
IND vs WI 5th T20 Bengaluru Weather report
अॅक्युवेदरच्या हवामान अहवालानुसार, बंगळूरुमध्ये सामन्यादरम्यान मुसळधार पाऊस आणि मेघगर्जनेसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. सायंकाळी ५ वाजता पावसाची शक्यता ६६% आहे. तर नाणेफेकीच्या वेळी ६८% आहे. सामना सुरू होताच पाऊस खोळंबा घालण्याची शक्यता आहे. याशिवाय, रात्री ८ ते ९ च्या दरम्यान पावसाची सर्वाधिक शक्यता सुमारे ७०% असेल. तर, सातत्याने ६६% ते ७०% पावसाचा इशारा असल्यामुळे, नाणेफेकीला विलंब होण्याचा, षटके कमी होण्याचा किंवा सामना पूर्णपणे रद्द होण्याचा मोठा धोका आहे. मात्र, चांगली बातमी अशी आहे की बंगळूरुच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियममध्ये जगातील सर्वोत्तम सब-एअर ड्रेनेज सिस्टीमपैकी एक आहे, ज्यामुळे पाऊस थांबल्यानंतर केवळ १५ ते २० मिनिटांत मैदान पुन्हा खेळासाठी तयार होते.
भारतीय आणि वेस्ट इंडिज संघ बंगळूरु येथील एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर प्रथमच टी-२० सामना खेळणार आहेत. भारताने आतापर्यंत या मैदानावर एकूण आठ टी-२० सामने खेळले असून, त्यापैकी चार जिंकले आहेत आणि तीन गमावले आहेत. तसेच, एक सामना अनिर्णित राहिला आहे. दुसरीकडे, वेस्ट इंडिजने या मैदानावर फक्त एकच टी-२० सामना खेळला असून, तो सामना त्यांच्या संघाने जिंकला आहे. आता, हा सामना कोणाता खिशात जाणार हे पाहणए महत्वाचे ठरेल.
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात सुरू असलेल्या टी-२० मालिकेतील पहिला सामना लखनौ येथील एकाना क्रिकेट स्टेडियमवर खेळला गेला. भारतीय संघाने तो सामना ८ विकेट्सने जिंकला आणि मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. यानंतर, दुसरा टी-२० सामना रांची येथे खेळला गेला, जिथे वेस्ट इंडिज संघाने २५० धावांचा पाठलाग करून मालिका बरोबरीत आणली. तिसरा सामना इंदौर येथील होळकर स्टेडियमवर खेळला गेला. भारतीय संघाने हा सामनाही १४ धावांनी जिंकला. हैदराबाद येथे खेळल्या गेलेल्या चौथ्या टी-२० सामन्यात, वेस्ट इंडिजने भारताला २४ धावांनी पराभूत करून मालिका २-२ अशी बरोबरीत आणली.