पंतप्रधान नरेंद्र मोदी वाढदिवस (फोटो- ट्विटर)
भारतीय ऑलिंपिक संघटनेच्या अध्यक्षा आणि भारताच्या माजी दिग्गज ॲथलीट पी. टी. उषा यांनी ‘X’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पंतप्रधान मोदींसोबतचा एक खास फोटो शेअर करत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. पी. टी. उषा यांनी आपल्या संदेशात म्हटले की, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ७६व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. ईश्वर त्यांना उत्तम आरोग्य, उदंड आयुष्य आणि देशाला शांतता, समृद्धी तसेच प्रगतीच्या पथावर पुढे नेण्यासाठी अफाट शक्ती देवो, हीच प्रार्थना.”
Warmest birthday greetings to Hon’ble Prime Minister Shri. @narendramodi ji! Praying for your good health and continued strength to guide our nation towards greater peace, prosperity, and progress. https://t.co/8oJ45bb2qD — P.T. USHA (@PTUshaOfficial) September 17, 2026
माजी भारतीय क्रिकेटपटू आणि सध्याच्या राष्ट्रीय संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी ‘एक्स’वरुण मोदी यांना शुभेच्छा दिल्या आहेत. “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! ईश्वर तुम्हाला उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य प्रदान करो. तुम्ही भारताला एका अत्यंत उज्ज्वल, सशक्त आणि समृद्ध भविष्याकडे असेच मार्गदर्शक म्हणून पुढे घेऊन जावे, हीच प्रार्थना,” असे गंभीर म्हणाला आहे.
भारतीय क्रिकेटचा महान माजी फलंदाज आणि ‘भारतरत्न’ सचिन तेंडुलकरनेही सोशल मीडियाच्या माध्यमातून पंतप्रधान मोदींना वाढदिवसाच्या अत्यंत खास शैलीत शुभेच्छा दिल्या आहेत. सचिन तेंडुलकरने आपल्या अधिकृत एक्स हँडलवरून पंतप्रधान नरेंद्र मोदींना शुभेच्छा देणारा संदेश शेअर केला. देशसेवेप्रती पंतप्रधानांची निष्ठा आणि मेहनत कौतुकास्पद असल्याचे सचिनने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
Wishing a very Happy Birthday to Hon’ble Prime Minister Shri @narendramodi ji. Your tireless dedication to the nation continues to inspire us all. Praying for your long life, good health, and happiness as you guide India to new heights. 🙏🏼 — Sachin Tendulkar (@sachin_rt) September 17, 2026
वैभव सूर्यवंशीकडून पंतप्रधान मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा
वैभवने आपल्या पोस्टमध्ये लिहिले, “माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी जी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! मी आपल्या उत्तम आरोग्याची, सदैव आनंदाची आणि देश व जनसेवेसाठी समर्पित अशा अनेक यशस्वी वर्षांची प्रार्थना करतो.”
Wishing a very Happy Birthday to Hon’ble Prime Minister Shri @narendramodi ji. Your tireless dedication to the nation continues to inspire us all. Praying for your long life, good health, and happiness as you guide India to new heights. 🙏🏼 — Sachin Tendulkar (@sachin_rt) September 17, 2026
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात ‘खेलो इंडिया’सारख्या उपक्रमांमुळे देशातील अनेक लहान आणि ग्रामीण भागातील तरुण खेळाडूंना मोठी व्यासपीठे उपलब्ध झाली आहेत. सचिन तेंडुलकर, गौतम गंभीर आणि पी. टी. उषा आणि अन्य खेळाडू यांनी पंतप्रधान मोदी यांना शुभेच्छा दिल्या आहेत.






