Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 22 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

MI vs RCB: दोन्ही भावांच्या नात्यात बिघाड? हार्दिकच्या विकेटवर कृणालचे वेगळेच सेलिब्रेशन, मैदानावर भलताच ड्रामा!

कृणाल पांड्याने हार्दिक पांड्याची विकेट मिळाल्याचा जल्लोष आक्रमकपणे केला, ज्यामुळे चाहत्यांना धक्का बसला आहे. तसंच वर्ल्ड कपपासून कृणालने हार्दिकबाबत एकही पोस्ट केलेली नाही. नक्की घडलंय काय?

  • By दिपाली नाफडे
Updated On: Apr 13, 2026 | 11:06 AM
हार्दिक पंड्या - कृणाल पांड्यामध्ये क्लॅश? (फोटो सौजन्य - X.com)

हार्दिक पंड्या - कृणाल पांड्यामध्ये क्लॅश? (फोटो सौजन्य - X.com)

Follow Us
Follow Us:
  • हार्दिक-कृणालमध्ये नक्की घडलंय तरी काय?
  • हार्दिकच्या विकेटनंतर कृणालचे विचित्र सेलिब्रेशन
  • मैदानावर एकमेकांशी बोलतानाही दिसले नाहीत दोन्ही भाऊ 
IPL 2026 मध्ये MI च्या हातातून 18 धावांनी RCB विरूद्ध सामना निसटला. मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंनी जीव तोडून मेहनत केली मात्र तरीही रॉयल चॅलेंजर्सच्या बाजूने निकाल लागला. हार्दिक पांड्याची सेना पुन्हा एकदा पराभूत झाली. वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळूर यांच्यातील हाय-व्होल्टेज सामन्यामुळे, मैदानातील जय-पराजयाच्या पलीकडे जाऊन एका नव्या कौटुंबिक वादाला तोंड फुटले आहे. 

हार्दिक आणि कृणाल पांड्या या पांड्या बंधूंमध्ये वाढत्या मतभेदांच्या वृत्तांनी सध्या सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे. सामन्यादरम्यान चित्रित झालेल्या काही दृश्यांमुळे, दोन्ही भावांमधील प्रेम खरोखरच संपले आहे का, असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. यावेळी दोन्ही भाऊ मैदानावर एकमेकांशी बोलतानाही दिसले नाहीत आणि इतकंच नाही तर कृणाल पांड्याने केलेल्या सेलिब्रेशनमुळे आता चाहत्यांना दोघांच्याही नात्यात नक्कीच दुरावा आला आहे हे क्लिअर झाल्याचे दिसून येत आहे. 

हार्दिक आणि कृणाल यांच्यात मतभेद आहेत का?

MI vs RCB सामन्यातील सर्वात धक्कादायक क्षण तेव्हा आला, जेव्हा हार्दिक पांड्याची विकेट पडली. जो कृणाल सहसा आपल्या भावाच्या यशाचा जल्लोष करतो, तो हार्दिक बाद झाल्यानंतर आनंदाने उड्या मारताना आणि आक्रमकपणे जल्लोष करताना दिसला. इतकेच नाही, तर संपूर्ण सामन्यादरम्यान दोन्ही भाऊ मैदानावर शांत राहिले आणि एकमेकांकडे पाहणेही टाळताना दिसले. या मैदानातील तणावामुळे, गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यात मतभेद असल्याच्या ज्या अफवा पसरत होत्या, त्याला दुजोरा मिळाला आहे.

MI vs RCB Live Score: मुंबई इंडियन्सचा घरच्या मैदानात घात! आरसीबीने 18 धावांनी मारली बाजी; हार्दिक पांड्याची सेना पुन्हा अपयशी

हार्दिक बाद झाल्यावर कृणालचा जल्लोष

Not all seems well between Hardik Pandya and Krunal Pandya Krunal Pandya was cheering on Hardik’s wicket. Maybe he knows his not so little brother is wrong in many ways.
pic.twitter.com/fDGquVkXYj
— Vidhi (@vidhisharmx) April 12, 2026

वानखेडे स्टेडियममधील खरा थरार तेव्हा सुरू झाला, जेव्हा हार्दिक पांड्याची विकेट पडली. बाद झाल्यानंतर हार्दिक पॅव्हेलियनकडे जात असताना, कॅमेऱ्यांनी कृणाल पांड्याची प्रतिक्रिया टिपली, ज्यामुळे सर्वजण थक्क झाले. कृणालने मैदानावर आनंदाने उड्या मारत आक्रमकपणे जल्लोष केला. आपल्या भावाच्या बाद होण्याने दुःखी असण्याऐवजी, त्याच्या चेहऱ्यावर एक विचित्र आक्रमकता दिसत होती, ज्यामुळे सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे.

या दोन खेळाडूंमध्ये काही मतभेद आहेत का?

तज्ज्ञांच्या मते, हार्दिक आणि नताशाच्या घटस्फोटानंतर त्यांच्या कौटुंबिक नात्यात बदल होऊ लागला. अलीकडे, कृणाल आणि त्याची पत्नी नताशासोबत वेळ घालवताना दिसत आहेत, तर हार्दिक अनेकदा सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये माहिकासोबत दिसला आहे. हार्दिकने दोन ऐतिहासिक आयसीसी ट्रॉफी जिंकल्यानंतरही, सतत पाठिंबा असूनही, कृणाल किंवा त्याच्या पत्नीकडून सोशल मीडियावर कोणताही अभिनंदनाचा संदेश आला नाही. 

कृणाल अथवा त्याच्या पत्नीने हार्दिक आणि माहिकाला कोणताही पाठिंबाही दर्शवला नाही. याशिवाय वर्ल्ड कप जिंकल्यानंतरही कृणालने हार्दिकबाबत कोणतीही पोस्ट केली नाही. तेव्हापासूनच यांच्या नात्यात दरी आल्याची चर्चा सुरू झाली आणि आता या चर्चेला कृणालच्या सेलिब्रेशनमुळे नक्कीच दुजोरा मिळाला आहे. 

MI vs RCB Live Score: कोणतीही दया-मया नाही! बंगळुरूकडून मुंबईची फुल ऑन धुलाई, 241 धावांचे आव्हान उभे, ‘हिटमॅन’ गेम फिरवणार?

Web Title: Ipl 2026 mi vs rcb krunal pandya celebrated aggressively after brother hardik pandya wicket fans shocked assuming clash

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 13, 2026 | 11:06 AM

Topics:  

  • Hardik Pandya
  • IPL 2026
  • krunal pandya
  • MI vs RCB

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.