वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२५(फोटो-सोशल मीडिया)
WTC Final 2025 : दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात लंडनमधील लॉर्ड्सच्या मैदानावर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२५ चा अंतिम सामना खेळवला जात आहे. ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव स्टिव स्मिथ आणि ब्यू वेबस्टर यांच्या अर्धशतकांच्या जोरावर २१२ पर्यंत पोहचू शकला. साऊथ आफ्रिकेचा वेगवान रबाडाने फेणाल सामन्यात ५ विकेट्स घेऊन ऑस्ट्रेलियाचे कंबरडे मोडले. सामन्यापूर्वी दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेंम्बा बवुमाने नाणेफेक जिंकुन गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. तर ऑस्ट्रेलिया संघ प्रथम फलंदाजी करत असून ऑस्ट्रेलियाची सुरवात चांगली झाली नाही. साऊथ आफ्रिकेचा वेगवान रबाडाने ऑस्ट्रेलियाला सुरवातीला दोन धक्के दिले. उस्मान ख्वाजा आणि कॅमेरॉन ग्रीन या दोघांना त्याने १६ धावांवर माघारी धाडले.
ऑस्ट्रेलियाची सुरवात चांगली झाली नाही. कागिसो रबाडा आणि मार्को जानसेन यांनी दक्षिण आफ्रिकेला सुरवातीला मोठे यश मिळवून दिले. कगीसो रबाडाने प्रथम उस्मान ख्वाजाला बाद केले. ख्वाजा भोपळाही न फोडता आऊट झाला.त्याने २० चेंडूचा सामना केला. त्यात त्याला एक ही धाव काढता आली नाही. तर त्याच षटकात रबडाने कॅमेरॉन ग्रीनला ४ धावांवर असताना बाहेरचा रस्ता दाखवला. त्यांनंतर मार्नस लाबुशेन(५६ चेंडू १७ धावा) आणि ट्रॅव्हिस हेड(१३ चेंडू ११ धावा) या जोडीला मार्को जानसेने आऊट केले. स्टीव्ह स्मिथने एका बाजूने लढत ११२ चेंडूचा सामना करत ६६ धावा केल्या. त्याला एडेन मार्करामने माघारी बाद केले. त्यांनंतर ब्यू वेबस्टरने डाव सावरत ९२ चेंडूत ७१ धावा केल्या. परंतु, त्याला रबाडाने बाहेरचा रस्ता दाखवला.
हेही वाचा : WTC Final 2025 : स्टीव्ह स्मिथ एक्सप्रेस सुसाट! लॉर्ड्सवर ४० धावा काढताच डॉन ब्रॅडमनचा विक्रम खलसा..
स्मिथ बाद झाल्यावर मैदानात आलेला अॅलेक्स कॅरीने थोडी झुंज देण्याचा प्रयत्न केला परंतु केशव महाराजने त्याला आपली शिकार बनवले. तो ३१ चेंडूत २३ धावा करून बाद झाला. त्यांनंतर पॅट कमिन्स(१ धाव), मिशेल स्टार्क(१ धाव), तर नॅथन लायन शून्य धावा कडून बाद झाला तर आणि जोश हेझलवुड शून्यावर नाबाद राहिला.
साऊथ आफ्रिकेकच्या गोलंदाजांनी आपले वर्चस्व राखत ऑस्ट्रेलियाला २१२ धावांवर रोखले. साऊथ आफ्रिकेकडून कगिसो रबाडाने सर्वाधिक ५ विकेट्स घतेल्या. त्याने १५ ओव्हरमध्ये ५१ देत ५ विकेट्स घेतल्या. तसेच मार्को जानसेने १४ ओव्हरमध्ये ४९ धावा देत महत्वाचे ३ बळी घेतले. केशव महाराज आणि एडेन मार्कराम यांनी प्रत्येकी १ विकेट्स घतेली. तर वियान मुल्डर आणि लुंगी एनगिडी यांना मात्र विकेट्स घेण्यात अपयश आले.
हेही वाचा : ऐकावे ते नवलच! 500 पेक्षा अधिक महिलांसोबत शरीरसंबंध, वेस्ट इंडिजच्या ‘या’ गोलंदाजाचा आत्मचरित्रात खुलासा..
टेम्बा बावुमा (कर्णधार), एडेन मार्कराम, रायन रिकेल्टन, वियान मुल्डर, ट्रिस्टन स्टब्स, डेव्हिड बेडिंगहॅम, काइल व्हेरेन, मार्को जानसेन, केशव महाराज, कागिसो रबाडा, लुंगी एनगिडी.
उस्मान ख्वाजा, मार्नस लाबुशेन, कॅमेरॉन ग्रीन, स्टीव्ह स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, ब्यू वेबस्टर, अॅलेक्स कॅरी (यष्टीरक्षक), पॅट कमिन्स (कर्णधार), मिशेल स्टार्क, नॅथन लायन, जोश हेझलवुड.