ऑपरेशन सिंदूरचा नक्की उद्देश काय?, पत्रकार परिषदेत घेत भारतीय लष्कराने दिली A टू Z माहिती
Operation Sindoor : सध्या देशात पाकिस्तानविरुद्ध रोष असल्याचे दिसत आहे. २२ एप्रिल रोजी, पाकिस्तान समर्थित अतिरेक्यांनी काश्मीरमधील पहलगाम येथे केलेल्या हल्ल्यात २६ भारतीयांची हत्या करण्यात आली. यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात तणाव वाढत गेला. भारताने पाकिस्तानविरुद्ध कठोर कारवाई करण्यास सुरवात असून ७ मे च्या रात्री, भारताने या पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवत पाकिस्तानमधील नऊ दहशतवादी तळांवर हवाई हल्ले केले. यामध्ये अनेक दहशतवादी मारले गेलेय आहेत. भारतीय लष्कराच्या या ऑपरेशन सिंदूरचे माजी भारतीय क्रिकेटपटू आणि इतर क्रीडा क्षेत्रातील व्यक्तींकडून कौतुक करण्यात येत आहे. क्रीडा जगतातील सचिन तेंडुलकर, हरभजन सिंग, वीरेंद्र सेहवाग, बॉक्सर विजेंदर सिंग आणि कुस्तीपटू योगेश्वर दत्त यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिलीय आहे.
भारतीय सशस्त्र दलांकडून बुधवारी पहाटे पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर मध्ये नऊ दहशतवादी लाँच पॅडवर क्षेपणास्त्र डागले. ज्यामध्ये जैश-ए-मोहम्मदचा बालेकिल्ला बहावलपूर आणि लष्कर-ए-तैयबाचे केंद्र मुरीदके यांचा समावेश आहे. २२ एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या प्रत्युत्तरात ही कारवाई केली गेली आहे.
ऑपरेशन सिंदूरचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. क्रीडा जगत देखील यापासून दूर राहिले नाही. क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर म्हणाला की, ‘एकतेत निर्भय, शक्तीत अमर्याद. भारताची ढाल म्हणजे त्याचे लोक. या जगात दहशतवादाला स्थान नाही. आम्ही एक संघ आहोत! जय हिंद.’ तर माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागने लिहितो की, जर कोणी तुमच्यावर दगड फेकले तर त्याच्यावर फुले फेकून द्या पण एका कुंडीसोबत. जय हिंद.”
Fearless in unity. Boundless in strength. India’s shield is her people. There’s no room for terrorism in this world. We’re ONE TEAM!
Jai Hind 🇮🇳#OperationSindoor
— Sachin Tendulkar (@sachin_rt) May 7, 2025
माजी क्रिकेटपटू शिखर धवन याने देखील आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. भारताने दहशतवादाविरुद्ध कारवाई केली. माजी क्रिकेटपटू इरफान पठाण आणि ऑलिंपिक पदक विजेती बॅडमिंटनपटू सायना नेहवाल यांनी देखील जय हिंद असे लिहिले आहे.
India takes a stand against terrorism. भारत माता की जय! 🇮🇳
— Shikhar Dhawan (@SDhawan25) May 7, 2025
ऑलिंपिक पदक विजेता बॉक्सर विजेंदर सिंग आणि कुस्तीगीर योगेश्वर दत्त यांनी सुद्धा सैन्याचे कौतुक केलेया आहे. विजेंदरने भारत माता की जय लिहिले. तर योगेश्वरने लिहिले की भारत आता दहशतवाद सहन करणार नाही. जय हिंद, जय जवान.
बुद्धिबळपटू विदित गुजराती याने म्हटले आहे की, पहलगाम येथील भयानक हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूरद्वारे योग्य उत्तर देण्यात आले, याचा मला आनंद आहे. दहशतवादाला उत्तर दिलेच पाहिजे. ऑपरेशनला किती सुंदर नाव आहे. भारत माता चिरंजीव होवो. असे त्याने म्हटले आहे.