ५७ वा सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात काल(७ मे) खेळला गेला. सामन्यापूर्वी केकेआरचा कर्णधार अजिंक्य रहाणेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. त्यानंतर केकेआरने १८० धावा उभारल्या. चेन्नईच्या संघाने दोन चेंडू शिल्लक ठेवत ही धावसंख्या गाठली. या पराभवामुळे कोलकाताचा आयपीएल २०२५ मध्ये प्लेऑफचा मार्गही कठीण होऊन बसलाया आहे. चेन्नईच्या या विजयाचा हीरो डेवाल्ड ब्रेव्हिस ठरला आहे. त्याने जलद गतीने अर्धशतक साकारत चेन्नईला लक्षपर्यंत पोहचवले आणि अखेर कर्णधार महेंद्रसिंग धोनीने आपल्या स्टाइलने १७ धावांची नाबाद खेळी करत संघाचा विजय निश्चित केला.
चेन्नईविरुद्ध १७९ धावांचा बचाव करण्यात कोलकाता यश आले नाही. युवा गोलंदाज वैभव अरोराने चेन्नईच्या तीन गोलंदाजांना माघारी पाठवले. परंतु, त्याला त्या बदल्यात भरपूर धावा मोजाव्या लागल्या. त्याने तीन षटकांत ४८ धावा दिल्या. याशिवाय हर्षित राणा आणि वरुण चक्रवर्ती यांनी प्रत्येकी २-२ विकेट घेतल्या परंतु त्यांना अखेरपर्यंत चेन्नईला रोखता आले नाही.
हेही वाचा : Rohit Sharma Retire: हिटमॅनने टेस्ट क्रिकेटला कायमचा ठोकला राम राम, म्हणाला,” मी ODI फॉरमॅटमध्ये…
चेन्नईच्या या विजयात युवा फलंदाज डेवाल्ड ब्रेव्हिसने चमकदार खेळी करत चेन्नईची लाज राखली. त्याने कोलकाताविरुद्ध २५ चेंडूत ५२ धावांची शानदार खेळी केली. वैभव अरोराच्या एका षटकात त्याने तब्बल ३० धावा वसूल केल्या. त्याच्या खेळीमुळे चेन्नईला १७९ धावांचा पाठलाग करण्यात खूप सोपे गेले. याशिवाय उर्विल पटेलने ११ चेंडूत २८१ च्या स्ट्राईक रेटने ३१ धावांची धामकेदार खेळी केली. तसेच शिवम दुबेने देखील महत्वपूर्ण ४५ धावा केल्या. दरम्यान, चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी १७ धावा करून नाबाद राहिला आणि त्याने संघाला विजयी केले.
चेन्नईविरुद्ध कोलकात्याच्या एकाही फलंदाजाला अर्धशतक ठोकता आले नाही. केकेआरचा कर्णधार अजिंक्य रहाणेने सर्वाधिक ४८ धावा केल्या. त्याने आपल्या खेळीत ३३ चेंडचा सामना केला, यामध्ये त्याने ४ चौकार आणि २ षटकार मारले. याशिवाय आंद्रे रसेलने ३८ धावा, मनीष पांडे ३६ धावा यांनी देखील योगदान दिले. तसेच सुरुवातीला सलामीवीर सुनील नारायणने २६ धावा केल्या. दुसरीकडे, तरुण फलंदाज अंगकृष रघुवंशी आणि रिंकू सिंग सामन्यात छाप पाडण्यात अपयशी ठरले.
गोलंदाजीत, चेन्नईकडून फिरकी गोलंदाज नूर अहमदने शानदार कामगिरी करत चार षटकांत ७.८० च्या इकॉनॉमीसह ३१ धावा देत ४ विकेट्स मिळवल्या. याशिवाय अंशुल कंबोज आणि रवींद्र जडेजाने प्रत्येकी 1 विकेट घेतली.