India Vs england Live Streaming (फोटो- ट्विटर)
इंग्लंडची फलंदाजी
कर्णधार हॅरी ब्रूकने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार बेन डकेट आणि जेकब बेथल यांनी इंग्लंडच्या डावाची सुरुवात केली. मात्र जेकब बेथल केवळ 14 रन्सची खेळी करून आउट झाला. तर बेन डकेटने झुंज देण्याचा प्रयत्न केला. टो 43 रन्स करून आउट झाला. त्यानंतर जबरदस्त फॉर्ममध्ये असलेले हॅरी ब्रूक आणि जो रूट खेळण्यासाठी आले.
Jasprit Bumrah comes back into the attack and immediately gets the big wicket of Harry Brook! He's caught in the slip by Rohit Sharma for 1 run. England 64/3 Live – https://t.co/Hven15ywKn #ENGvIND pic.twitter.com/Cv3qPJujuo — BCCI (@BCCI) July 14, 2026
मात्र ते देखील चांगली खेळी करू शकले नाहीत. हॅरी ब्रूक1 रन्स करून परतला. टी 20 सामन्यात शतकी खेळी करणारा जोस बटलर केवळ 5 रन्सवर आउट झाला. सॅम करन शून्यावर आउट झाला. तर विल जॅक्सने 20 रन्सची खेळी केली. लियाम डॉसनने 68 रन्सची शानदार अर्धशतकी खेळी केली. जोफ्रा आर्चर
IND Vs ENG Live: आज होणार महामुकाबला! भारताविरुद्ध इंग्लंडचा प्रथम फलंदाजीचा निर्णय
भारताची गोलंदाजी
भारतीय गोलंदाजांनी शानदार गोलंदाजी करत इंग्लंडची दाणादाण उडवली. जसप्रीत बूमराहने 3 वर्षांनी आज वनडे मध्ये गोलंदाजी केली. त्याने एक महत्वाची विकेट पटकावली. त्यानंतर गूरनूर ब्रारने इंग्लंडची वाट लावली. त्याने 2 तर प्रसिद्ध कृष्णाने 2 आणि शिवम दुबेने 1 विकेट पटकावली. त्यामुळे इंग्लंडचा संघ 150 रन्सच्या आतच 6 विकेट्स गमावून बसला होता. अक्षर पटेलने मत्वाच्या 3 विकेट्स पटकावल्या.
भारतीय संघ: रोहित शर्मा, विराट कोहली, शुभमन गिल, श्रेयस अय्यर, केएल राहुल, अक्षर पटेल, शिवम दुबे, वाशिंग्टन सुंदर / कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, प्रसिद्ध कृष्णा, अर्शदीप सिंह / मोहम्मद सिराज.
IND Vs ENG Live: मोठा गेम होणार! समोर आली दोन्ही संघांची Playing 11; रोहित अन् विराट थेट….
इंग्लंडचा संघ: फिल सॉल्ट, विल जॅक्स, जो रूट, हॅरी ब्रूक (कर्णधार), जोस बटलर (यष्टिरक्षक), बेन डकेट, सॅम करन, लियाम डॉसन / रेहान अहमद, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद, साकिब महमूद / गस ॲटकिन्सन.






