Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 17 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND Vs AFG ODI: रोहित शर्मा कमबॅकसाठी सज्ज! भारत-अफगाणिस्तान आमनेसामने; पहा पिच रिपोर्ट अन् प्लेइंग ११

IND vs AFG First ODI In Dharmshala: भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातीन एकदिवसीय मालिकेला उद्यपासून सुरुवात होत आहे. कसा असेल धर्मशाळाच्या खेळपट्टीचा अंदाज अन् संभाव्य प्लेइंग ११ जाणून घ्या.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Jun 12, 2026 | 03:16 PM
IND vs AFG 1st T20 schedule

IND vs AFG 1st T20 schedule

Follow Us
Follow Us:
  • भारत-अफगाणिस्तान आमनेसामने
  • रोहित कमबॅकसाठी सज्ज
  • भारत-विरुद्ध अफगाणिस्तान पिच रिपोर्ट
भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेला १३ जूनपासून सुरुवात होणार आहे. पहिला सामना धर्मशाळा येथील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन (HPCA) स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. सामन्याची सुरुवात १. ३० वाजता होईल. एकमेव कसोटी मालिकेत अफगाणिस्तानवर वर्चस्व गाजवल्यानंतर आता भारतीय संघाची नजर वनडे मालिकेतील विजयी सुरुवातीवर आहे. शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ मैदानात उतरणार असून रोहित शर्मा पुन्हा एकदा भारतीय संघाच्या जर्सीमध्ये दिसणार आहे, परंतु दुखापतीमुळे विराट कोहली या मालिकेतून बाहेर पडला आहे. दुसरीकडे, अफगाणिस्तानचा संघही भारताला कडवी झुंज देण्याच्या निर्धाराने मैदानात उतरणार आहे. या सामन्यात कसा असेल खेळपट्टीचा अंदाज अन् संभाव्य प्लेइंग ११, जाणून घेऊयात.

ICC Women’s T20 World Cup 2026: आजपासून विश्वचषकाचा थरार! टीम इंडियाचे पहिले आव्हान कोणते?

विराटच्या अनुपस्थितीत युवा खेळाडूंना संधी

भारतीय संघाला या मालिकेपूर्वी मोठा धक्का बसला आहे. स्टार फलंदाज विराट कोहली दुखापतीमुळे मालिकेतून बाहेर पडला असून त्याच्या जागी युवा फलंदाज यशस्वी जैस्वालला संघात स्थान देण्यात आले आहे. त्यामुळे मधल्या फळीत काही नवीन समीकरणे पाहायला मिळू शकतात. रोहित शर्मा, शुभमन गिल आणि केएल राहुल यांच्यावर फलंदाजीची मोठी जबाबदारी असेल. प्रिन्स यादव, गुरनूर ब्रार आणि हर्ष दुबे यांची भारतीय संघात पहिल्यांदाच निवड झाली आहे.
धर्मशाळेची खेळपट्टी कशी असेल?

पिच रिपोर्ट

धर्मशाळेची खेळपट्टी वेगवान गोलंदाजांसाठी नेहमीच उपयुक्त मानली जाते. उंचावर असलेल्या या मैदानावर सुरुवातीच्या षटकांमध्ये चेंडूला चांगला बाउन्स आणि स्विंग मिळतो. त्यामुळे फलंदाजांना सुरुवातीला सावध खेळावे लागते. पण या मैदानावर मोठ्या धावा देखील झाल्या आहेत; मात्र एकदिवसीय सामन्यांमध्ये सर्वोत्तम संघही येथे २०० पेक्षा कमी धावसंख्येवर गारद झाले आहेत. मात्र एकदा खेळपट्टीवर स्थिरावल्यानंतर मोठे फटके खेळणे तुलनेने सोपे होते. त्यामुळे चाहत्यांना चुरशीच्या सामन्याची अपेक्षा आहे.

या मैदानावर खेळला गेलेला शेवटचा एकदिवसीय सामना २०२३ च्या एकदिवसीय विश्वचषकादरम्यान झाला होता. त्या सामन्यात ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडने मिळून एकूण ७७१ धावा केल्या होत्या. या मैदानावर पाठलाग करताना सर्वोच्च धावसंख्या २७४ आहे, जे भारताने २०२३ च्या विश्वचषकात न्यूझीलंडविरुद्ध केला होता.

भारताचे पारडे जड

भारतीय संघ अफगाणिस्तानपेक्षा अधिक मजबूत दिसत आहे. फलंदाजी, अष्टपैलू खेळाडू आणि गोलंदाजी या तिन्ही विभागांत भारताचे वर्चस्व आहे. मात्र राशिद खान, मोहम्मद नबी आणि रहमानुल्लाह गुरबाज यांसारख्या अनुभवी खेळाडूंमुळे अफगाणिस्तानला कमी लेखण्याची चूक भारत करू शकत नाही.

भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात धर्मशाळा येथे आजपर्यंत एकही टी-२० सामना खेळलेला नाही. एकूण आमनेसामनेच्या आकडेवारीनुसार, भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात आतापर्यंत चार टी-२० सामने झाले असून, त्यापैकी भारताने तीन वेळा विजय मिळवला आहे आणि एक सामना बरोबरीत सुटला आहे. एकदिवसीय सामन्यांमध्ये अफगाणिस्तानने भारताला कधीही पराभूत केलेले नाही.

भारताची संभाव्य प्लेइंग इलेव्हन

पहिल्या वनडेसाठी भारताची संभाव्य प्लेइंग इलेव्हन- रोहित शर्मा, शुभमन गिल, ईशान किशन, श्रेयस अय्यर, केएल राहुल, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, प्रसिद्ध कृष्णा, प्रिन्स यादव आणि अर्शदीप सिंह.

Jaspal Rana: भारतीय शूटिंगचा ‘गोल्डन बॉय’ हरपला; जसपाल राणा यांचे 49 व्या वर्षी निधन

Web Title: India vs afghanistan 1st odi dharamshala pitch report playing xi preview

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 12, 2026 | 03:14 PM

Topics:  

  • Afghanistan Cricket team
  • BCCI India
  • IND vs AFG
  • indian cricket team
  • ODI Series

संबंधित बातम्या

India vs West Indies: लवकरच सुरू होणार भारत-वेस्ट इंडिजचा धमाका, कसे असणार शेड्युल; टीममध्ये कोणाची झाली निवड
1

India vs West Indies: लवकरच सुरू होणार भारत-वेस्ट इंडिजचा धमाका, कसे असणार शेड्युल; टीममध्ये कोणाची झाली निवड

Abhishek Sharma ने केलंयं मार्केट जाम! अफगाणिस्तानविरुद्ध वादळी खेळी अन् ICC रॅंकिंग्समध्ये मोठी झेप
2

Abhishek Sharma ने केलंयं मार्केट जाम! अफगाणिस्तानविरुद्ध वादळी खेळी अन् ICC रॅंकिंग्समध्ये मोठी झेप

IND Vs AFG: नुसता अन्यायच? अफगणिस्तानविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात तरी Vaibhav ला संधी मिळणार?
3

IND Vs AFG: नुसता अन्यायच? अफगणिस्तानविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात तरी Vaibhav ला संधी मिळणार?

IND vs WI: पंत In, रोहित Out! वेस्ट इंडिजविरूद्ध ODI सिरीजसाठी ‘अशी’ टीम उतरू शकते मैदानात
4

IND vs WI: पंत In, रोहित Out! वेस्ट इंडिजविरूद्ध ODI सिरीजसाठी ‘अशी’ टीम उतरू शकते मैदानात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.