Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 2 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Smriti Mandhana Birthday: भारताची शान, कोट्यावधी मुलींची प्रेरणा; स्मृतीच्या जिद्दीचा प्रवास तुम्हाला माहीत आहे का?

स्मृती मंधानाचा जन्म 18 जुलै 1996 मध्ये मुंबईत झाला. तिचे कुटुंब आधीपासूनच क्रिकेट क्षेत्राशी जोडलेले होते. तिचे वडील आणि भू दोघेही क्रिकेट खेळत असत. त्यामुळे लहानपणापासून स्मृतीला देखील क्रिकेट खेळण्याची आवड निर्माण झाली.

  • By तेजस भागवत
Updated On: Jul 18, 2026 | 05:24 PM
Smriti Mandhana Birthday: भारताची शान, कोट्यावधी मुलींची प्रेरणा; स्मृतीच्या जिद्दीचा प्रवास तुम्हाला माहीत आहे का?

Smriti Mandhana Birthday: भारताची शान, कोट्यावधी मुलींची प्रेरणा; स्मृतीच्या जिद्दीचा प्रवास तुम्हाला माहीत आहे का?

Follow Us
Follow Us:
  • स्मृती मंधानाचा आज 30 वा वाढदिवस 
  • स्मृती भारतीय महिला संघाची उपकर्णधार 
  • क्रिकेटच्या करियरमध्ये नावावर आहेत अनेक विक्रम 
Smriti Mandhana 30th Birthday: भारतीय महिला क्रिकेट संघ सध्या एका नव्या उंचीवर जाऊन पोचला आहे. 2025 मध्ये आयसीसी महिला वर्ल्डकप भारताने जिंकला. भारतीय संघात अनेक प्रतिभावान खेळाडू आहेत. आज अशाच एका लोकप्रिय आणि शानदार कामगिरीमुळे कायम पुढे असणाऱ्या एका खेळाडूचा वाढदिवस आहे. स्मृती मंधानाचा आज 30 वा वाढदिवस. आज तिच्या क्रिकेटच्या करियरबद्दल आणि जीवनाबद्दल जाणून घेऊयात.

आज भारतीय संघाची स्टार सलामीवीर आणि उपकर्णधार स्मृती मंधानाचा वाढदिवस आहे. जगभरातून तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या जात आहेत. भारतीय क्रीडा क्षेत्रात गेल्या काही वर्षांत एक मोठा आणि सकारात्मक बदल पाहायला मिळत आहे. एकेकाळी फारशी चर्चा नसलेल्या ‘भारतीय महिला क्रिकेट’ची लोकप्रियता आता गगनभरारी घेत आहे. भारतीय महिला क्रिकेटचे हे रुपडे बदलण्यामागे ज्या काही मोजक्या खेळाडूंचे मोलाचे योगदान मानले जाते, त्यात स्मृतीचा देखील समावेश आहे.

स्मृती मंधानाचा जन्म 18 जुलै 1996 मध्ये मुंबईत झाला. तिचे कुटुंब आधीपासूनच क्रिकेट क्षेत्राशी जोडलेले होते. तिचे वडील आणि भू दोघेही क्रिकेट खेळत असत. त्यामुळे लहानपणापासून स्मृतीला देखील क्रिकेट खेळण्याची आवड निर्माण झाली. डाव्या बाजूने फलंदाजी करणे तिला आवडत असे. नवव्या वर्षीच तिने महाराष्ट्राच्या अंडर 15 संघात प्रवेश मिळवला होता. 11 व्या वर्षी ती अंडर 19 संघाची खेळाडू बनली.

Smriti Mandhana-Shafali Verma जोडीने रचला इतिहास! महिला टी-२० क्रिकेटमध्ये केला जगातील सर्वात मोठा पराक्रम

त्यानंतर स्मृतीने अजिबात मागे वळून देखील पहिले नाही. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये तिने आज स्वतःला सिद्ध केले आहे. 5 एप्रिल 2013 मध्ये तिने इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये पदार्पण केले. तेव्हापासून आजपर्यंत तिने केलेली मेहनत आज सर्वांना दिसून येत आहे. टीम इंडियाची सर्वात स्टार खेळाडू आणि मॅचविनर खेळाडू म्हणून ती आज ओळखली जात आहे.

गेल्या काही वर्षांमध्ये भारतीय महिला क्रिकेट संघाने अनेक मोठे रेकॉर्ड रचले आहेत. ज्यामध्ये स्मृतीचा देखील मोठा वाटा राहिला आहे. सलामीवीर म्हणून तिने अनेक महत्वाच्या खेळी केल्या आहेत. क्षेत्ररक्षण असो वा फलंदाजी असो स्मृती कायमच आघाडीवर राहिली आहे. स्मृती केवळ भारताचीच नव्हे तर जागतिक क्रिकेटमध्ये एक अव्वल फलंदाज म्हणउण ओळखली जाऊ लागली आहे. अशा या लोकप्रिय, प्रतिभावान, दिग्गज क्रिकेटपटू स्मृती मंधानाला ‘नवराष्ट्र’कडून देखील वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

लॉर्ड्सवर Smriti Mandhana चा जागतिक रेकॉर्ड! पेरी अन् सुने ल्युसला पछाडत रचला ‘हा’ अभूतपूर्व इतिहास

जेमिमा रॉड्रिग्जने दिल्या स्मृतीला शुभेच्छा

स्मृतीच्या वाढदिवसाबद्दल जेमिमा रॉड्रिग्जने एक खास पोस्ट शेयर केली आहे. सोशल मिडियावर पोस्ट करत तिने स्मृतीला शुभेच्छा दिल्या आहेत. माझ्या वाईट काळात माझ्यावर प्रेम करणारी तसेच माझ्या यशामध्ये सर्वात आनंदी होणारी. तू माझ्या आयुष्यात आहेत याबाबत मी अत्यंत खुश आणि आनंदी आहे. आपल्या मनात एकमेकांबद्दल असलेले प्रेम, काळजी कायम अशीच राहील. म्हणूनच (म्हातारी झालेल्या मोठ्या बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा) मी तुझ्यावर मनापासून प्रेम करते.

Web Title: Indian women cricket batter and vice captain smriti mandhana 30th birthday special

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 18, 2026 | 05:24 PM

Topics:  

  • cricket news
  • Indian Women Cricket Team
  • Smriti Maandhana
  • Smriti Mandhana

संबंधित बातम्या

Zimbabwe vs Namibia T20I: रेकॉर्डवर रेकॉर्ड! एकच विश्वविक्रम दोनदा मोडला, सातव्या जोडीचा तुफान कहर
1

Zimbabwe vs Namibia T20I: रेकॉर्डवर रेकॉर्ड! एकच विश्वविक्रम दोनदा मोडला, सातव्या जोडीचा तुफान कहर

Duleep Trophy: अबब किती ते विचित्र! Mukesh Kumar ने एकाच सामन्यात टाकले तब्बल 14 नो बॉल; मात्र 7 विकेट्स…
2

Duleep Trophy: अबब किती ते विचित्र! Mukesh Kumar ने एकाच सामन्यात टाकले तब्बल 14 नो बॉल; मात्र 7 विकेट्स…

DSP Trophy Cricket: ‘डीएसपी करंडक’ स्पर्धेत रंगला थरार! पुणे क्रिकेट क्लब अन् सार्क अकादमीची आगेकूच
3

DSP Trophy Cricket: ‘डीएसपी करंडक’ स्पर्धेत रंगला थरार! पुणे क्रिकेट क्लब अन् सार्क अकादमीची आगेकूच

Jalgaon News: अभिमानाचा क्षण! महाराष्ट्राच्या दियानाची वर्ल्ड कपसाठी निवड; साऊथ आफ्रिकेत चमकणार
4

Jalgaon News: अभिमानाचा क्षण! महाराष्ट्राच्या दियानाची वर्ल्ड कपसाठी निवड; साऊथ आफ्रिकेत चमकणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.