गौतम गंभीर आणि हार्दिक पंड्या जोडीचा वाद(फोटो-सोशल मीडिया)
Hardik Pandya and Gautam Gambhir controversy :भारत आणि दक्षिण आफ्रिकायांच्यातील पाच सामन्यांच्या T20 मालिकेतील दुसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने भारताचा 51 धावांनी पराभव केला. या मालिकेत पहिला सामना जिंकून भारताने आघाडी घेतली होती. परंतु आता दक्षिण आफ्रिकेने ही मालिका बरोबरीत आणली आहे. या पराभवानंतर भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि हार्दिक पंड्या एखाद्या गोष्टीवरून वाद घालताना दिसून आले.
भारतीय संघाच्या पराभवानंतर गौतम गंभीर आणि संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या यांच्यात जोरदार वाद झाल्याची बातमी समोर आली आहे. आता याबाबत सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ दुसऱ्या T20 सामन्यानंतरचा असून व्हिडिओमध्ये गंभीर आणि हार्दिक पंड्या काही मिनिटे गप्पा मारताना दिसत आहेत. या दोघांच्या चेहऱ्यावरील हावभावांवरून हे स्पष्ट होते की गंभीर पराभवानंतर संतापलेला असून याच मुद्द्यावर हार्दिकशी वाद घालत असल्याचे म्हटले जात आहे.
मुल्लानपूरमध्ये खेळवण्यात आलेल्या सामन्यात हार्दिक पंड्याची कामगिरी वाईट राहिली होती. गोलंदाजी करताना त्याने ३ षटकांत ३४ धावा मोजल्या, परंतु यावेळी त्याला एकही विकेट घेता आलेली नाही. फलंदाजी करताना त्याला २३ चेंडूंत फक्त २० धावाच करता आल्या. दुसऱ्या सामन्यात त्याची बॅट आणि बॉल दोन्हीमध्ये त्याची कामगिरी निराशाजनक झाली.
मुल्लानपूर येथील नव्याने बांधण्यात आलेल्या महाराजा यादविंद्र सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर दूसरा सामान्य खेळला गेला. या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि फलंदाजीला दक्षिण आफ्रिकेला बोलवले. दक्षिण आफ्रिकेन प्रथम फलंदाजी करत २१३ धावा उभ्या केल्या. दक्षिण आफ्रिकेकडून क्विंटन डी कॉकने फक्त ४७ चेंडूत ७ षटकार आणि ५ चौकार मारत ९० धावा फटकावल्या होत्या.
हेही वाचा : Syed Mushtaq Ali Trophy : बाप रे! टी-२० सामन्यात 432 धावा…! इशान किशनच्या संघाचा पंजाबविरुद्ध ऐतिहासिक विजय
प्रत्युत्तरादाखल, भारताकडून तिलक वर्माने(६२ धावा) चांगली खेळी केली मात्र उर्वरित फलंदाज त्याला साथ देऊ शगकले नाहीत. तिलक वर्माने ६२ धावा केल्या. भारत १६२ धावांच करू शकला परिणामी ५१ धावांनी सामना गमवावा लागला.






