फोटो सौजन्य - indiancricketteam इंस्टाग्राम
Asia Cup 2024: श्रीलंका येथे सुरु असलेल्या आशिया चषकात आज भारतीय महिला संघाची लढत नेपाळविरुध्द होणार आहे. हा सामना सायंकाळी ७ वाजता रंगिरी डंबुला इटरनेशनल स्टेडिअमवर खेळला जाणार आहे. हा गटसाखळीतील अंतिम सामना असून दोन पैकी दोन सामने जिंकलेला भारतीय महिला संघाचा इरादा हा सामना जिंकत अजेय राहून सेमीफायनल खेळण्याचा असेल.
भारतीय संघाने आशिया कपमध्ये आतापर्यंत जबरदस्त कामगिरी केली आहे. पहिल्या सामन्यात पाकिस्तावर 7 विकेटने विजय मिळविला. दुसऱ्या सामन्यात युएईचा 78 धावांनी पराभव केला. नेपाळ संघाने ही दोन सामने खेळले असून एका सामन्यात विजय मिळविला असून आणि एका सामन्यात पराभव झाला आहे . नेपाळने युएईला 6 विकेट्सने हरविले होते तर पाकिस्तान कडून त्याचा 9 विकेट्सनी पराभव झाला होता.
भारतीय संघ अव्वल
भारतीय महिला संघ हा आशिया कपच्या अ गटात असून २ पैकी २ विजयासह या गटात अव्वल स्थानावर आहे. टीम इंडियाचा ४ गुणांसहित + 3.298 चा नेट रनरेट आहे. पाकिस्तानचा संघ दुसऱ्या क्रमांकावर आहे तर नेपाळ संघ तिसऱ्या स्थानावर आणि युएईचा संघ चौथ्या स्थानावर आहे. ब गटात यजमान श्रीलंका पहिल्या स्थानावर आहे तर थायलंड दुसऱ्या स्थावर आहे.
भारतीय संघाच्या दोन विजयामुळे उपांत्य फेरीतील प्रवेश निश्चित असला तरी या सामन्यामध्ये विजय मिळवत अजेय राहण्याचा मानस असणार आहे. त्यामुळे कर्णधार हरमनप्रीतच्या विजयी संघात बदल होण्याची शक्यता कमी आहे.
भारताचा संभाव्य संघ
हरमनप्रीत कौर (कर्णधार), ऋचा घोष (विकेटकीपर), स्मृति मंधाना, जेमिमा रोड्रिग्स, डी हेमलता, शेफाली वर्मा, दीप्ति शर्मा, पूजा वस्त्राकर, रेणुका सिंह, राधा यादव, तनुजा कंवर
नेपाळचा संभाव्य संघ
इंदु बर्मा (कप्तान), काजल श्रेष्ठ (विकेटकीपर), बिंदू रावल, समझ खड़का, रोमा थापा, पूजा महतो, रूबीना छेत्री, कबिता जोशी, सीता राणा मगर, कृतिका मरासिनी, कबिता कुंवर