आकिब नबी दार(फोटो-सोशल मीडिया)
Delhi Capitals bought Aaqib Dar : आयपीएल सीझन १९ च्या मिनी लिलाव सुरू असून यामध्ये अनेक आश्चर्यकारक अशा बोली लागलेल्या दिसून येत आहे. अशातच जम्मू आणि काश्मीर क्रिकेटने आपल्या इतिहासात एक नवा अध्याय लिहिला गेला आहे. बारामुल्लामध्ये जन्म झालेल्या वेगवान गोलंदाज आकिब नबी दारला दिल्ली कॅपिटल्सने ८.४० कोटी रुपयांना खरेदी करण्यात आले आहे. आकिबची वाढती ओळख ही जम्मू आणि काश्मीरसारख्या मर्यादित संसाधनांसह प्रदेशासाठी एक ऐतिहासिक क्षण आहे. हा खोऱ्यातील तरुण खेळाडूंसाठी प्रेरणादायी क्षण मानला जात आहे.
२८ वर्षीय उजव्या हाताचा वेगवान गोलंदाज आकिब नबी दारने मिनी लिलावात जम्मू आणि काश्मीरच्या क्रिकेटचे नेतृत्व केले आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये, त्याने अचूक गोलंदाजी, शिस्त आणि कठीण परिस्थितीत चेंडू स्विंग करण्याची क्षमता असल्याने तो वेगळा ठरतो. आकिब सर्व फॉरमॅटमध्ये जम्मू आणि काश्मीरसाठी सातत्याने सामना जिंकून देणारा गोलंदाज राहिला आहे.
अलिकडच्या रणजी ट्रॉफी हंगामात आकिब नबी दारने अनेक सामन्यांमध्ये शानदार गोलंदाजी केली. त्याने एकूण ४४ बळी टिपले आणि देशातील अव्वल विकेट घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये स्वतःला समोर आणले. मजबूत देशांतर्गत संघांविरुद्धची त्याची कामगिरी आयपीएल स्काउट्सचे लक्ष वेधण्यासाठी पूरक ठरली. मिनी-लिलावात त्याच्यावरजोरदार बोली देखील लागल्या. गोलंदाजीव्यतिरिक्त, आकिबने क्रमवारीत उपयुक्त फलंदाजी देखील करण्याची किमया साधली आहे. यामुळे तो फ्रँचायझींसाठी एक विश्वासार्ह अष्टपैलू पर्याय म्हणून देखील पुढे आला आहे.
लिलावाचे निकाल जाहीर करण्यात आले आहेत. ज्यामुळे काश्मिरी क्रिकेट समुदायात उत्साहाची लाट पसरली आहे.माजी खेळाडू, प्रशिक्षक आणि चाहत्यांनी याला खोऱ्यातील लपलेल्या प्रतिभेचा पुरावा देखील मानले आहे. अनेकांनी आकिबच्या यशाला तरुण क्रिकेटपटूंसाठी प्रेरणास्थान म्हणून संबोधले आहे. यापूर्वी, जम्मू आणि काश्मीरमधील अब्दुल समद, उमरान मलिक, परवेझ रसूल, रसिक सलाम, युद्धवीर सिंग, मोहम्मद मुधासिर आणि मंजूर पांडव हे देखील आयपीएल फ्रँचायझींचा भाग होते.
आयपीएल लिलावात, कोलकाता नाईट रायडर्सने प्रथम ऑस्ट्रेलियन अष्टपैलू कॅमेरॉन ग्रीनला ₹२५.२० कोटींना आपल्या ताफ्यात समाविष्ट केले आहे. ज्यामुळे तो सर्वात महागडा परदेशी खेळाडू ठरला आहे. त्यानंतर केकेआरने श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज मथिशा पाथिरानासाठी देखील मोठी बोली लावली. लखनौ सुपर जायंट्ससोबतच्या बोली लढाईनंतर, कोलकाताने पथिरानाला ₹१८ कोटींना विकत घेतले. या खरेदीसह, मथिशा पाथिरान आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा श्रीलंकेचा खेळाडू ठरला आहे.






