फोटो सौजन्य : X
भारत विरुद्ध न्युझीलंड : भारताच्या संघाने मागील 2 वर्षात दमदार कामगिरी केली आहे, टीम इंडियाने टी20 विश्वचषक 2024 मध्ये जिंकला होता तर 2025 मध्ये झालेल्या चॅम्पियन ट्राॅफीचे जेतेपद देखील जिंकले. भारताच्या संघाला 2023 मध्ये घरच्या मैदानावर एकदिवसीय विश्वचषकमध्ये पराभवाचा सामना करावा लागला होता. आता 2027 मध्ये होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकाच्या तयारीला सर्व संघ लागणार आहेत. त्यासाठी आता भारतीय क्रिकेट संदर्भात एक अपडेट समोर आली आहे.
टीम इंडिया २०२६ वर्षाची सुरुवात धमाल खेळाने करणार आहे. भारतीय संघ न्यूझीलंडचे त्यांच्याच घरात यजमानपद भूषवणार आहे अशी माहिती समोर आली आहे. विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी कसोटी आणि टी-20 क्रिकेटमधून निवृतीची घोषणा केली आहे. या मालिकेत विराट कोहली आणि रोहित शर्मा देखील खेळताना दिसतील. वृत्तानुसार, या मालिकेत एकूण तीन एकदिवसीय सामने आणि पाच टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले जातील.
तथापि, बीसीसीआयने अद्याप या मालिकेची अधिकृत घोषणा केलेली नाही. न्यूझीलंडने शेवटचा २०२४ मध्ये भारताचा दौरा केला होता, जिथे किवी संघाने शानदार कामगिरी केली आणि पहिल्यांदाच कसोटी मालिकेत टीम इंडियाचा ३-० असा पराभव केला. २०२६ च्या सुरुवातीला न्यूझीलंड भारत दौऱ्यावर येणार आहे. टाईम्स ऑफ इंडियाच्या बातमीनुसार, जानेवारीमध्ये किवी संघ टीम इंडियाशी तीन एकदिवसीय आणि पाच टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सामना करेल. ही मालिका ११ जानेवारीपासून सुरू होईल आणि शेवटचा सामना ३० जानेवारी रोजी खेळला जाईल असे मानले जाते.
न्यूझीलंडने भारताच्या शेवटच्या दौऱ्यात शानदार कामगिरी केली आणि कसोटी मालिकेत टीम इंडियाला ३-० ने हरवले. विराट कोहली आणि रोहित शर्मा देखील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत खेळताना दिसतील. कोहली-रोहितने टी-२० आणि कसोटीतून निवृत्ती जाहीर केली आहे आणि आता ते फक्त एकदिवसीय स्वरूपात खेळताना दिसतील.