भारत वि दक्षिण आफ्रिका(फोटो-सोशल मीडिया)
Robin Uthappa criticizes Gautam Gambhir : भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दूसरा टी 20 सामना गमावला. त्यानंतर भारतीय संघावर आणि संघ व्यवसस्थापनावर टीका होऊ लागली आहे. अशातच आता माजी भारतीय फलंदाज रॉबिन उथप्पा मोठ्या लक्ष्यांचा पाठलाग करताना भारताच्या फलंदाजीच्या रणनीतीबाबत स्पष्टतेचा अभाव असल्याचे म्हटले आहे. तो म्हणाल की, डावाच्या सुरुवातीला जास्त लवचिकतेमुळे धावा काढणे कठीण होऊन जाते. गुरुवारी मुल्लानपूर येथे झालेल्या दुसऱ्या टी-२० सामन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध २१४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताचा डाव १९.१ षटकांत १६२ धावांतच आटोपला.
रॉबिन उथप्पा म्हणाला आय, समस्या सुरुवातीच्या विकेट्सची नव्हती, तर शुभमन गिल बाद झाल्यानंतर स्वीकारलेल्या रणनीती होती. भारताची फलंदाजी मजबूत असली तरी संघाला त्याचा प्रभावीपणे वापर करता आलेला नाही. तो म्हणाला की, “जेव्हा शुभमन गिल बाद झाला तेव्हा अक्षर पटेल फलंदाजीसाठी मैदानात आला. त्यावेळी त्याला अशा फलंदाजाची भूमिका बजावावी लागली जो जोखीम घेऊन अभिषेक शर्मावरील दबाव कमी करण्यासाठी जलद धावा काढण्याचा प्रयत्न करेल.”
उथप्पाच्या मते अक्षरची २१ धावांची संथ खेळी दबाव कमी करण्यासाठी अपयशी ठरली. ज्यामुळे त्याच्याभोवती विकेट पडल्या आणि रणनीतीत मोठा बदल झाल्याचे दिसले. यामुळे पाठलाग आणखी संथ झाला. रॉबिन म्हणाला की “आंतरराष्ट्रीय स्तरावर, फलंदाजांनी त्यांच्या भूमिका आणि डाव कसा पुढे नेट राहायचा याची स्पष्ट समज असणे आवश्यक आहे.”
हेही वाचा : IND vs SA 3rd T20 : मालिकेत आघाडी मिळवण्यासाठी भारतीय संघ पोहोचला धर्मशाळेत, सूर्याची सेना आज सराव करणार
रॉबिन उथप्पा म्हणाला की, “पहिल्या सहा ते आठ षटकांनंतर रणनीतीमध्ये लवचिकता ठीक आहे, परंतु मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करत असताना मजबूत पाया आवश्यक आहे. मजबूत पायाशिवाय तुम्हाला गगनचुंबी इमारत उभारता येत नाही.” तसेच तो पुढे म्हणाला की, “एकाच सामन्यात खेळाडूंनी अनेक भूमिका बजावण्याची अपेक्षा करण्यात आल्याने गोष्टी गुंतागुंतीच्या होत जातात आणि इथेच भारत अपयशी ठरला.”






