Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs SA 3rd T20I: धर्मशाळा येथे भारताचा पलटवार! ७ विकेट्सने दक्षिण आफ्रिकेवर मिळवला दणदणीत विजय; मालिकेत २-० अशी आघाडी

IND vs SA: मालिकेतील तिसरा सामना आज धर्मशाळेतील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन  स्टेडियमवर खेळवला गेला. या सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा ७ विकेट राखून पराभव केला.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Dec 14, 2025 | 10:22 PM
भारताने दक्षिण आफ्रिकेचा ७ विकेटने केला पराभव (Photo Credit - X)

भारताने दक्षिण आफ्रिकेचा ७ विकेटने केला पराभव (Photo Credit - X)

Follow Us
Follow Us:

 

  • धर्मशाळा येथे भारताचा ७ विकेट्सने दणदणीत विजय!
  • दक्षिण आफ्रिकेचा दारुण पराभव
  • मालिकेत २-० अशी आघाडी
IND vs SA 3rd T20I Marathi News: टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका (IND vs SA) यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील तिसरा सामना आज धर्मशाळेतील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन  स्टेडियमवर (Himachal Pradesh Cricket Association Stadium, Dharamsala) खेळवला गेला. या सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा ७ विकेट राखून पराभव केला आणि मालिकेत पुनरागमन करत २-० अशी आघाडी घेतली आहे.

दक्षिण आफ्रिका ११७ धावांवर गारद

नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेचा संघ ११७ धावांवर गारद झाला. कर्णधार एडेन मार्कराम (४६ चेंडूत ६१ धावा, सहा चौकार, दोन षटकार) वगळता दक्षिण आफ्रिकेचा कोणताही फलंदाज भारतीय गोलंदाजांचा सामना करू शकला नाही. क्विंटन डी कॉक (१) आणि डेवाल्ड ब्रेव्हिस (२) यांच्यासह सात खेळाडूंना दुहेरी आकडी धावा करता आल्या नाहीत. सलामीवीर रीझा हेंड्रिक्सला आपले खाते उघडता आले नाही. डोनोव्हन फरेरा यांनी २० धावा आणि अ‍ॅनरिच नोर्किया यांनी १२ धावा दिल्या.

हे देखील वाचा: IND vs SA 2nd T20 : ‘भारताची ही चूकच..’, कोच गौतम गंभीरच्या रणनीतीवर माजी भारतीय फलंदाजाचा निशाणा 

धर्मशाळामध्ये भारतीय गोलंदाजांचा कहर 

अर्शदीप सिंग आणि हर्षित राणा यांनी मिळून दक्षिण आफ्रिकेचा वरचा क्रम उध्वस्त केला. मधल्या षटकांमध्ये वरुण चक्रवर्तीने आफ्रिकेच्या फलंदाजांना त्रास दिला आणि चार षटकांमध्ये फक्त ११ धावा देऊन दोन विकेट्स घेतल्या. चक्रवर्ती टी-२० क्रिकेट इतिहासात सर्वात कमी चेंडूंमध्ये ५० विकेट्स पूर्ण करणारा गोलंदाज बनला. या यादीत त्याच्या पुढे फक्त कुलदीप यादव, अजंता मेंडिस आणि वानिंदू हसरंगा आहेत. अर्शदीप सिंग आणि हर्षित राणा यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या, तर चक्रवर्ती आणि कुलदीप यांनीही दोन विकेट्स घेतल्या. ‘बर्थडे बॉय’ कुलदीप यादवने सामन्यात फक्त दोन षटके टाकली आणि दोन विकेट्स घेतल्या.

भारताची बेधडक फलंदाजी

लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाने बेधडक सुरुवात केली. अभिषेक शर्माने पहिल्या चेंडूत षटकार लगावला. तर शुभमन गिलने ही त्याला चांगली साथ दिली. अभिषेक शर्माने ४ चौकार ३ षटकार मारून ३५ धावा करुन बाद झाला. तसेच गिलने २८ धावा करुन बाद झाला. त्यानंतर, कर्णधार सूर्यकुमार यादवने १२ धावांचे योगदान दिले. तिलक वर्माने डाव सांभळला आणि भारताला १५.५ षटकात विजय मिळवून दिला. दक्षिण आफ्रिकेकडून कॉर्बिन बॉशला एक विकेट मिळाली. आता मालिकेतील चौथा टी-२० सामना लखनौ येथे भारतरत्न श्री अटल बिहारी वाजपेयी एकना क्रिकेट स्टेडियमवर १७ डिंसेबरला खेळवला जाणार आहे.

हे देखील वाचा: IND vs SA 2nd T20 : गौतम गंभीर आणि हार्दिक पंड्या जोडीचा वाद पेटला! दुसऱ्या T20 सामान्यांनंतर घडले असे काही…, पहा VIDEO

Web Title: India secured a resounding 7 wicket victory in dharamshala south africa suffered a crushing defeat

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 14, 2025 | 10:18 PM

Topics:  

  • Ind Vs Sa
  • South Africa
  • Sports News
  • T20
  • Team India

संबंधित बातम्या

Boxing: ३७० खेळाडू, चुरशीच्या लढती अन् पिंपरी-चिंचवडचा विजय; आकुर्डीत ‘थाई बॉक्सिंग’चा थरार
1

Boxing: ३७० खेळाडू, चुरशीच्या लढती अन् पिंपरी-चिंचवडचा विजय; आकुर्डीत ‘थाई बॉक्सिंग’चा थरार

याला म्हणतात पॅशन! निकेतची वादळी शतकी खेळी; Spartan Monsoon League मध्ये टायटन बुल्स्‌चा थरारक विजय
2

याला म्हणतात पॅशन! निकेतची वादळी शतकी खेळी; Spartan Monsoon League मध्ये टायटन बुल्स्‌चा थरारक विजय

कारंजा तालुकास्तरीय स्पर्धेत विद्यार्थ्यांनी मैदान गाजवलं! धावेकर विद्यालयाच्या पाच खेळाडूंची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड
3

कारंजा तालुकास्तरीय स्पर्धेत विद्यार्थ्यांनी मैदान गाजवलं! धावेकर विद्यालयाच्या पाच खेळाडूंची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड

Wrestling: जुन्नरमध्ये कुस्तीचा थरार! समर्थ क्रीडा संकुलातील ११ मल्लांची पुणे जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड
4

Wrestling: जुन्नरमध्ये कुस्तीचा थरार! समर्थ क्रीडा संकुलातील ११ मल्लांची पुणे जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.