फोटो सौजन्य - BCCI
भारत विरुद्ध झिम्बाब्वे : भारत विरुद्ध झिम्बाब्वे (India vs Zimbabwe) यांच्यात आज सामना रंगणार आहे. यासाठी भारताचा संघ काही दिवसांपूर्वी झिम्बाब्वेसाठी रवाना झाला होता. भारताचा संघ या संघाविरुद्ध पाच सामान्यांची मालिका खेळणार आहे. यामध्ये भारताच्या सर्व युवा खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. त्याचबरोबर या मालिकेसाठी भारताच्या कर्णधारपदाची कमान शुभमन गिलकडे देण्यात आली आहे. त्याचबरोबर भारताचे तात्पुरते कोच म्हणून व्हीव्हीएस लक्ष्मण यांची निवड करण्यात आली आहे. त्याचबरोबर काही युवा खेळाडूंचे भारतीय संघामध्ये पदार्पण होणार आहे. आयपीएलच्या अनेक स्टार खेळाडूंना या संघात स्थान देण्यात आले आहे.
भारत विरुद्ध झिम्बाब्वे यांच्यामधील T-२० आंतरराष्ट्रीय सामना कधी आणि कुठे खेळवला जाणार आहे? तसेच, चाहते सामन्याचे थेट प्रक्षेपण आणि थेट प्रवाह कसे पाहू शकतात याची सविस्तर माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत.
भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील पहिला T-२० आंतरराष्ट्रीय सामना शनिवार, ६ जुलै रोजी होणार आहे. या सामान्यचे आयोजन हरारे स्पोर्ट्स क्लब येथे खेळवला जाणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी ४.३० वाजता सुरू होईल. याआधी सामन्याचे नाणेफेक ४ वाजता होणार आहे.
भारत विरुद्ध झिम्बाब्वे T-२० मालिकेचे थेट प्रक्षेपण सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहता येणार आहे. सोनी स्पोर्ट्स टेन ३ (हिंदी), सोनी स्पोर्ट्स टेन ४ (तमिळ, तेलुगु) आणि सोनी स्पोर्ट्स टेन ५ (इंग्रजी) वर या सामन्याचे थेट प्रक्षेपण पाहता येणार आहे. सोनी लिव्ह वनवर सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग उपलब्ध असणार आहे.
शुभमन गिल (कर्णधार), रुतुराज गायकवाड, अभिषेक शर्मा, रिंकू सिंग, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रियान पराग, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, आवेश खान, खलील अहमद, मुकेश कुमार, तुषार देशपांडे, साई सुदर्शन, जितेश शर्मा (विकेटकीपर), हर्षित राणा