वैभव सूर्यवंशीला नव्हती रेकॉर्ड कल्पना (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
वैभव सूर्यवंशी म्हणजे एक Wonder Kid आहे असंच मानलं जातं. याशिवाय त्याला Universe Baby असंही नाव दिलं गेलंय. हैदराबाद विरूद्ध सामन्यात सर्व प्लॅन्स अपयशी ठरवत हैदराबादच्या सर्व गोलंदाजांच्या तोंडचं पाणी वैभवने पळवलं होतं. त्याचा एक विक्रम केवळ ३ धावांसाठी राहिला. त्याने याच सामन्यात सर्वाधिक सिक्सरचा ख्रिस गेलचा विक्रम मात्र तोडला होता. मात्र याबाबत आपल्याला काहीही कल्पना नसल्याचं त्यानं सांगितलं.
सकारात्मकता महत्त्वाची
“आम्ही जिंकलो आहोत, त्यामुळे आता आम्हाला सकारात्मक मानसिकतेने पुढे जायचे आहे. मी फलंदाजी करताना थोडा विचार करतो, खूप जास्त नाही. मी गोष्टी सोप्या ठेवण्याचा प्रयत्न करतो, फक्त गोलंदाजांचा विचार करतो आणि त्यांच्याविरुद्ध कोणती रणनीती आखता येईल याचा विचार करतो.
मी सकारात्मक मानसिकतेने खेळतो आणि गोलंदाजांवर दबाव टाकतो. गोलंदाजांवर दबाव टाकणे हेच माझे ध्येय आहे. संघासाठी योगदान देण्यावर माझे लक्ष होते. आता माझे लक्ष ट्रॉफी जिंकण्यावर आहे. माझ्यात काही कमतरता असतील, तर मी त्यावर काम करतो आणि माझ्या खेळाचा तो पैलू सुधारण्याचा प्रयत्न करतो.” असे अत्यंत साधेपणाने वैभवने प्रेझेंटेशनच्या वेळी सांगितले.
SRH Vs RR Live: नुसता राडा! Vaibhav Suryvanshi ने कमिन्सला फोडला घाम, केवळ 15 बॉलमध्ये…
विक्रमाची कल्पना नव्हती
वैभव सूर्यवंशी आयपीएलच्या इतिहासातील सर्वात जलद शतकाचा विक्रम मोडण्यापासून थोडक्यात चुकला. तो म्हणाला, “मला याची कल्पना नव्हती. मी बाद होऊन मैदान सोडल्यावरच मला याबद्दल कळले. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे मारण्याचा माझा हेतू होता. मी जेव्हाही खेळतो, तेव्हा फक्त संघाच्या विजयासाठीच फलंदाजी करतो. सध्या लक्ष्य फक्त ट्रॉफी मिळवणं हेच आहे” असंही त्याने नम्रपणाने सांगितले. सध्या चारही बाजूने वैभवची प्रशंसा होत आहे आणि अगदी क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरनेही वैभवचे भरभरून कौतुक केले आहे. दरम्यान आता गुजरात टायटन्सविरूद्ध वैभव कशी खेळी करणार हे पाहणं चाहत्यांसाठी औत्सुक्याचे ठरणार आहे.






