Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IPL पूर्वी Mumbai Indians संघात कर्णधार पदासाठी रस्सीखेच! आता Surya च्या बाजूने ‘हा’ फिरकीपटू मैदानात

IPL 2026 चा हंगाम सुरू होण्यापूर्वी मुंबई इंडियन्स (MI) संघातील कर्णधारपदाची चर्चा पुन्हा एकदा ऐरणीवर आली आहे. सध्या संघात बरेच मुख्य दावेदार असल्यामुळे या खेळाडूमध्ये रस्सीखेच सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Mar 23, 2026 | 07:38 PM
(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • MI संघातील कर्णधारपदाची चर्चा पुन्हा एकदा ऐरणीवर
  • खेळाडूमध्ये रस्सीखेच सुरु असल्याचं पाहायला मिळत
  • कोणाच्या हातात मिळणार संघाची धूरा
IPL 2026 Captaincy Surya VS Pandya : IPL 2026 चा हंगाम सुरू होण्यापूर्वी मुंबई इंडियन्स (MI) संघातील कर्णधारपदाची चर्चा पुन्हा एकदा ऐरणीवर आली आहे. सध्या संघात बरेच मुख्य दावेदार असल्यामुळे या खेळाडूमध्ये रस्सीखेच सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यात नेमकं कोणाकडे जाणार कर्णधारपद याबाबत भारताचा दिग्गज फिरकीपटू याने विधान केलं आहे. त्यामुळे हे विधान करत त्याने वादात उडी घेतली आहे.

IPL 2026 : Rajasthan Royals मध्ये मोठा बदल! Sam Curran ची जागा घेणार श्रीलंकेचा ‘हा’ स्फोटक खेळाडू

सूर्याला कप्तान न बनवणे चिंतेची बाब- अश्विन

अश्विनने आपल्या यूट्यूब चॅनेलवर बोलताना स्पष्ट केले की, सूर्यकुमार यादवला कर्णधार बनवणे हा सर्वात सोपा आणि सरळ निर्णय असायला हवा होता. तो म्हणाला, “सूर्यकुमार यादवलाच कर्णधार बनवायला हवे होते. त्याला डावलून दुसऱ्याला ही जबाबदारी देणे नक्कीच चिंतेची बाब आहे.” सध्याचा फॉर्म आणि रेकॉर्ड पाहता सूर्यकुमार यादव (SKY) हाच मुंबई इंडियन्सचा कर्णधार होण्यासाठी योग्य उमेदवार होता.

अश्विनने सूर्याच्या बाजूने काही महत्त्वाचे मुद्दे मांडले

टी-२० वर्ल्ड कप विजय संपादन केला. जुलै २०२४ मध्ये भारतीय संघाची धुरा सांभाळल्यापासून सूर्याच्या नेतृत्वाखाली संघाने एकही टी-२० मालिका गमावलेली नाही. त्याबरोबर यशस्वी नेतृत्व असल्यामुळे त्याच्याकडे धुरा द्यावी. सूर्याने भारताला आयसीसी मेन्स टी-२० वर्ल्ड कप २०२६ चे जेतेपद मिळवून दिले आहे, त्यामुळे त्याच्याकडे मोठ्या स्पर्धा जिंकण्याचा अनुभव आहे.

हार्दिक पांड्यासमोर मोठे आव्हान

अश्विनने हार्दिक पांड्याच्या क्षमतेवर पूर्णपणे शंका घेतली नाही. त्याने आठवण करून दिली की, हार्दिकने गुजरात टायटन्सला पहिल्याच प्रयत्नात जेतेपद मिळवून दिले होते. मात्र, मुंबई इंडियन्समध्ये त्याच्यासाठी परिस्थिती कठीण असल्याचे अश्विनला वाटते. अश्विन म्हणाला, “जेव्हा भारतीय संघाचा कर्णधार सूर्यकुमार असतो आणि तोच खेळाडू आयपीएलमध्ये हार्दिकच्या नेतृत्वाखाली खेळतो, तेव्हा ही स्थिती मानसिक दबाव निर्माण करू शकते. हार्दिकला जर संघ व्यवस्थापनाचा पूर्ण पाठिंबा मिळाला आणि तो बाहेरील दबावापासून दूर राहिला, तरच तो यशस्वी होऊ शकतो.”

दिग्गजांचेही सूर्याला समर्थन

केवळ अश्विनच नाही, तर यापूर्वी भारताचे माजी क्रिकेटपटू कृष्णमाचारी श्रीकांत यांनीही सूर्याला कर्णधार बनवण्याची मागणी केली होती. चाहत्यांमध्येही सूर्याबद्दल मोठी सहानुभूती असून, हार्दिकला पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या रोषाला सामोरे जावे लागू शकते, अशी भीती व्यक्त होत आहे.

मुंबई इंडियन्सचा पहिला सामना

मुंबई इंडियन्स आपला पहिला सामना २९ मार्च रोजी वानखेडे स्टेडियमवर कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध खेळणार आहे. आता हार्दिक पांड्या या दबावाखाली संघाला कसे हाताळतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

मुंबई इंडियन्सचा संपूर्ण स्क्वॉड:

हार्दिक पांड्या (कर्णधार), रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, रयान रिकेल्टन, रॉबिन मिंज, मिचेल सँटनर, कॉर्बिन बॉश, नमन धीर, जसप्रीत बुमराह, ट्रेंट बोल्ट, अल्लाह गजनफर, अश्विनी कुमार, रघु शर्मा, राज बावा, दीपक चहर, विल जॅक्स, शेरफेन रदरफोर्ड, मयंक मार्कंडेय, शार्दुल ठाकूर, क्विंटन डिकॉक, दानिश मालेवर, मोहम्मद इजहार आणि मयंक रावत.

Web Title: Ipl 2026 ravichandran ashwin on mi captaincy suryakumar yadav vs hardik pandya marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 23, 2026 | 07:38 PM

Topics:  

  • Hardik Pandya
  • IPL
  • IPL 2026
  • mumbai indians
  • R Ashwin
  • Suryakumar Yadav

संबंधित बातम्या

WPL 2027 : ल्यूक विलियम्स मुंबई इंडियन्सच्या मुख्य प्रशिक्षकपदी, डब्ल्यूपीएलमध्ये प्रशिक्षणाचा दांडगा अनुभव
1

WPL 2027 : ल्यूक विलियम्स मुंबई इंडियन्सच्या मुख्य प्रशिक्षकपदी, डब्ल्यूपीएलमध्ये प्रशिक्षणाचा दांडगा अनुभव

Ipl 2027 : ‘थलायवा’ धोनीच्या संघानं भाकरी फिरवली; झहीर खान चेन्नई सुपर किंग्जच्या मुख्य प्रशिक्षकपदी
2

Ipl 2027 : ‘थलायवा’ धोनीच्या संघानं भाकरी फिरवली; झहीर खान चेन्नई सुपर किंग्जच्या मुख्य प्रशिक्षकपदी

KKR ने टाकला डाव, Abhishek Nayar ने थेट दिली ऑफर, Rohit Sharma ने एका शब्दात केला गेम ओव्हर! VIDEO तुफान व्हायरल
3

KKR ने टाकला डाव, Abhishek Nayar ने थेट दिली ऑफर, Rohit Sharma ने एका शब्दात केला गेम ओव्हर! VIDEO तुफान व्हायरल

’10 ओव्हर्स करण्याइतपत देखील तो…’; Hardik Pandya बाबत गौतम गंभीरचे मोठे विधान
4

’10 ओव्हर्स करण्याइतपत देखील तो…’; Hardik Pandya बाबत गौतम गंभीरचे मोठे विधान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.