कर्जत तालुक्यातील सहा जिल्हा परिषदेमध्ये भाजप शिवसेना (शिंदे गट) शेकापक्ष पाच जिल्हा परिषद मध्ये युती असताना फक्त माणगाव तर्फे वरेडी जिल्हा परिषद वार्डमध्ये भाजप स्वबळावर लढत असल्याचे चित्र दिसून येत आहे.महायुतीमध्ये भाजपाला जिल्हा परिषद गट मिळत नसल्याने भाजप कर्जत विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक प्रमुख किरण ठाकरे यांनी पक्ष जिवंत ठेवण्यासाठी कर्जत तालुक्यात महायुती समोर मैत्रीपूर्ण लढत करण्याचा प्रस्ताव पक्ष नेतृत्वाकडे ठेवला आणि त्यानंतर भाजप कडून कमळ या निवडणूक चिन्हावर निवडणूक लढवली जात आहे. समोर महायुतीमधील शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार आणि कर्जत परिवर्तन आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस च्या उमेदवार निवडणुकीला सामोरे जात असल्याने भाजप कार्यकर्त्यांचा मोठा प्रतिसाद भाजपच्या माणगाव तर्फे वरेडी जिल्हा परिषद गटाच्या उमेदवार राधिका ठाकरे यांना मिळत आहे. भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार राधिका किशोर ठाकरे या स्वतः आपल्या कार्यकर्त्यांसमवेत घरोघरी जात कमल निशाणीचा प्रचार करत आहेत.
जिल्हा परिषद गटाचा सर्वांगीण विकास घडविण्यासाठी तसेच इच्छाशक्तीच्या जोरावर,महिलांच्या बचत गटासाठी लघु उद्योग आणि महिला स्वलंबनासाठी, नागरी सुविधांसाठी, तरुणांना स्वतःचा उद्योग उभारणे असे विजन घेऊन या निवडणुकीमध्ये राधिका किशोर ठाकरे या निवडणुकीला सामोरे जात आहे. तर भाजप विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक प्रमुख किरण ठाकरे यांनी वर्षांपासून समाजकारण करत राजकारणामध्ये पाऊल ठेवत कर्जत खालापूरच्या विकासासाठी अनेक निधी उपलब्ध करून कर्जत खालापूरचा विकासासाठी पुढे झाले.तसेच 2023च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात 100 कोटीहून अधिक निधी उपलब्ध करून कर्जत खालापूर मतदारसंघांमध्ये मोठ्या प्रमाणावर विकास कामे मार्गी लावली आहेत.
भारतीय जनता पार्टी रायगड जिल्हा परिषद माणगाव तर्फे वरेडी मध्ये सौ. राधिका किशोर ठाकरे यांच्या प्रचार रॅली मध्य भारतीय जनता पार्टीच्या प्रचारासाठी प्रचार रॅलीमध्ये विधानसभा निवडणूक प्रमुख किरण ठाकरे,विजय हजारे, किशोर ठाकरे, संजय कराळे, मिनेश मसने, सचिन म्हसकर ,प्रल्हाद राणे, दर्शन कांबरी, रोशन पाटील, धनंजय थोरवे. रोशन पाटील,राजकुमार धुळे, धनंजय थोरवे , अनिकेत सावंत आणि भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व शेकडो कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.






