RCB ने का घातली ग्रीन जर्सी (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
याच कारणास्तव, आरसीबी संघ दरवर्षी एका सामन्यात हिरव्या रंगाची जर्सी परिधान करून लाखो चाहत्यांना पर्यावरणाचे संरक्षण आणि संवर्धन करण्याचा संदेश देतो. आरसीबी संघ गेल्या १५ हंगामांपासून एका सामन्यात हिरव्या रंगाची जर्सी परिधान करत आहे. त्यांनी २०११ मध्ये ही प्रथा सुरू केली. आयपीएलमध्ये आरसीबी संघाने हिरव्या रंगाची जर्सी परिधान करण्याची ही १६ वी वेळ आहे. ही जर्सी १००% पुनर्वापर केलेल्या साहित्यापासून बनलेली असून ती कार्बन-न्यूट्रल आहे. पर्यावरणाचे रक्षण करण्याचा संदेश देण्यासाठी आरसीबी हे काम करत आले आहे आणि नियमितपणाने ही जर्सी घातली जाते.
RCB Vs DC Live: दिल्लीच्या गोलंदाजांना ‘सॉल्ट’ झोंबला; कॅपिटल्सला विजयासाठी ‘इतक्या’ रन्सची गरज
हिरव्या जर्सीमधील आरसीबीचा रेकॉर्ड काय आहे?
RCB निश्चितपणे हिरव्या जर्सीच्या माध्यमातून एक सकारात्मक पर्यावरणीय संदेश प्रसारित करण्यासाठी काम करत आहे, परंतु या जर्सीमधील त्यांचा रेकॉर्ड खराब राहिला आहे. संघाने आतापर्यंत या जर्सीमध्ये एकूण १५ सामने खेळले असून, त्यापैकी नऊ सामन्यांमध्ये त्यांना पराभव पत्करावा लागला आहे. आरसीबीने हिरव्या जर्सीमध्ये केवळ पाच सामने जिंकले आहेत, तर एक सामना अनिर्णित राहिला. आरसीबीने कोची टस्कर्सविरुद्ध पहिल्यांदाच हिरव्या जर्सीमध्ये सामना खेळला. त्यामुळे आज दिल्लीविरुद्ध आरसीबीचा रेकॉर्ड कसा राहणार हेदेखील पहावे लागणार आहे.
या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने नाणेफेक जिंकली
या सामन्याबाबत बोलायचे झाल्यास, दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार अक्षर पटेलने आरसीबीविरुद्ध नाणेफेक जिंकली. नाणेफेक जिंकल्यानंतर अक्षरने आरसीबीला त्यांच्या घरच्या मैदानावर प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. गतविजेता आरसीबी या हंगामात दमदार कामगिरी करत असून गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे, तर दिल्ली या सामन्यात विजयाच्या मार्गावर परतण्याचा प्रयत्न करेल. मात्र दिल्लीची सुरूवात खराब झाल्याचे दिसून आले आहे.
IPL 2026: फिल्डिंग करताना दिल्ली कॅपिटल्सच्या मुकेश कुमारला सोडावे लागले मैदान, नक्की काय घडले






