मैदानात उतरण्यापूर्वीच KKR ने टाकला मोठा डाव! (Photo Credit- X)
सध्या केकेआरच्या नेतृत्वाची धुरा अनुभवी अजिंक्य रहाणे याच्याकडे आहे. रहाणेचे वय 37 वर्षे असून, त्याच्या आयपीएल करिअरचा हा अंतिम टप्पा मानला जात आहे. अशा परिस्थितीत, रिंकू सिंहला उपकर्णधार बनवून फ्रँचायझी त्याला भविष्यातील कर्णधार म्हणून तयार करत असल्याचे दिसून येत आहे. अजिंक्य रहाणेसारख्या अनुभवी खेळाडूच्या मार्गदर्शनाखाली रिंकूला नेतृत्वाचे बारकावे शिकण्याची मोठी संधी मिळणार आहे. विशेष म्हणजे, रिंकूला उत्तर प्रदेशच्या देशांतर्गत संघात आणि युपी टी-20 लीगमध्येही कर्णधारपदाचा अनुभव आहे.
God’s plan has a new chapter ✨ pic.twitter.com/2Gsy55mipi — KolkataKnightRiders (@KKRiders) March 24, 2026
रिंकू सिंहची आयपीएलमधील प्रगती थक्क करणारी आहे. 2018 मध्ये जेव्हा तो पहिल्यांदा केकेआरमध्ये आला, तेव्हा त्याला 80 लाखांची बोली लागली होती. 2022 च्या लिलावात त्याची किंमत केवळ 55 लाख रुपये होती. मात्र, २०२३ मध्ये सलग 5 चेंडूत 5 षटकार ठोकून त्याने केकेआरला अशक्य विजय मिळवून दिला आणि त्याचे नशीब पालटले. 2025 च्या मेगा लिलावापूर्वी केकेआरने त्याला 13 कोटी रुपये देऊन रिटेन केले, जे त्याच्या मेहनतीचे फळ मानले जाते.
IPL 2026 : मोहम्मद कैफचे खळबळजनक विधान, केकेआरने रिंकू सिंगला कर्णधार म्हणून तयार करावे…
28 वर्षीय रिंकू सिंहने आतापर्यंत आयपीएलमध्ये 59 सामने खेळले आहेत. यात त्याने 145 च्या स्ट्राईक रेटने आणि 30.52 च्या सरासरीने 1099 धावा केल्या आहेत. गेल्या दोन हंगामात त्याच्या बॅटमधून अपेक्षित धावा निघाल्या नसल्या तरी (28 सामन्यांत 374 धावा), टी-20 विश्वचषक 2026 जिंकणाऱ्या भारतीय संघाचा तो महत्त्वाचा भाग होता. त्यामुळे आगामी हंगामात त्याच्याकडून मोठ्या अपेक्षा आहेत.
आयपीएल 2026 मध्ये केकेआरच्या मोहिमेची सुरुवात 29 मार्चपासून होणार आहे. वानखेडे स्टेडियमवर केकेआरचा पहिला सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध रंगणार आहे. नव्या जबाबदारीसह रिंकू वानखेडेवर कशी कामगिरी करतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
अजिंक्य रहाणे (कर्णधार), अंगकृष रघुवंशी, अनुकूल रॉय, हर्षित राणा, मनीष पांडे, रमनदीप सिंह, रिंकू सिंह (उपकप्तान), रोवमन पॉवेल, सुनील नरेन, उमरान मलिक, वैभव अरोडा, वरुण चक्रवर्ती, कॅमेरून ग्रीन, फिन ॲलन, मथीशा पथिराना, तेजस्वी सिंह, कार्तिक त्यागी, प्रशांत सोलंकी, राहुल त्रिपाठी, टिम सीफर्ट, सार्थक रंजन, दक्ष कामरा, रचिन रवींद्र, आकाश दीप, ब्लेसिंग मुजरबानी.
IPL 2026 च्या आधी रिंकू सिंगला एक मोठी भेट मिळणार, उत्तर प्रदेशमध्ये मिळणार मोठे पद! वाचा सविस्तर






