Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 22 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IPL 2026: अरारा खतरनाक! अवघ्या 15 व्या वर्षी 680 पैकी 610 धावा चौकारातून, 65 सिक्सरचा डोंगर, Vaibhav Sooryavanshi चा धडाका

वैभव सूर्यवंशीने सर्वात जलद आयपीएल शतकाचा विक्रम मोडला नसेलही, पण ज्याप्रकारे हा १५ वर्षांचा खेळाडू खेळत आहे, ते पाहता तो पुढच्याच सामन्यात हा विक्रम मोडू शकतो. कमालीचा रेकॉर्ड वैभव करत आहे.

  • By दिपाली नाफडे
Updated On: May 28, 2026 | 11:13 AM
वैभव सूर्यवंशीचा तुफानी खेळ (फोटो सौजन्य - Instagram)

वैभव सूर्यवंशीचा तुफानी खेळ (फोटो सौजन्य - Instagram)

Follow Us
Follow Us:
  • अवघ्या १५ व्या वर्षी वैभवच्या नावे कमालीचा रेकॉर्ड 
  • ख्रिस गेलच्या सिक्सर्सचा रेकॉर्डही मोडला
  • जलद शतकाचा रेकॉर्ड थोडक्यात हुकला 
या देशाने वेगवेगळ्या काळात काही महान खेळाडू पाहिले आहेत. सुनील गावस्कर, सचिन तेंडुलकर आणि विराट कोहली यांच्यानंतर आता वैभव सूर्यवंशी हा तारा चमकतोय. जर हा १५ वर्षांचा मुलगा पुढील २० वर्षे क्रिकेट खेळला, तर तो विक्रमांची पुस्तके मोडून काढेल. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, आयपीएल २०२६ चा ऑरेंज कॅप मिळवलेल्या वैभवने आपल्या ६८० धावांपैकी ६१० धावा चौकार-षटकारांनी केल्या आहेत. यात ५५ चौकार आणि ६५ षटकारांचा समावेश आहे, त्यात एका आयपीएलमधील सर्वाधिक षटकारांचा विक्रम आहे. 

वैभवने सनरायझर्स हैदराबादसमोर एलिमिनेटर सामन्यात ख्रिस गेलचा सर्वाधिक षटकारांचा विक्रम मोडीत काढला आहे. ख्रिस गेलचा दुसरा विक्रम तोडता तोडता वैभव राहिला आहे. वैभवचे जगभरात कौतुक आणि प्रशंसा होताना दिसत आहे. 

वैभवने आपल्या ५७ टक्के धावा षटकारांमधून केल्या आहेत

वैभव सूर्यवंशीचा आयपीएलमधील तुफानी खेळ

महान ख्रिस गेलने आपल्या सर्वोत्तम आयपीएल हंगामात ५९ षटकार मारत ७३३ धावा केल्या होत्या. याचा अर्थ त्याच्या ४८ टक्के धावा षटकारांमधून आल्या होत्या, पण वैभवच्या ६८० धावांपैकी ५७ टक्के धावा षटकारांमधून आल्या आहेत. वैभव ज्या शैलीत खेळत आहे, त्यामुळे गेलचे विक्रम फिके वाटतात.

आरारारा खतरनाक! Vaibhav Suryvanshi बनला IPL चा सिक्सर किंग; टी-20 च्या बादशाहला टाकले मागे

वैभवच्या वयाबाबत चर्चांना पूर्णविराम 

वैभवच्या वयाबद्दल अनेकदा प्रश्न उपस्थित केले जातात. प्रतिस्पर्धी म्हणतात की तो कोणत्याही अँगलमधूनन १५ वर्षांचा दिसत नाही, पण जगातील सर्वात महागड्या लीगमध्ये, जिथे ३० वर्षांचे खेळाडूही धावा करण्यात अपयशी ठरत आहेत, तिथे त्याचा निर्भीड खेळ कमी महत्त्वाचा आहे का? खेळात वय कुठेही आडवं येत नाही हेच वैभवने आपल्या खेळातून दाखवून दिलं आहे. वैभव कोणत्याही गोलंदाजाला न घाबरता निर्भिडपणे आपला नैसर्गिक खेळ खेळताना दिसतो आणि आता खरं तर गोलंदाजच वैभवच्या खेळीला घाबरायला लागले आहेत. 

सर्वात जलद शतक हुकले

२७ मे रोजी, सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात आयपीएल २०२६ चा एलिमिनेटर सामना खेळला गेला. एक पराभव म्हणजे स्पर्धेतून बाहेर. अशा उच्च-दबावाच्या सामन्यात, वैभवने आयपीएलच्या इतिहासातील सर्वात जलद शतक केवळ एका शॉटने हुकवले. जेव्हा तो २८ चेंडूंमध्ये ९७ धावांवर होता, तेव्हा तो शतक पूर्ण करण्यापासून फक्त एक शॉट दूर होता. पण पुढच्याच चेंडूवर, त्याने प्रफुल्ल हिंगेच्या एका शॉर्ट बॉलवर अप्पर कट मारला, जो डीप थर्ड मॅनला उभ्या असलेल्या आर. स्मृतीच्या हातात गेला. सूर्यवंशीने आपल्या झंझटक्या खेळीत २९ चेंडूंमध्ये १२ षटकार आणि पाच चौकारांसह ९७ धावा केल्या.

एका हंगामात सर्वाधिक षटकारांचा विक्रम

या सामन्यात उतरण्यापूर्वी, वैभव सूर्यवंशी षटकारांच्या बाबतीत गेलपेक्षा सहा षटकारांनी मागे होता. गेलने २०१२ च्या हंगामात ५९ षटकार मारले होते. सूर्यवंशीने या सामन्यात १२ षटकार मारून गेलचा विक्रम मोडला आणि आयपीएल २०२६ मध्ये आपल्या षटकारांची एकूण संख्या ६५ वर नेली. त्याचे ६५ षटकार या हंगामातील दुसऱ्या क्रमांकावरील फलंदाज अभिषेक शर्मा (४३ षटकार) पेक्षा लक्षणीयरीत्या जास्त आहेत.

‘मला कोणी सांगितलंच नाही…’ वैभव सूर्यवंशीने केला धक्कादायक खुलासा, ख्रिस गेलचा रेकॉर्ड तोडला आणि माहीतच नाही

Web Title: Ipl 2026 vaibhav sooryavanshi record scores 610 runs from fours and sixers out of 680 runs made unique record

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 28, 2026 | 11:13 AM

Topics:  

  • IPL 2026
  • SRH vs RR
  • Vaibhav Sooryavanshi

संबंधित बातम्या

Baby Boss वैभव सूर्यवंशीसाठी मोठा धोका! 6 फूट 8 इंच उंचीचा बॉलर पाहतोय वाट, आर्चरनंतर आता अजून मोठा अडथळा
1

Baby Boss वैभव सूर्यवंशीसाठी मोठा धोका! 6 फूट 8 इंच उंचीचा बॉलर पाहतोय वाट, आर्चरनंतर आता अजून मोठा अडथळा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.