Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ICC ODI Ranking : आधी चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेतेपद, आता ICC रँकिंगमध्येही डंका; पहिल्या पाचमध्ये ‘या’ भारतीय खेळाडूंचा समावेश..

आयसीसीने जाहीर केलेल्या एकदिवसीय क्रमवारी देखील भारतीय खेळाडूंचा डंका बघायला मिळत आहे. या क्रमवारीत पहिल्या पाचमध्ये भारतीय खेळाडूंचा समावेश आहे. शुभमन गिल एकदिवसीय फलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल स्थानावर पोहचला आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Mar 12, 2025 | 03:05 PM
ICC ODI Ranking: First the Champions Trophy winner, now the ICC rankings are also in the spotlight; 'These' Indian players are included in the top five..

ICC ODI Ranking: First the Champions Trophy winner, now the ICC rankings are also in the spotlight; 'These' Indian players are included in the top five..

Follow Us
Close
Follow Us:

ICC ODI Ranking : भारताने 12 वर्षांनंतर चॅम्पियन ट्रॉफीचे जेतेपद आपल्या नावे केले आहे. न्यूझीलंडचा पराभव करत भारताने विजेतेपदावर आपले नाव कोरले. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताने संपूर्ण स्पर्धेत चांगली कामगिरी केली. संपूर्ण स्पर्धेत भारत अजिंक्य राहिला आहे.  अशातच आता आयसीसीने जाहीर केलेल्या एकदिवसीय क्रमवारी देखील भारतीय खेळाडूंचा डंका बघायला मिळत आहे.  भारतीय कर्णधार रोहित शर्माने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात ७६ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली आणि टीम इंडियाला विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. या सर्व गोष्टीचा त्याला आयसीसी वनडे क्रमवारीत फायदा झाला आहे.

चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये केलेली दमदार कामगिरीनंतर स्टार सलामीवीर शुभमन गिल एकदिवसीय फलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल स्थानावर पोहचला आहे. तर भारतीय कर्णधार रोहित शर्मा देखील तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. तसेच स्टार फलंदाज विराट कोहली स्पर्धेत 218 धावा केल्या आहेत. त्या जोरावार  किंग कोहलीही आयसीसी एकदिवसीय क्रमवारीमध्ये पहिल्या पाचमध्ये पोहोचला आहे. कोहली एकदिवसीय क्रमवारीत पाचव्या क्रमांकावर पोहचला आहे.

हेही वाचा : Shahid Afridi: ‘पाकिस्तान क्रिकेट ‘ICU’त…’ ; शाहिद आफ्रिदीने आपल्याच क्रिकेट बोर्डाला दिला घरचा आहेर..

या व्यतिरिक्त न्यूझीलंडचा डॅरिल मिशेल सहाव्या स्थानावर पोहचला आहे. रचिन रवींद्र 14 स्थानांचा फायदा होऊन त्याने  14 वे स्थान पटकावले आहे. तसेच ग्लेन फिलिप्स सहा स्थानांनी वर येत 24व्या स्थानावर पोहचला आहे.

Champions Trophy finalists receive big boost in the latest ICC Men’s Player Rankings 👊

Read more ⬇️https://t.co/YM26ak85wm

— ICC (@ICC) March 12, 2025

न्यूझीलंड संघाचा कर्णधार मिचेल सँटनरला गोलंदाजीच्या वनडे क्रमवारीत चांगलाच फायदा झाला असून तो आता वनडे क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. सँटनरने चॅम्पियन्स ट्रॉफी दरम्यान 9 विकेट्स आणि अंतिम सामन्यात दोन विकेट घेतल्या, ज्यामुळे हा डावखुरा फिरकीपटू एकदिवसीय गोलंदाजांच्या यादीत सहा स्थानांची झेप घेत  दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. दुसरीकडे, श्रीलंकेचा फिरकी गोलंदाज महेश थेक्षाना क्रमवारीत अव्वल स्थानावर आहे.

हेही वाचा : Champions Trophy : ‘मला अपेक्षित ओळख मिळाली नाही…’ ; चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यानंतर ‘या’ स्टार भारतीय खेळाडूने व्यक्त केली खंत…

गोलंदाजी क्रमवारीत भारताचा फिरकीपटू कुलदीप यादव तिसऱ्या क्रमांकावर आहे, तर दक्षिण आफ्रिकेचा फिरकी गोलंदाज केशव महाराजने  चौथ्या क्रमांक पटकावला आहे. तसेच नामिबियाचा बर्नार्ड शॉल्ट्ज वनडे गोलंदाजी क्रमवारीत पाचव्या स्थानावर आहे.

भारताची विजेतेपदाला गवसणी..

भारतीय संघाने  न्यूझीलंडचा 4 विकेटने पराभव करून 12 वर्षांतर आयसीसी चॅम्पियन ट्रॉफी 2025 चे विजेतेपद आपल्या नावावर केले आहे. भारताने 9 महिन्यांत सलग दुसऱ्यांदा ICC ट्रॉफी जिंकली आहे. भारतीय संघाने न्यूझीलंडविरुद्धचा अंतिम सामना जिंकून ट्रॉफी आपल्या नावे केली. या संपूर्ण स्पर्धेत भारत अजिंक्य राहीला असून  त्याने या स्पर्धेत एकही सामना गमावला नाही. शेवटच्या सामन्यात भारताने सर्वोच्च कामगिरी करत विजयी ट्रॉफी उंचावली आहे. तर न्यूझीलंडला उपविजेतपदावर समाधान मानावे लागले.

Web Title: Indian players are among the top five in the odi rankings released by the icc

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 12, 2025 | 03:02 PM

Topics:  

  • bcci
  • Champions Trophy 2025
  • ICC
  • ICC ODI Ranking
  • Rohit Sharma
  • Shubhman Gill
  • virat kohali

संबंधित बातम्या

IND VS PAK : Asia Cup २०२५ पूर्वी देशात गोंधळ! भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? सोशल मीडियावर चाहते आक्रमक
1

IND VS PAK : Asia Cup २०२५ पूर्वी देशात गोंधळ! भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? सोशल मीडियावर चाहते आक्रमक

Asia cup 2025 : भारतीय संघ नव्या ‘शुभ’ मनाच्या दिशेने; मिस्टर 360 चे कर्णधारपद तात्पुरते? बीसीसीआयकडून इशारा
2

Asia cup 2025 : भारतीय संघ नव्या ‘शुभ’ मनाच्या दिशेने; मिस्टर 360 चे कर्णधारपद तात्पुरते? बीसीसीआयकडून इशारा

Asia cup 2025 : निवडकर्त्यांवर वाढतोय रोष! ‘हिटमॅन’  शर्माच्या मित्राची श्रेयस अय्यरच्या बाजूने मैदानात उडी.. 
3

Asia cup 2025 : निवडकर्त्यांवर वाढतोय रोष! ‘हिटमॅन’  शर्माच्या मित्राची श्रेयस अय्यरच्या बाजूने मैदानात उडी.. 

Asia Cup 2025 : भारताकडे सलामीसाठी ‘हे’ तीन पर्याय! आशिया कपमध्ये टीम इंडियाचा प्लेइंग-११ कसा असेल? जाणून घ्या
4

Asia Cup 2025 : भारताकडे सलामीसाठी ‘हे’ तीन पर्याय! आशिया कपमध्ये टीम इंडियाचा प्लेइंग-११ कसा असेल? जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.