(फोटो सौजन्य: Instagram)
भारतीय क्रिकेटपटू रोहित शर्माचे देशात लाखो फॅन्स आहेत. त्याचे अनेक व्हिडिओज सोशल मिडियावर नेहमीच शेअर केले जातात. रोहित आपल्या खेळासाठीच नाही तर त्याच्या मनमोकळ्या स्वभावासाठीही ओळखला जातो. आपल्या आक्रमक फलंदाजीसाठी ओळखला जाणारा हिटमॅन व्हिडिओत मात्र काही वेगळंच करताना दिसून आला. अलीकडेच रोहित शर्माचा अनोखा व्हिडिओ व्हायरल झाला ज्यात तो आपल्या वर्कआऊट सेशनदरम्यान दुसऱ्या व्यक्तीच्या लग्नाचा आनंद लुटताना दिसून आला. त्याच्या या कृतीने सर्वांचीच मने जिंकली आणि हा व्हिडिओ काही वेळातच सोशल मिडियावर व्हायरल झाला. चला व्हिडिओविषयी सविस्तर जाणून घेऊया.
काय दिसलं व्हिडिओत?
सध्या लग्नाचा सीजन सुरु असून मुंबईतही अशाच एका जोडप्याचं लग्न सुरु होतं. जाेडप्याच फोटोशूट जिथे सुरु होत त्याच ठिकाणी हिटमॅन देखील एका इमारतीत आपलं वर्कआऊट करत होता. रोहितने खिडकीतून जोडप्याला खाली फोटोशूट करताना पाहिलं ज्यानंतर त्याने त्यांना सरप्राईज देण्याचा निर्णय घेतला. त्याने ‘आज मेरे यार की शादी है’ गाण वाजवत, स्पीकर हातात घेऊन मनसोक्त डान्स केला. त्याच्या या डान्सने सर्वांनाच हसवलं तर जोडप्याचा खास दिवस आणखीनच अविस्मरणीय बनवला. रोहितच्या शर्माच्या या व्हिडिओने त्याच्या फॅन्सना फारच खुश केलं, त्याच्या या कृतीवर सर्वच भाळले आणि लोकांनी त्याच्या कृतीचे काैतुकही केले. मैदानावर असो वा मैदानाबाहेर, “हिटमॅन” नेहमीच मन जिंकण्यात यशस्वी होतो हे यातून पुन्हा स्पष्ट झाले.
दरम्यान रोहित शर्माचा हा व्हिडिओ @rvcjinsta नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत करोडो व्युज मिळाल्या असून लाखो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “भाऊ खूप भाग्यवान आहे” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “रोहित भाऊ नेहमीच चिल मोडमध्ये असतो” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “वर्कआऊट नाही हा तर झाला डान्स सेशन”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






